दुःख कसे हाताळावे?नमुना
प्रश्न पडण्यास हरकत नाही.
आपणांस देखील मृत्यू किंवा मरणे याबद्दल अनेक प्रश्न असतील. जर कुणी मरण पावले तर आपणांस अस्वस्थ वाटत असेल,दुःख होत असेल,राग येत असेल आणि काही प्रश्न पडत असतील तर काही हरकत नाही.
मार्था आणि मरिया ह्या शोक करीत होत्या.त्यांचा भाऊ चार दिवसापूर्वी मरण पावला होता आणि त्यांनी त्याला कबरेत ठेवले होते. त्यांनी येशूला त्याच्या आजाराबद्दल कळविले होते. त्यांना वाटले होते की तो त्यांच्या मदतीस धावून येईल. त्याने नक्कीच काहीतरी केले असते. परंतु दिवस लोटले गेले आणि येशू काही आला नव्हता आणि आता लाजार मरण पावला होता व त्याला पुरलेही होते. आणि त्या बहिणी व त्यांचे मित्रगण शोक करीत होते.
म्हणून जेव्हा येशू लाजार मरण पावल्यावर,जेव्हा त्यांना भेट द्यायला आला,मार्था येशूला म्हणली, "जर तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता."
मार्था आपल्या भावाच्या मृत्यू बद्दलचा राग व्यक्त करीत होती. पुष्कळसे लोक मार्थासारखे असतात -- त्यांच्या जवळची एखादी व्यक्ती मरण पावली तर ते खूप रागावतात. आणि ही लक्ष वेधणारी गोष्ट आहे की,येशू मार्थाच्या रागावण्यावर असंतुष्ट झाला नाही.
येशूला ठावूक होते की आपली प्रिय व्यक्ती मरण पावली तर आपल्याला राग येणे नैसर्गिक आहे. येशूला ठावूक आहे आम्हास कसे वाटते.
आपणास देवाबद्दल असे काही'जर'किंवा'का'असे प्रश्न पडले आहेत का?जसे "येशू,तू जर इथे असतास तर,माझी आई एवढी आजारी पडली नसती." "अपघात झाला नसता". माझे अतिशय प्रिय का मरण पावले?माझे पती का मरण पावले?का माझी पत्नी?आमच्या बरोबरच ही शोकांतिका का घडली?जर मी माझ्या पतीला यापूर्वीच दवाखान्यात भरती केले असते तर ते वाचले असते?जर मी तिची चांगली काळजी घेतली असती तर ती अद्याप जीवंत असती?देव माझ्या प्रार्थनांची उत्तरे का देत नाही? "हे सर्व घडले तेव्हां देव कुठे होता?" "देव का हजर नव्हता?"
का चे सर्व प्रश्न विचारा. जरी त्या अशा गोष्टी आहेत,आपल्याला ठावूक आहे की बौद्धिकदृष्ट्या यात काही तथ्य नाही. जरी आपण याचे वैद्यकीय कारण किंवा मृत्यू संबंधीची आणखी माहिती पाहिली तरी ते समाधानकारक नसणार आहे.
मरीयाची प्रतिक्रिया मार्थापेक्षा निराळी होती.
मरीया खूप रडत होती व अश्रु ढाळीत होती. ती देखील रागावलेली असावी. परंतु ती जास्त दुःखी व निराश होती. पवित्र शास्त्र म्हणते मरीया येशुकडे आली,त्याच्या पायावर पडली आणि ताबा सुटल्या प्रमाणे रडत राहीली. तिने आपले अश्रू रोकले नाहीत. आणि लक्षात घ्या,येशू तिला रडू नको असे म्हणाला नाही. येशू आपले दुःख जाणतो. हे आपल्यासाठी नैसर्गिक आणि साधारण आहे की ज्यावर आपली प्रिती आहे अशी एखादी व्यक्ती जर मरण पावली,तर आम्ही दुःखी होतो. मृत्युमुळे आम्हाला पुष्कळ निरनिराळ्या भावनांची जाणीव होऊ शकते. लोक मृत्यूबद्दल निरनिराळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. येशू ख्रिस्ताने आपल्या शोकाकूल मित्राला प्रतिक्रिया देताना येशू म्हणाला, "प्रत्येक जण निरनिराळ्याप्रकारे प्रतिसाद देतो ते ठीक आहे." येशूने मार्थेला तिच्या रागाबद्दल किंवा मरियेच्या दुःखाबद्दल धिक्करले नाही. येशूची इच्छा आहे की आम्ही हे लक्षात घ्यावे की तो सदैव सांत्वन करण्यासाठी आणि जेंव्हा आम्ही दुःखात असतो तेंव्हा आम्हास खात्री देण्यासाठी आम्हाबरोबर असतो.
म्हणून,खुशाल जाऊन देवाला प्रश्न विचारण्यात वेळ घालवा. तो जाणतो. जेंव्हा तुमच्या लक्षात येते की तुमच्या "का?"चे समाधान होणार नाही तेंव्हा तुमचा "का", "कसे" मध्ये बदलू द्या. मी या वियोगातून बाहेर पडून पुढे कसे जाऊ शकेन?
तुम्ही हे समजल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल की,तुम्ही तुमच्या शंकांमध्ये एकटे नाहीत आणि तुम्ही तुमच्या खऱ्या भावना देवाकडे व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र आहात. तुमचे हे जाणून समाधान होईल की,येशूचे अंत:करण तुम्हाबरोबरच दुःखी झालेले आहे.
जेव्हा तुम्ही त्याच्या सर्वात जवळच्या काळजीचा अनुभव कसा घ्यावा हे तुम्हाला कळेल,तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या दुःखाचा अर्थ असा आहे की देवासाठी तुमचा सर्वात मोठा प्रभाव आणि पगडा तुमच्यासमोरच आहे.
संक्षिप्त: विश्वास म्हणजे देवाच्या स्वभावावर संकल्पित केलेला विश्वास ज्याचे मार्ग तुम्हाला त्या वेळी समजू शकत नाहीत. -- ओसवाल्ड चेंबर्स.
प्रार्थना: प्रभू मी तुझे आभार मानतो की जेव्हा मी तुला माझे प्रश्न सांगतो तेव्हा तू असंतुष्ट होत नाहीस. जरी मला सर्व उत्तरे मिळू शकत नसली तरी तू नियंत्रणात आहेस हे जाणून तुझ्यामध्ये विश्रांती मिळविण्यासाठी मला मदत कर. आमेन
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay