YouVersion लोगो
सर्च आयकॉन

छळात भितीचा सामना करणेनमुना

छळात भितीचा सामना करणे

7 पैकी 5 दिवस

भितीच्या वेळेस आश्वासन

येशूने इशारा दिला की दुःख टाळणार नाही,परंतू त्याने आपल्याला हाही इशारा दिला की आपण त्याला घाबरू नये. तो भविष्य करतो की सैतान छळ प्रवृत्त करेल आणि त्याची मंडळी त्याच्या समोर टिकाव धरेल. येशू सात सोनेरी दिव्याच्या समयीमध्ये चालतो आणि तो स्मुर्णा येथील मंडळीला संबोधतो. तो मंडळीला सांगतो की सैतान त्यांच्यावर जे संकट व छळ आणणार आहे त्याला त्यांनी घाबरू नये. आपण त्याचे लोक आहोत,आणि कोणीही आपल्याला त्याच्या हातातून हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून तो आपल्याला आश्वासन देतो की,ते आपली कोणती परीक्षा घेतील किंवा आपल्याला तुरूंगात किंवा इतरत्र काय होईल याची आपण काळजी करू नये.

संकट असले तरी,येशूने असे बोलून आपले सांत्वन केले की तो त्यातून आपल्या सोबत सदैव राहिल. जे विश्वासू राहतील त्यांचे बक्षीस जीवनी मुगुट आहे,जो अविनाशी व सार्वकालिक आहे. प्रियांनो आपण सांत्वन ठेवू की आपले दुःख व्यर्थ नाही आणि आपण स्वर्गीय प्रतिफळ प्राप्त करणार आहोत.

वचनबध्द व्हा आणि प्रार्थना करा.

तुमचे,तुमच्या कुटुंबाचे किंवा इतर विश्वासणा-यांचे काय होईल याची तुम्ही चिंता करता काय?तुमच्या भितीच्या मध्ये तुम्ही प्रभूच्या सार्वकालिक बक्षीसांवर मनन करू शकता.

प्रार्थना करा की तुमच्या भिती व छळाच्या मध्ये तुम्हाला सार्वकालिक बक्षीसांची आठवण होईल.

पवित्र शास्त्र

दिवस 4दिवस 6

या योजनेविषयी

छळात भितीचा सामना करणे

जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Persecution Relief चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://persecutionrelief.org/