छळात भितीचा सामना करणेनमुना
भितीच्या वेळेस पवित्र आत्मा
पेत्र व इतर शिष्य या आधी वधस्तंभापासून पळून गेले होते,नंतर त्यांनी ते स्वीकारले आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त केल्यावर कित्येकांनी ख्रिस्तासाठी धैर्याने त्यांचे जीवन दिले. अभिषेकामूळे साधारण अनुयायी असाधारण व्यक्ति बनले ज्यांनी जगाला बदलले. भितीच्या वेळेस,देवाचा पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताने अभिवचन दिलेला सर्वात मोठा सांत्वनदाता आणि सल्लागार,आहे,तो आपल्या अगदी जवळ आहे. तो प्रत्येक भितीवर विजय मिळविण्यासाठी आपल्याला त्याच्या अभिषेकाने भरतो.
प्रेषित पौल हा करिंथ येते अत्यंत मूर्तीपूजक व अनैतिकतेने वेढलेला होता आणि जेव्हा शुभवर्तमान सांगितले जात होते तेव्हा त्याच्या विरूघ्द खूप विरोध होता. हे सर्व हाताळत असतांना पौलाला भितीने शांत राहून सुर्वाता प्रसार सुरू न ठेवण्याचा मोह झाला असेल. देव पौलाच्या गरजेच्या वेळी त्याची भेट घेतो आणि दृष्टांताच्या द्वारे त्याला प्रसार सुरू ठेवण्यासाठी व घाबरू नये म्हणून प्रोत्साहन देतो. देवाकडे पौलासाठी मोठया योजना होत्या आणि तो पौलाचे संरक्षण करेल असे सांगून त्याने त्याचे सांत्वन केले. तसेच आपण सुध्दा छळाच्या मध्ये निराश होऊ आणि आपल्याला भिती वाटेल आणि शांत राहण्याचा मोह होईल परंतू पवित्र आत्मा आपल्याला प्रोत्साहित करतो की आपण धैर्याने आव्हानांना न जुमानता सुर्वाता सांगावी,कारण त्याने वचन दिले आहे की तो आपल्या बरोबर राहील व त्याचा अभिषेक आपल्याला सक्षम करेल.
वचनबध्द व्हा आणि प्रार्थना करा.
जेव्हा आपण घाबरतो किंवा आपल्याला शांत राहण्याचा मोह होतो तेव्हा आपल्याला पवित्र आत्म्याची उपस्थिती जाणवते काय,जो आपल्याला नेमून दिलेले जे कार्य आहे ते करत राहण्यासाठी बळ देतो?
प्रार्थना करू की प्रभूने आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने भरावे आणि छळाच्या प्रत्येक भिती दायक क्षणात आपल्याला बळ द्यावे जेणे करून आपण घाबरू नये आणि शेवटपर्यंत विश्वासूपणे त्याची सेवा करत राहू.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Persecution Relief चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://persecutionrelief.org/