तेव्हा त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या बिर्हाडी आले; त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विषयाची फोड करत होता. त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर कित्येक विश्वास ठेवीनात. त्यांचे आपसांत एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले : “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याच्या द्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला; ते असे की, ‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही; व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही
प्रेषितांची कृत्ये 28 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 28
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 28:23-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ