YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दुःख कसे हाताळावे?नमुना

दुःख कसे हाताळावे?

10 पैकी 7 दिवस

आपण लवकरच एकजूट होऊ.

पृथ्वीवरील सर्वात मोठ्या विरोधाभासांपैकी एकामध्ये,आनंद आणि दु:ख परस्पर विरुद्ध नाहीत. खरं तर,दुःख हा एक मार्ग आहे जो नूतनीकरणाच्या आशेकडे नेतो - जर आपण असे होऊ दिले तर.

जितक्या लवकर आपण स्वतःला आपले दु:ख अनुभवू देऊ,त्याबद्दल बोलू आणि त्यावर प्रक्रिया करू,तितकी आपली सचोटी अबाधित आणि आपला विश्वास अधिक लवचिक राहून या दुःखाच्या सावलीतून लवकर बाहेर येण्याची शक्यता जास्त असते.

आपल्या सर्वात काळोख्या क्षणांमध्ये,आपण संतापाने भरलेले जीवन जगू शकतो,जमिनीवर पाय आपटून आणि तीव्र संतापाने देवाकडे आपल्या मुठी आवळून जगू शकतो. किंवा,आपण जीवन आणि मृत्यूवर प्रभुच्या नियंत्रणावर आपला विश्वास दर्शवू शकतो. आपल्याल खात्री आहे की देव आपल्या पाठीशी आहे. आपण येशूच्या शब्दांवर विश्‍वास ठेवू शकतो,ज्याने म्हटले होते, “मी सदैव तुझ्याबरोबर आहे,अगदी जगाच्या शेवटपर्यंत.”

लाजराला मरणातून उठविणे हा योहानकृत शुभवर्तमानातील सात "चमत्कार कथा" मधील अंतिम चमत्कार सांगितला आहे. तो त्यांना “चिन्हे” म्हणतो. चिन्हे किंवा संकेत स्वतःच्या पलीकडे काहीतरी इतर आणि मोठ्या वास्तविकतेकडे/सत्याकडे निर्देश करतात.

मार्था आणि मरीयेला चमत्कार हवा होता आणि त्यांना त्यांचा चमत्कार प्राप्त झाला. त्यांची विनंती मान्य झाली,त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले. पण योहान सांगतो की ते एक चिन्ह आहे. आणि चिन्हे स्वतःच्या पलीकडे दुसर्‍याच कोणत्यातरी गोष्टीकडे निर्देश करतात,काहीतरी अधिक महत्त्वाचे आणि वास्तविक.

आम्हाला अनेकदा परावर्तन किंवा पुनरुज्जीवन हवे असते;ख्रिस्त पुनरुत्थानाचे अभिवचन देतो. येशू लाजरला पुनरुज्जीवित करतो,शेवटचे आणि सर्वोत्तम चिन्ह;परंतु येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे.

येशू काहीतरी अधिक आणि चांगले देवू करतो. छान जीवन नाही पण नवीन जीवन. तो कथेतील खरा चमत्कार आहे;तो प्रार्थनेचे अंतिम आणि सर्वोत्तम उत्तर आहे. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. पुनरुज्जीवन नव्हे तर पुनरुत्थान. परिवर्तन नाही तर नूतनीकरण. येशूने पाप आणि मृत्यू आणि नरकाचा पराभव केला.

जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला वास्तव,कायमस्वरूपी,विपुल,भरीव,सार्वकालिक जीवन मिळेल. जर आपण मेलो,तरीही आपण ते जीवन अनुभवू. परंतु आताही आपण ते जीवन अनुभवू शकतो कारण आपल्याला माहित असलेले जीवन आणि ज्या मृत्यूची आपल्याला भीती वाटते,त्यापेक्षा ते जीवन मोठे आहे.

हा एक आनंद आहे ज्याची प्रशंसा केवळ ख्रिस्ती लोकच करू शकतात ज्यांनी ख्रिस्तामध्ये असलेले त्यांचे प्रियजन गमावले आहेत. स्वर्गातील गोड आनंदांपैकी एक म्हणजे आपल्या तारणकर्त्याला केवळ समोरासमोर पाहणेच नाही तर,आपल्या पूर्वी यार्देन ओलांडलेल्या,ख्रिस्तामध्ये असलेल्या आपल्या बंधुभगिनींसोबत पुन्हा एकत्र येणे आहे.

१ थेस्सल ४:१३-१४ म्हणते “बंधुजनहो,झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे,ह्यासाठी की,ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील."

दावीद राजाला त्याचा लहान मुलगा मरण पावला तेव्हा त्याला या सत्यामुळे सांत्वन मिळालेले आपण पाहतो. त्याने आत्मविश्वासाने ठामपणे सांगितले की "तो माझ्याकडे परत येऊ शकत नाही पण मी त्याच्याकडे जाईन"(२ शमुवेल १२:२०-२३).

ही एक सकारात्मक बाब आहे,ज्याकडे आपण आपले लक्ष लावलेच पाहिजे विशेषतः जेव्हा आपण हानीकारक वादळी ढगांनी वेढलेले असतो.

आपल्या प्रिय व्यक्तींना "भूतकाळात मृत" म्हणून पाहण्याऐवजी - त्यांना "स्वर्गात पूर्णपणे जिवंत" म्हणून पाहण्यास प्रारंभ करा - आणि समजून घ्या की आम्ही त्यांच्याशी अती अल्पशा कालावधीत पुन्हा एकत्र येऊ.

स्वर्गात कार्यरत असलेल्या सार्वकालिक कालखंडाच्या तुलनेत या पृथ्वीवरील आपला काळ डोळ्याची पापणी लवण्या एवढाही नाही.

संक्षिप्त: जेव्हा मी कब्रस्थानात जातो तेव्हा मला त्या घटकेचा विचार करायला आवडतो जेव्हा मृत त्यांच्या कबरांतून उठतील. ... देवाचे आभार,आमच्या मित्रांना पुरलेले नाही;ते फक्त पेरले जातात! - डीएल मूडी.

प्रार्थना: प्रभु,आम्ही लवकरच आमच्या प्रियजनांसोबत एकत्र येऊ/एकजूट होऊ,या आश्वासनाबद्दल मी तुझे आभार मानतो. आमेन.

पवित्र शास्त्र

दिवस 6दिवस 8

या योजनेविषयी

दुःख कसे हाताळावे?

जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.

More

https://www.facebook.com/ThangiahVijay