दुःख कसे हाताळावे?नमुना
'जर'पासून'मी विश्वास धरतो'पर्यंत जाणे.
मार्था आणि मरीया या दोघी येशूला कबरेजवळ पहिल्यांदा भेटल्या तेव्हा दोघ्याही येशूला म्हणाल्या, “तू इथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
येशू त्यांना जर च्या विश्वासापासून माझा विश्वास आहे,पर्यंत घेऊन जाऊ इच्छित होता.
जेव्हा येशूने तिला शांतपणे आणि प्रेमाने सांगितले की, “तुझा भाऊ पुन्हा उठेल,”तेव्हा तिने उपहासाने उत्तर दिले, “हो,होय,मला ते माहीत आहे!” पण तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर ती खरंच म्हणत होती, "हे भयंकर घडू नये म्हणून तू मला इथे हवा होतास."
दरम्यान,येशू म्हणत होता, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे;जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल;आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही",मग येशूने तिला अतिशय मार्मिक असा प्रश्न विचारला, "मार्था,तुझा यावर विश्वास आहे का?”ज्याला मार्थाने उत्तर दिले, “होय,प्रभु माझा विश्वास आहे.”
पवित्र शास्त्र स्पष्ट करते की मृत्यूनंतर,अक्षरशः दोन स्थळे सर्व मानवतेची वाट पाहत आहेत. एक अनंतकाळचे जीवन आणि अनंतकाळचा मृत्यू (रोम ६:२३). जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन मिळते. जेव्हा एखादा विश्वासणारा मरतो तेव्हा त्यांचे शरीर कबरेत राहते,परंतु त्यांचा आत्मा शुध्दीवर असलेला असा आणि ताबडतोब येशूच्या उपस्थितीत नेला जातो. आपल्या आत्म्याचे तात्काळ इष्टस्थळ स्वर्ग आहे,कारण येशू स्वतः स्वर्गात गेला (प्रेषित १:११) आणि सध्या तेथे आपल्यासाठी घर तयार करीत आहे.
जेव्हा आपण मरतो तेव्हा आपल्याला पुर्ण जागेपणामध्ये आणि ताबडतोब स्वर्गात आपल्या तारणकर्त्याच्या उपस्थितीत नेले जाते.
आमचे प्रियजन जे मरण पावले आहेत ते आमच्या आधी स्वर्गात गेले आहेत. ते आता भूतकाळात नाहीत - ते भविष्यात आहेत.
आपण आपल्या प्रियजनांच्या मृत्यूकडे ज्या "दृष्टीकोनातून" पाहतो तो आपण बदलला पाहिजे. त्यांना "भूतकाळातील मृत" म्हणून पाहण्याऐवजी - आपण त्यांना "स्वर्गात पूर्णपणे जिवंत" म्हणून पाहणे सुरू केले पाहिजे आणि हे समजून घेतले पाहिजे की आम्ही त्यांच्याशी पुन्हा एकदा फार कमी कालावधीत एकत्र येणार आहोत.
येशू स्वर्गाबद्दल खूप बोलला. त्याने स्वर्गाबद्दल ईश्वर परिविज्ञानिक अमूर्त स्थान म्हणून शिकवले नाही. त्याने त्याचे घर असे वर्णन केले - एक सत्य. त्याचा पिता या ठिकाणी आहे (लूक १०:२१),जिथे सर्वकाही त्याला हवे तसे आहे (मत्तय ६:१०). त्याने त्याच्या अनुयायांना तेथे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले (वचने १९-२१). तो तेथून आला (योहान ३:१३) आणि परत जाण्याची त्याला उत्कंठा होती आणि त्याने त्याच्या अनुयायांना त्याच्याबरोबर राहण्यासाठी तेथे नेण्याचे वचन दिले (१४:१-३).
येशूने मार्थाला विचारलेला प्रश्न तिला मानवतेला विभाजित करणार्या निर्णयापर्यंत आणतो: “तुझा यावर विश्वास आहे का?” (योहान ११:२६).
हा अत्यंत साधा व्यवहार आहे जो दुखावलेल्या अंतःकरणात स्वर्गाची आशा आणतो. यात दोन भाग आहेत - एक आपली जबाबदारी आहे,दुसरे त्याचे वचन आहे. जर तुम्ही यावर विश्वास ठेवला तर तो तुमचे पुनरुत्थान आणि तुमचे जीवन असेल.
मार्थाच्या उत्तराने तिच्या येशूवरील विश्वासाला पुष्टी मिळते.
"होय प्रभूजी,जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.”
(योहान ११:२७)
मार्थाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस तो दिवस नव्हता ज्या दिवशी येशूने लाजरला मेलेल्यांतून उठवून तिच्या तातडीच्या वेदना कमी केल्या होत्या,तर तो दिवस होता जेव्हा तिने प्रभु येशूसमोर उभे राहून त्याच्यावर विश्वास ठेवला होता. हा तो दिवस होता ज्या दिवशी तिला जीवन मिळाले,ती,तिची बहीण आणि तिचा भाऊ जवळजवळ दोन हजार वर्षांपासून येशूसोबत दररोज स्वर्गात आनंद घेत आहेत.
हा दिवस तुमच्या जीवनातील देखील सर्वात महत्वाचा दिवस असू शकतो,जसे तुम्ही येशूवर तुमचा उद्धारक व प्रभु म्हणून विश्वास ठेवता,तुम्हाला माहित आहे की एक दिवस लवकरच तुम्ही प्रभूला भेटाल आणि त्याच्यावर विश्वास ठेवलेल्या आपल्या सर्व प्रियजनांसोबत जे आमच्या पुढे गेले आहेत,अनंतकाळ व्यतीत कराल.
संक्षिप्त: "विश्वास ही एक कला जिला आपण पकडून राहतो जी आपल्या तर्कशक्तिने आपल्या बदलत्या मनःस्थितीतही स्वीकारली आहे." - सी.एस.लुईस.
प्रार्थना: प्रभु मी प्रार्थना करतो की तू माझ्या दु:खाचे आनंदात रूपांतर कर,कारण तू कोण आहेस यावर माझा विश्वास आहे आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आमेन
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay