दुःख कसे हाताळावे?नमुना
जीवनाचा अल्पकाळ
एखाद्या प्रिय व्यक्तीचे मरण अनेकदा आपल्या जीवनाच्या अल्पकाळाचे सत्य लक्षात आणते.
जीवन नाजूक आणि क्षणभंगुर आहे. काहींसाठी हा प्रवास काही वर्षांचाच असेल. इतरांसाठी,ते अनेक दशके टिकेल. पण सर्वांसाठी,तो एक दिवस बंद होईल.
मृत्यूच्या अपरिहार्यतेची जाणीव असल्याने,आपले आयुष्य किती लहान असेल याचा विचार करण्यासाठी आपण स्वतःला शिस्त लावली पाहिजे.
पण कधी कधी आपल्या मर्यादा जाणून घेण्यासाठी आयुष्य पुरत नाही किंवा जीव गमावावा लागतो. म्हणूनच (स्तोत्र ९०:१२) मध्ये मोशे आम्हाला प्रार्थना करण्यास सांगतो "आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की,आम्हांला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल."
आम्ही ज्याला महत्व देतो ते मोजतो : पैसे,खेळाचे गुण,कॅलरी इ. म्हणून जर आपण आपल्या दिवसांची किंमत करतो तर आपण ते देखील मोजले पाहिजे. ज्याप्रमाणे आपल्या आर्थिक भांडवलाचा अतिरेकी अंदाज लावणारा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या बेजबाबदार असू शकतो,त्याचप्रमाणे जो कोणी आपल्या आयुष्याचा अतिरेकी अंदाज लावतो तो सीमित बेजबाबदार असू शकतो. उद्याची भेट गृहित धरण्यापेक्षा ती भेट म्हणून पाहण्यातच मोठा शहाणपणा आहे.
जीवनाचा अल्पकाळ हे एक हट्टी आणि निर्विवाद सत्य आहे. आपण जीवनाच्या अनिश्चिततेबद्दल विचार करू शकतो - आपल्यापैकी कोणीही आज किंवा उद्या मरण पावू शकतो - परंतु जीवन केवळ अनिश्चित नाही,ते अगदी अल्पकाळाचे आहे.
ईयोब म्हणतो, ‘“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो;तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो,राहत नाही....मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे;त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे;तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस,ती त्याला ओलांडता येत नाही;म्हणून त्याच्यावरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे;मजूर रोज भरतो तसे त्याला आपले दिवस भरू दे. (इयोब १४:१-६) किंवा,मोशेच्या शब्दात, (स्तोत्र ९०:१०) मध्ये ‘आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले,तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे,कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.'
जो माणूस असे समजतो की तो प्रौढ आहे,परंतु तो कधीही मरणार नाही असे जगतो तो मूर्ख आहे - किमान,देवाने पवित्र शास्त्रात त्याच्या प्रमाणे जगणाऱ्या एकाबद्दल असे लिहीले आहे (लूक १२:२०).
आयुष्य अल्पसे आहे या जाणिवेचा तुमच्यावर खूप गंभीर परिणाम झाला पाहिजे. त्यातून वेळेचा सदुपयोग व्हायला हवा.
तुमच्या अल्पशा ऐहिक जीवनाचा अर्थ आणि पूर्तता तेव्हाच मिळू शकते जेव्हा तुम्ही देवाचे अज्ञापालन,प्रेम आणि सेवा करण्याचा प्रयत्न करता.
पौलाने लिहिले, "मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही,ह्यासाठी की,मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी." (प्रेषित २०:२४)
अशाप्रकारे,जेव्हा तुमचे अल्पसे ऐहिक जीवन संपते,तेव्हा तुम्ही देवावर दुःखी किंवा नाखूष नसता,परंतु तुमचे जीवन देवाच्या सार्वकालिक राज्याच्या उभारणीत गणले जाते याचा तुम्हाला विशेषाधिकार वाटतो. आणि आत्मविश्वासाने तुम्ही पौलासोबत म्हणू शकता, "माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे,धाव संपवली आहे,विश्वास राखला आहे;आता जे राहिले ते हेच की,माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे;प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल." (२ तीमथ्य ४:६-८).
होय,जीवन अल्पसे आहे,आणि सार्वकालिक गुंतवणूक करण्याच्या संधी देखील अल्पशा आहेत. म्हणून,आपले जीवन आपण येशूसाठी मोजू या.
संक्षिप्त: "जगात टिकाऊ बदल घडवून आणणारे लोक अनेक गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवलेले लोक नसतात,तर एकाच महान गोष्ट त्यांच्यावर प्रभुत्व करत असते." - जॉन पायपर.
प्रार्थना: प्रभु,माझे आयुष्य लहान आहे हे जाणून,त्याचा सर्वोत्तम उपयोग करण्यास मला मदत कर,जेणेकरून जेव्हा माझी तुला भेटण्याची वेळ येईल तेव्हा मी तयार होईन. आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay