दुःख कसे हाताळावे?नमुना
मृत्यु हा जीवनाचा एक भाग आहे.
मृत्यू हा नेहमीच असा एक विषय आहे ज्यापासून आपण दूर रहातो.
अनेकांना ते पटत नाही. काहींना याची भीतीही वाटते. पण मृत्यू हा जीवनाचा एक भाग आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटले होते की मृत्यूची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे - "प्रत्येक व्यक्तीपैकी एकाचा मृत्यू होतो." या जीवनात मृत्यू ही एकमेव अटळ गोष्ट आहे.
देवाने आपल्याला कधीच वचन दिले नाही की आपण किंवा आपले प्रियजन मरणार नाहीत. खरं तर,त्याने अगदी उलट वचन दिले - प्रत्येकजण मरतो. इब्री लोकांस पत्र ९:२७ आपल्याला सांगते “ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे."
प्रत्येकजण मरतो. देवाने लोकांना मरू देताना कोणतेही वचन मोडले नाही. त्याने फक्त जे सांगितलेले आहे तो ते घडू देतो. आदाम आणि हव्वेने आपल्या या जगात मृत्यू आणि क्षय आणला तेव्हापासून मृत्यू हा सौद्याचा भाग आहे. म्हणून,आपल्याला मृत्यूसाठी तयार असणे आवश्यक आहे.
योहान ११:११ मध्ये,ख्रिस्त विश्वासणाऱ्यांच्या मृत्यूबद्दल किती प्रेमळपणे बोलतो ते आपण पाहतो. तो लाजरच्या मृत्यूची वस्तुस्थिती अनोख्या सौंदर्य आणि सौम्यतेच्या भाषेत जाहीर करतो---“आपला मित्र लाजर झोपला आहे."
मानसशास्त्रज्ञ आम्हाला सांगतात की थानाटोफोबिया,मृत्यूचे भय,इतर सर्व भयांचे मूळ आहे. जर तुमच्यात भयाचा आत्मा असेल तर तो तुम्हाला देवाकडून मिळाला नाही. तुम्ही तुमच्या जीवनातील भयाची जागा विश्वासाने काढून टाकू शकता. विश्वास आला की भीती जाते! विश्वास आला की भीती सोडून जाते!
ज्यांनी त्याला तारणारा म्हणून स्वीकारले आहे त्यांच्यासाठी येशूने आधीच मृत्यूची नांगी काढून टाकली आहे (१ करिंथ १५:५५-५७). मृत्यूवरील येशूच्या विजयाद्वारे,तो “जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करतो." (इब्री २:१४-१५). प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या देवाच्या मुलासाठी,मृत्यूची कोणतीही भीती वाटत नाही,परंतु या पृथ्वीवरील जीवनाच्या मर्यादांमधून स्वर्गीय जीवनाच्या मुक्तीमध्ये युक्त होण्याची गौरवशाली अपेक्षा आहे. पौलाने म्हटल्याप्रमाणे, “मरणे हा लाभ आहे” (फिली. १:२१).
जेव्हा कर्करोगाने डोनाल्ड बर्नहाऊसच्या पत्नीला घेरले आणि ती त्याला १२ वर्षाखालील तीन मुलांसह सोडून गेली,तेव्हा त्याने आपल्या मुलांसाठी आशेचा संदेश कसा द्यायचा याचा विचार केला. जेव्हा ते अंत्यसंस्काराच्या विधीसाठी जात होते,तेव्हा एक मोठा ट्रक त्यांच्या कारवर एक लक्षणीय सावली टाकून त्यांच्या पुढे गेला. खिडकीबाहेर पाहत असलेल्या आपल्या सर्वात मोठ्या मुलीकडे वळून बार्नहाऊसने विचारले, "मला सांग प्रिये,तू त्या ट्रकखाली चिरडून जाणे पसंद करशील की त्या ट्रकच्या सावलीखाली?"वडिलांकडे कुतूहलाने पाहत तिने उत्तर दिले, "सावलीखाली,मला वाटते. ती मला इजा करु शकणार नाही." आपल्या सर्व मुलांशी बोलताना ते म्हणाले, "तुमची आई मृत्यूने नाही तर मृत्यूच्या सावलीने व्याप्त झाली आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही."
जन्मापासूनच मृत्यूची उलटी गिनती सुरू होते. बायबल मृत्यूबद्दल बोलण्यास घाबरत नाही: जे जसे आहे ते सांगते. परंतु ख्रिस्ती धर्माच्या अगदी केंद्रस्थानी येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान आहे.
वधस्तंभ,जिथे येशू जगाच्या दु:खात आणि क्लेशांत प्रवेश करातो,त्याग आणि मृत्यूची खोली अनुभवतो. पुनरुत्थानात,येशू मृत्यूची शक्ती तोडतो,यापुढे मृत्यू मानवतेवर रेंगाळणारा पूर्णविराम नाही,हे मृत्यूस येशूमध्ये पुन्हा परिभाषित केले आहे आणि तो आपल्याला सार्वकालीक जीवन देतो.
जर आपले ईश्वरपरिविज्ञान केवळ वधस्तंभाचे असेल,तर आपण सुवार्तेची आशा आणि आनंद गमावतो.
जर आपले ईश्वरपरिविज्ञान केवळ पुनरुत्थानाचे असेल तर आपण दुःख समजू शकत नाही किंवा त्याचा काही अर्थ काढू शकत नाही,त्याच्याबरोबर बसणे सोयीस्कर वाटणे हे दूरच! किंवा दुःख स्विकारणे दूरच! आम्हाला वधस्तंभ आणि पुनरुत्थान या दोन्हीची गरज आहे.
संक्षिप्त: जेथे पाप काढून टाकले गेले आहे तेथे मृत्यू केवळ पृथ्वीवरील जीवनात व्यत्यय आणू शकतो आणि स्वर्गीय जीवनाची जागा दाखवू शकतो. - जॉन मॅकआर्थर
प्रार्थना: प्रभु,मी तुझे आभार मानतो की मृत्यू हा शेवट नाही तर जीवनाची सुरुवात आहे. आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay