YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 14:1-6

ईयोब 14:1-6 MARVBSI

“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही. अशावर तू डोळा ठेवतोस काय? अशा मला तू आपल्या न्यायासनासमोर नेतोस काय? अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही. मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे; त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे; तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस, ती त्याला ओलांडता येत नाही; म्हणून त्याच्यावरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे; मजूर रोज भरतो तसे त्याला आपले दिवस भरू दे.