छळात भितीचा सामना करणेनमुना
भितीच्या वेळेस धैर्यपूर्ण प्रतिसाद
मला पवित्र शास्त्रातील दोन नायकांकडे लक्ष वेधायचे आहे ज्यांनी भितीला जिंकू न देता ख्रिस्ताचे रक्षण करण्यासाठी स्वतःचा प्राण धोक्यात टाकला. पहिली व्यक्ति आहे जुन्या करारातील मोशे,आणि दुसरी व्यक्ति अरिमथईकर योसेफ.
आपण पाहू शकतो की मोशे सत्यासाठी संकटांसमोर खंबीरपणे उभा राहिला;त्याने फारोची उपस्थिती सोडली आणि पापाचे क्षणभंगुर सुख भोगण्याएवजी मिद्यान देशात राहणे पसंत केले. त्याचे लक्ष राजाच्या महलातील संपत्ती पेक्षा दुःख सहन करणा-या देवाच्या लोकांवर होते. हाच मोशे जो भितीमूळे मिद्यान देशात पळून गेला होता तो नंतर पुन्हा त्याच फारोकडे देवाच्या लोकांना त्याने सोडावे म्हणून विनंती करण्यासाठी गेला. अधार्मिक वातावरणात वाढलेला असूनही त्याला त्याची ओळख व त्याचे बोलावणे याबद्दल खात्री होती. तो त्याच्या लोकांसाठी उभा राहिला तर त्याचे काय होईल याबद्दल तो अत्यंत घाबरलेला असेल परंतू तरीही त्याने त्याचा जीव,त्याचा आराम,ओळख आणि त्याचे भविष्य धोक्यात टाकत,ते केले.
कधी कधी देव आपल्याला काहीतरी उल्लेखनीय करण्यासाठी सांगतो ज्यात नेहमी जोखीम असते. अशीच एक व्यक्ति अरीमथाईकर योसेफ आहे,ज्याने ख्रिस्तावरील त्याच्या प्रेमासाठी त्याचा जीव धोक्यात टाकला. जरी येशूचे शिष्य भितीने पळाले होते तरी तो येशूचे शरीर मागण्यासाठी धैर्याने पिलाताकडे गेला. तो केवळ त्याचा व्यवसायच नव्हे तर त्याचा जीव सुध्दा धोक्यात टाकत होता. तो भीती मूळे गुप्त विश्वासी होता परंतू आता त्याने वधस्तंभ पाहिला,तो लपलेला नाही!
वचनबध्द व्हा आणि प्रार्थना करा.
जेव्हा देव तुम्हाला जोखीम पत्करून काही करायला सांगतो तेव्हा तुम्ही त्यासाठी स्वतःला समर्पित करू शकता काय?
प्रार्थना करा की देवाने तुम्हाला पुरेशी कृपा व धैर्याने भरावे की तुम्ही त्याच्या नावासाठी कोणतीही जोखीम घ्याल.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Persecution Relief चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://persecutionrelief.org/