YouVersion लोगो
सर्च आयकॉन

छळात भितीचा सामना करणेनमुना

छळात भितीचा सामना करणे

7 पैकी 4 दिवस

भीतीच्या वेळेस देवाची वाणी

कधी कधी आपण छळाच्या अत्यंत भिती दायक परिस्थिती पाहतो. बरेचदा,आपल्याकडे लपण्यासाठी दरवाजे किंवा आश्रयस्थान नसतात. परंतू आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ज्या देवाची आपण सेवा करतो तो खरा जीवंत देव आहे आणि तो तुम्ही आहात तिथे तुमच्या सर्व भितीतयेऊन उभा राहिल तुम्हाला त्याची ‘‘शांती’’ देईल. ज्या देवाची आपण सेवा करतो त्याची ती महानता आहे. येशू आपल्याला जी शांती देतो ती सर्व बुध्दि समजाच्या पलिकडे आहे,आपण आपल्या सर्व परिस्थितीत त्या शांतीवर विसंबून राहीले पाहिजे. लक्षात ठेवा की त्याने आपल्याला वचन दिले आहे.‘‘मी आपली शांती तुम्हास देतो;जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही,तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये’’

प्रेषित पौलाने देखील अनेक वेळेस साक्ष दिली की पुढे जाण्याच्या त्याच्या संशयाच्या समयी कशा रीतीने पवित्र आत्मा त्याच्या सोबत पुढे जाण्यासंबंधी स्पष्ट बोलला. प्रेषित28मध्ये सर्वांनी आशा सोडली होती व मरणाची अपेक्षा करत होते तेव्हा प्रभूच्या स्पष्ट आवाजाने पौलाला प्रोत्साहित केले. केवळ त्यालाच प्रोत्साहन मिळाले नाही तर तो, जो प्रभू त्याच्याबरोबर बोलला त्याच्या वरील त्याच्या विश्वासामूळे तो त्याच्या सोबत्यांनाही प्रोत्साहित करू शकला.

वचनबध्द व्हा आणि प्रार्थना करा.

तुमच्या सर्वात खोल भिती मध्ये तुम्ही त्याच्या शांतीवर विसंबून राहू शकता काय?आपल्या भितीच्या मध्ये आपण त्याची शांती वाणी ऐकू शकतो काय?

जेव्हा आपण भितीदायक परिस्थितीचा सामना करतो,जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण आपला प्रभू येशू जो आपल्या जीवनातील परिस्थितीत ‘‘शांतीची’’ घोषणा करू शकतो त्याची आठवण ठेवावी म्हणून प्रार्थना करू या.

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

छळात भितीचा सामना करणे

जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Persecution Relief चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://persecutionrelief.org/