मुलांसाठी बाइबलनमुना
जेव्हा येशू पृथ्वीवर राहत होता, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना स्वर्गाविषयी सांगितले. तो त्याला “माझ्या पित्याचे घर” म्हणत असे, आणि सांगत असे की तिथे अनेक महाल आहेत. महाल हे एक मोठे, सुंदर असे घर आहे. स्वर्ग हे पृथ्वीवरील कोणत्याही घरापेक्षा मोठे आणि जास्त सुंदर आहे.
येशू म्हणाला, “मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे. आणि जर मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, तर मी परत येईन आणि तुम्हांला माझ्यामध्ये स्वीकारीन.” मरणातून वर आल्यानंतर येशू स्वर्गात गेला. त्याचे शिष्य पाहत असता, एका ढगाने येशूला वर उचलले आणि त्यांच्या दृष्टीपासून दूर नेले.
तेव्हा पासून, ख्रिस्ती लोकांनी येशू परत येणार व त्यांचा स्वीकार करणार ह्या त्याच्या वचनाचे नेहमीच स्मरण ठेवले आहे. येशूने म्हटले की तो अकस्मात परत येणार, जेव्हा अपेक्षा खूपच कमी असेल. पण तो येण्यापूर्वी मरण पावणा-या ख्रिस्ती लोकांचे काय? बाइबल सांगते की ते थेट येशूजवळ जातात. शरीरात अनुपस्थित होणे म्हणजेच प्रभूपाशी उपस्थित होणे आहे.
बाइबलमधील शेवटचे पुस्तक “प्रकटीकरण” आम्हांला स्वर्ग किती सुंदर आहे ते सांगते. सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे, एका विशेष प्रकारे, स्वर्ग हे ईश्वराचे घर आहे. ईश्वर सर्वत्र आहे, पण त्याचे सिंहासन स्वर्गात आहे.
देवदूत आणि अन्य स्वर्गीय प्राणी स्वर्गात ईश्वराची पूजा करतात. तसेच, ईश्वराचे लोक, जे मरण पावून स्वर्गात गेले आहेत तेही ईश्वराची पूजा करतात. ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी ते विशेष प्रार्थना गीते गातात.
ते गात असलेल्या एका गीतामधील काही शब्द इथे आहेत: तू योग्यतम आहेस, कारण तू आम्हांला मुक्त केलेस व ईश्वरापाशी पोहोचविलेस, प्रत्येक जमाती व प्रत्येक राष्ट्रासाठी तू तुझे रक्त वाहिलेस आणि आमच्या ईश्वरासाठी आम्हांला राजा आणि पुजारी बनविलेस. ([रेव्ह. 5:9)
बाइबलातील सर्वांत शेवटच्या पानांवर स्वर्गाचे वर्णन “नवे जेरूसलेम” असे केले आहे. ते खूप खूप मोठे आहे, व बाहेरून उंच भिंत आहे. ही सूर्यकांत मण्यांची भिंत स्फटिकासम स्वच्छ आहे. ह्या भिंतीचा पाया सौंदर्यपूर्ण रंगांनी चमकणा-या रत्नांनी व किंमती दगडांनी आच्छादलेला आहे. शहराचा प्रत्येक दरवाजा एकाच विशाल मोत्यापासून बनविला आहे!
मोत्यांचे हे विशाल दरवाजे कधीही बंद नसतात. चला आत जाऊन सभोवताली एक नजर टाकूया ... व्वा!स्वर्ग आतून खूपच सुंदर आहे. हे शहर शुद्ध सोन्याचे बनविले आहे, जसे स्वच्छ काच. रस्ते सुद्धा सोन्याचे बनविले आहेत.
ईश्वराच्या सिंहासनाजवळून एक सुंदर, जीवनरसाची स्वच्छ नदी वाहत आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवन वृक्ष आहे जो पहिल्यांदा ईडनच्या बागेत सापडला होता. हा वृक्ष अतिविशेष आहे. त्याला बारा वेगवेगळी फळे आहेत, प्रत्येक महिन्याला वेगळे. आणि जीवनवृक्षाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी आहेत.
स्वर्गाला प्रकाशासाठी सूर्य किंवा चंद्राची आवश्यकता नाही. ईश्वराची स्वकिर्ती त्याला सुंदररित्या प्रकाशमान करते. तिथे कधीही रात्र नसते.
स्वर्गातील प्राणीसुद्धा वेगळे आहेत. ते सर्व पाळीव आणि मैत्रीपूर्ण आहेत. लांडगे आणि शेळी एकत्र गवत खातात. विशालकाय सिंहसुद्धा बैलांप्रमाणे चारा खातात. प्रभू म्हणतात, “ते माझ्या सर्व पर्वतांना कधी दुःखी करणार नाहीत किंवा नाशही करणार नाहीत.”
आम्ही जसे सभोवताली नजर टाकतो, तसे आम्ही पाहतो की स्वर्गामध्ये काही गोष्टी नाहीत. रागीट शब्द ऐकू येत नाहीत. कोणीही भांडत नाही किंवा स्वार्थी नाही. दरवाजांना कुलूप नाही, कारण स्वर्गात चोरच नाहीत. तिथे खोटारडे नाहीत, हत्यारे नाहीत, चेटके किंवा अन्य दुष्ट लोक नाहीत. स्वर्गामध्ये कोणत्याही प्रकारचे पाप नाही.
स्वर्गामध्ये ईश्वरा समवेत आणखी अश्रू नाहीत. कधीकधी ईश्वराचे लोक ह्या जीवनातील खूप दुःखामुळे रडतात. स्वर्गामध्ये ईश्वर सर्व अश्रू पुसतो.
स्वर्गामध्ये मरणही नाही. ईश्वराचे लोक नेहमी प्रभू बरोबरच असतील. तिथे आणखी कोणतेही दुःख नाही, आणखी रडणे नाही, आणखी वेदना नाही. आजार नाही, दुरावा नाही, अंत्येष्टी नाही. स्वर्गामध्ये प्रत्येकजण ईश्वरासमवेत सतत आनंदी आहे.
सर्वांमध्ये उत्तम म्हणजे, मुले आणि मुलींसाठी (आणि तरूणांसाठीही), ज्यांनी येशू त्यांचा तारणहार असल्याचा विश्वास ठेवला आहे आणि त्याला त्यांचा प्रभू मानून त्याची आज्ञा मानली आहे, स्वर्ग त्यांच्यासाठी आहे. स्वर्गात लॅम्बचे जीवनाचे पुस्तक नावाचे एक पुस्तक आहे. ते लोकांच्या नावांनी भरलेले आहे. तुम्हांला माहित आहे का तिथे कोणाची नावे लिहिली आहेत ते?येशूमध्ये विश्वास ठेवतात त्या सर्व लोकांची. तिथे तुमचे नाव आहे का?
बाइबलमधील स्वर्गासंबंधीचे शेवटचे शब्द म्हणजे सुंदर निमंत्रण आहे. “आणि आत्मा आणि वधु म्हणतात, ‘ या!’ आणि जो ‘या!’ असे ऐकतो त्याला येऊ द्या, आणि जो तहानलेला आहे त्याला येऊ द्या. आणि ज्याची इच्छा असेल त्याला जीवनाचे पाणी मोफत नेऊ द्या.”
समाप्त
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php