दुःख कसे हाताळावे?नमुना
शोक करणे योग्य आहे
आपण ज्यांवर प्रिती करतों,अशी व्यक्ती जेव्हा मरण पावते,तेव्हा निरनिराळ्या भावनांनी आपण भावनावश होतो. नाही,आपणांस रडू येणे किंवा आपण शोक करणे चुकीचे नाही. प्रत्यक्षात सर्व काही देवाच्या नियंत्रणात असते आणि हे असेच बराच काळ चालेल,आम्हाला आता येथे जाणवणाऱ्या वेदना कमी होणार नाहीत.
परमेश्वराला ठाऊक आहे की मरणाला सामोरे जाणे हे किती भयंकर आणि वेदनादायी असू शकते. मरणाबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे याचे चांगले उदाहरण आम्हाला येशूने लाजाराला मरणातून उठविले,यातून पहायला मिळते.
येशू लाजाराच्या कबरेजवळ रडला,त्याद्वारे त्याने आम्हाला हे दाखवीले की दुःखी होणे पाप नाही. त्याने हे दाखविले की,भावनांचा आवेग ही अशी गोष्ट आहे की,तीच्याबद्दल आपणास लाज वाटण्याचे काही कारण नाही.
येशू रडला,जसे आपण रडतो. त्याने आश्रु ढाळले जसे आम्ही ढाळतो. तो भावनेने हेलावला जसे आम्ही भावनेने हेलावतो. येशू रडला,हे दर्शविते की त्याला अंत:करण होते. हे आपणास दर्शविते की आपण अशा देवाची भक्ती करीत नाही जो आम्हाला काही झाले तरी हेलावत नाही किंवा ज्याला कळवळा येत नाही. म्हणून आपल्या चिंता त्याकडे नेण्यास भिऊ नका.
इब्री ४:१५ आम्हास सांगते, "कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही,असा आपला प्रमुख याजक नाही,तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता;"येशूला आपल्या दुःखात कळवळा येतो.
जेव्हा येशूचा प्रिय मित्र आणि मावसभाऊ बाप्तिस्मा करणारा योहान,याचा शिरच्छेद करण्यात आला,तेंव्हा येशू शोकाकुल झाला.
या दोन्ही मृत्युबद्दल येशूची प्रतिक्रिया वेगवेगळी होती. आणि आपण त्याच्या अनुभवावरून आपण शोक कसा करावा हे शिकलो आहोत. मत्तय १४:१३ मध्ये आपणास आढळते की जेव्हा येशूने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मृत्यूबद्दल ऐकले,तेंव्हा ते ऐकून तो तरवात बसून निघाला आणि अरण्यांत एकांती गेला. येशू शोकाकुल झाला. योहानाचे काय झाले ते ऐकून तो खिन्न झाला. त्याची इच्छा होती की त्याने थोडा वेळ एकांतात प्रार्थनेत आणि विचार करण्यात घालवावा.
पुष्कळ वेळा तुम्हाला असे वाटते की अशा शोकाकूल परिस्थिती आपण एकटेच असावे,त्या गोष्टींवर विचार करावा,देवाबरोबर थोडा वेळ घालवावा त्याला पुष्कळ प्रश्न विचारावेत. हे अगदी बरोबर आहे.
परंतू आपण वाचतो,की जेव्हा लोकांना समजले येशू कुठे जात आहे,ते देखील पायी चालत पलीकडे गेले आणि येशूला भेटले.
आपणांस केंव्हा तसे वाटले आहे काय?आपणांस एवढेच करायची इच्छा असते ती म्हणजे आपण एकटेच बाजूला जावे आणि शोक करावा,परंतु जीवनातील मागण्या त्याला परवानगी देत नाहीत?
येशूने अशा परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला?पवित्र शास्त्र सांगते,जेव्हा त्याने लोकसमुदयास पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला आणि लगेच तो त्यातील आजाऱ्यांना बरे करू लागला. जरी येशूला त्याचा प्रिय मित्र गमावल्याचे दुःख होते,त्याच्या दुःखाने त्याला सेवा करण्यास पाठबळ दिले. त्याच्या भावनिक दुःखात, "मला धिक्कार आहे" असा येशूने स्वकेंद्रित विचार करण्यापेक्षा बाह्यवर्ती होऊन लोकांची सेवा केली आणि त्यांच्यावर प्रेम केले.
आपण याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या शोक करण्याने आपले दुःख स्वतःची कीव करण्यात किंवा तिरस्कार करण्यात बदलून जावू नये. आपले दुःख इतरांवर प्रिती करण्यास आणि त्यांची सेवा करण्यास सक्षम करते. तुमचे सर्व दुःख,तुमच्या त्या सर्व भावना त्यांचा उपयोग,ज्यांना येशूच्या प्रितीची तातडीची गरज आहे अशा लोकांना कळवळा दाखविण्यासाठी करावा.
दुःखात असताना जिवनात पुढे जाण्याची हीच गुरुकिल्ली आहे. जितका जास्त वेळ आपण आपल्या आत पाहण्यात घालवू तितके आपण भूतकाळात अडकून राहू. जेव्हा आपण बाहेर पाहू आणि इतरांची सेवा करू लागू,तेव्हा आपण भविष्यात पुढे जाऊं.
संक्षिप्त: देव कोण आहे याबद्दलची उच्च आणि कोरडी चित्रे जेव्हा आम्ही बाजुला ठेऊन देऊ आणि त्याऐवजी ज्यामध्ये देव जो जगाच्या रडण्या बरोबर रडतो,असा येशू ख्रिस्त,त्याकडे पाहू. मगच आपण''देव" या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे हे शोधू शकू. - टॉम राईट.
प्रार्थना: परमेश्वरा,मी तुझे आभार मानतो कारण तू माझे दुःख जाणतोस. माझ्या शोकात मी तुजजवळ येतो,मला मदत कर आणि मला शक्ती दे. - आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay