छळात भितीचा सामना करणेनमुना
भितीच्या वेळेस आश्रय
दावीदाला देवाच्या मनासारखा माणूस म्हणून ओळखले जात असे,तरी दावीदाला अनेक संघर्ष करावे लागले. त्याचे अनेक शत्रू होते जे त्याचे नाव खराब करू पाहत होते व त्याला मारण्यासाठी कट करीत होते. या सर्व परिस्थितीत दावीदाने नेहमी देवाकडे पाहिले. अन्यायकारक निंदा व भयप्रद परिस्थिीती यामूळे सतत भिती वाटणे व रात्रीची झोप उडणे सामान्य आहे,आमचा छळ करणारे आमचा जीव घेऊपाहतात,आणि आपल्या प्रत्येक वळणावर आपल्याला अन्यायकारक धमक्यांचा सामना करायला लावतात. आपण नेहमी लक्षात ठेवावे की आपण एकटे नाही. जरी ते आपल्या बद्दल खोटे बोलत असले,आपल्या विरूध्द कट करत असले आणि आपला जीव घेऊपाहत असले तरी आपण लक्षात ठेवावे की आपल्या देवाच्या ठायी आपल्यला आश्रय आहे. जसे दावीदाने आपल्या देवाकडे पाहिले तसेच आपणही देवा कडे पाहवे.
वचन59:1-2जेव्हा शौलाने दावीदाच्या घरावर पाळत ठेवून त्याला मारण्यासाठी दूत पाठविले त्या वेळे विषयी सांगते. दावीदाला त्याचा जीव वाचविण्यासाठी पळून जावे लागले. दावीद या वेळी भारावून गेला होता आणि त्याने आदराने देवाचा धावा केला. धोक्याच्या वेळेस किंवा भ्रमाच्या वेळेस देव त्याच्या आत्म्यासाठी मजबूत गड आहे हे त्याला माहित होते. आपण आज ज्या परिस्थितीचा सामना करत आहे त्यात आपण दावीदाकडून शिकू शकतो. जेव्हा आपले शत्रू आपल्या विरूध्द उभे होतात तेव्हा त्या परिस्थितीमूळे आपण भारावून जातो,परंतू आपण नेहमी देवाला हाक मारू शकतो,कारण तो आपला मजबूत गड आहे आणि संकटसमयी सदा सहाय करणारा आहे.
वचनबध्द व्हा आणि प्रार्थना करा.
जेव्हा छळाची भिती तुमच्यावर पकड धरते तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद द्याल?ख्रिस्त तुमचा मजबूत गड आहे काय?
प्रार्थना करू की जेव्हा आपले शत्रू आपल्या विरूद्ध उठतात आणि आपण भारावून जातो तेव्हा आपण आपल्या प्रभूचा धावा करू आणि त्याला आपला मजबूत गड होवू देऊ,आणि जेव्हा आपण अशा परिस्थितीचा सामना करू तेव्हा आपण देवाकडे पाहू आणि त्याच्या ठायी आश्रय मिळवू.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Persecution Relief चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://persecutionrelief.org/