YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दुःख कसे हाताळावे?नमुना

दुःख कसे हाताळावे?

10 पैकी 4 दिवस

दु:खाच्या मध्यभागी आशा.

देव अजूनही पण! हा उद्गार काढू शकतो.

जेव्हा येशूला लाजर आजारी असल्याची माहिती मिळाली. या बातमीवर येशूचा प्रतिसाद होता “हा आजार मृत्यूने संपणार नाही. नाही,ते देवाच्या गौरवासाठी आहे जेणेकरून त्याद्वारे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे.”

दोन दिवसांनंतर त्याने त्यांना स्पष्टपणे सांगितले, “लाजर मेला आहे आणि तुमच्यासाठी मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद आहे,जेणेकरून तुम्ही विश्वास ठेवावा. पण आपण त्याच्याकडे जाऊ या.”

तो जाण्याची वाट पाहत होता “की त्यांनी विश्वास ठेवावा.” देवाच्या विलंबाचा नेहमीच एक उद्देश असतो. विश्वासाची खूप खोली आहे जीच्यापर्यंत त्याला आपल्याला न्यायचे आहे. त्याने त्यांना आधीच दाखवून दिले होते की तो बरे करू शकतो;आता तो त्यांना शिकवत होता की त्याचा मृत्यूवरही अधिकार आहे. त्याने उशीर केला तरच हे शक्य होईल.

हे शक्य आहे की देवाच्या वेळेनुसार,देवाच्या अनुपस्थितीत,तो तुम्हाला काहीतरी मोठे,काहीतरी अधिक अर्थपूर्ण,आधीच माहित नसलेले असे काहीतरी शिकवू इच्छितो?

हे स्वीकारण्यासाठी तुम्ही स्वतःला नम्र करू शकता का?तुमचा असा विश्वास आहे का की जर देव सर्वकाही निर्माण करण्याइतका मोठा आहे,तर तो तुम्हाला समजू शकत नसलेल्या तुमच्या दुःखाला अनुमती देण्याइतका मोठा आहे?देव त्याच्या प्रेमात,न्यायात आणि सार्वभौमत्वात परिपूर्ण आहे हे जाणून,सुरुवातीपासून शेवट पाहतो आणि तो काय करत आहे हे जाणतो,हे तुम्हाला समजू शकत नसतानाही तुम्हाला विश्वास ठेवण्यास मदत होऊ शकते का?

तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तरीही तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे?

तुम्हाला वाटेल की हे सर्व संपले आहे. पण तरीही देव म्हणतो, “त्याद्वारे माझ्या नावाचे गौरव होईल.” यावर तुमचा विश्वास आहे का?

योहान १७:२४ मधील वचनांवर बारकाईने आणि प्रार्थनापूर्वक केलेले विचार आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असू द्यावेत असे वाटते,येशूच्या इच्छेचा काळजीपूर्वक विचार करा “हे माझ्या पित्या,माझी अशी इच्छा आहे की,तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे;ह्यासाठी की,जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा;कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस.

त्याचे लोक त्याच्याबरोबर असावेत अशी त्याची इच्छा आहे. येशू स्वर्गातून राज्य करत असताना तो पूर्णपणे आनंदी आणि समाधानी आहे,परंतु योहान १७ मधील त्याच्या प्रार्थनेनुसार,त्याची अजूनही एक विशिष्ट इच्छा अपूर्ण आहे: ती ही की जे घर त्याने त्याच्या लोकांसाठी आधीच तयार केले आहे त्या घरात त्याचे लोक त्याच्याजवळ असावेत. (योहान १४:२-४). जेव्हा एखादी देवाला ओळखणारी / विश्वास ठेवणारी आमची प्रिय व्यक्ती मरण पावते,तेंव्हा आपण प्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की,पित्याने येशूची प्रार्थना ऐकली आहे. देवाला आमच्या प्रियाजनांच्या मृत्यूवर सर्वाधिकार आहे,आणि त्याचे हेतू आम्हाला केंव्हा कळू शकणार नाहीत,परंतु आपण या सत्याला चिकटून राहू शकतो की येशूने त्याच्या पित्याला त्याच्या लोकांना घरी आणण्यासाठी प्रार्थना केली आहे. जेव्हा एक ख्रिस्ती मरण पावतो,तेव्हा पिता त्याच्या मुलाच्या विनंतीला उत्तर देतो.

आपण किमान एवढे तरी म्हणू शकतो: जेव्हा एखादी प्रिय व्यक्ती मरण पावते,तेव्हा आपण जेवढे गमावले आहे त्यापेक्षा बरेच अधिक येशूला मिळते.

होय,आम्ही गमावले आहे. त्या प्रिय व्यक्तीसोबत आम्ही यापुढे कधीही गोड सहवास अनुभवू शकणार नाही. नुकसानीची तीव्रता अनेकदा आपल्या शब्दांत करणे कठीण. पण तोटा येशूच्या वचनांच्या पलीकडे कधीच नाही: “पित्या,ज्यांना तू मला दिले आहेस त्यांनीही माझा गौरव पाहण्यासाठी मी जिथे आहे तिथे माझ्याबरोबर असावे,अशी माझी इच्छा आहे.”

आपण बादल्याभर अश्रू गाळू शकतो,परंतु आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू येशूच्या प्रार्थनेच्या उत्तरापेक्षा कमी नाही हे लक्षात आल्यावर आपल्या गालावरून वाहणारे अश्रूंचे प्रवाह आनंदाने चमकू लागतील.. येथे आपण आशा पाहतो.

संक्षिप्त: ख्रिस्ती कधीही "गुडबाय" म्हणत नाहीत;फक्त "आम्ही पुन्हा भेटत नाही तोपर्यंत" - वुड्रो क्रॉल.

प्रार्थना: प्रभू मी तुझे आभार मानतो की दु:खामध्ये देखील आम्ही आशा बाळगू शकतो की लवकरच आपण आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटू. आमेन

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

दुःख कसे हाताळावे?

जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.

More

https://www.facebook.com/ThangiahVijay