मुलांसाठी बाइबलनमुना
ईश्वराने सर्व गोष्टी बनविल्या!जेव्हा ईश्वराने पहिला माणूस, आदम बनविला,तो त्याची बायको इव्हसमवेतईडनच्या बागेत राहत होता. ईश्वराच्या आज्ञेत आणि त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेत ती दोघेहीआनंदात होती, की एक दिवस...
“ईश्वराने तुला प्रत्येक झाडावरील खाऊ नकोस असे सांगितले आहे का?” सर्पाने इव्हला विचारले. “आम्ही प्रत्येक फळ खाऊ शकतो, फक्त एक सोडून” इव्हने उत्तर दिले. “जर आम्ही ते फळ खाल्ले किंवा त्याला स्पर्श केला तर आम्ही मरणार.” “तुम्ही मरणार नाही” सर्पाने कपटहास्यकेले. “तुम्ही ईश्वरासारखे होणार” इव्हला त्या झाडाचे फळ हवे होते. तिने सर्पाचे ऐकले व फळ खाल्ले.
ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यानंतर इव्हने आदमलाही फळ खाण्यास भाग पाडले. आदमने सांगायला पाहिजे होते, “नाही!मी ईश्वराची आज्ञा मोडणार नाही.”
जेव्हा आदम आणि इव्हने पाप केले, त्यांना दोघांनाही माहित होते की ते नग्न झाले होते. अंजीराच्या पानांचे मलवस्त्र शिवून त्यांनी स्वतः भोवती गुंडाळले आणि ईश्वराच्या नजरेपासून लपविण्यासाठी झुडुपात लपली.
शीतल संध्याकाळी ईश्वर बागेत आला. आदम आणि इव्हने काय केले आहे याची त्याला माहिती होती. आदम इव्हला दोष देत होता आणि इव्ह सर्पाला दोष देत होती. ईश्वर म्हणाला, “सर्प शापीत आहेत. जेव्हा स्त्रीला मुले होतील त्यावेळी तिला खूप वेदना होतील.” “आदम, तू चूक केल्याने पृथ्वीला काटे आणि काटेरी झाडांचा शाप मिळाला. तुला तुझे रोजचे अन्न मिळविण्यासाठी काबाडकष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल.”
ईश्वराने आदम आणि इव्हला त्या सुंदर बागेतून बाहेर घालविले. त्यांनी पाप केल्यामुळे त्यांना जीवनदात्या ईश्वरापासून वेगळे करण्यात आले!
ईश्वराने त्यांना बाहेर ठेवण्यासाठी एक ज्योतिर्मय तलवार बनविली. ईश्वराने आदम आणि इव्हसाठी चामड्याचे कोट बनविले. ईश्वराने चामडे कोठून घेतले?
कालौघात, आदम आणि इव्हने एका परिवारास जन्म दिला. त्यांचा पहिला मुलगा केन एक माळी होता. त्यांचा दूसरा मुलगा आबेल मेंढपाळ होता. होता एक दिवस केनने ईश्वराला भेटवस्तू म्हणून काही भाज्या आणल्या. आबेलने ईश्वराला त्याची भेटवस्तू म्हणून त्याच्या काही उत्तम शेळ्या आणल्या. आबेलच्या भेटवस्तूने ईश्वर आनंदी झाला.
केनच्या भेटवस्तूने ईश्वर आनंदी झाला नव्हता. केनला खूप राग आला. पण ईश्वर म्हणाला, “जर तू जे योग्य आहे ते केलेस तर तू स्वीकारला जाणार नाहीस का?”
केनचा राग दूर झाला नाही. थोड्या वेळानंतर शेतात त्याने आबेलवर हल्ला केला - आणि त्याला ठार मारले.
ईश्वराने केनला म्हटले, “तुझा भाऊ आबेल कोठे आहे?” “मला माहित नाही”, केन खोटे बोलला. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?” ईश्वराने केनकडून त्याची शेती करण्याची क्षमता काढून घेत आणि त्याला भटका बनवित शिक्षा केली.
केन प्रभूच्या अस्तित्वापासून दूर गेला. आदम आणि इव्हच्या एका मुलीशी त्याचे लग्न झाले होते. त्यांनी कुटुंब वसविले. लवकरच, केनने निर्माण केलेले शहर केनचे नातू आणि पणतू यांनी भरून गेले.
दरम्यान, आदम आणि इव्हच्या कुटुंबाची वेगाने वाढ झाली. त्या दिवसांत, लोक आजच्यापेक्षा जास्त काळ जगत होते.
जेव्हा त्यांचा मुलगा सेथ जन्माला आला, तेव्हा इव्हने म्हटले, “ईश्वराने मला आबेलच्या जागी सेथ दिला।” सेथ धर्मात्मा होता जो 912 वर्षे जगला आणि त्याला अनेक मुले झाली.
पिढी दर पिढी, जगात माणूस जास्त जास्त वाईट होत गेला. शेवटी, ईश्वराने मानवाला आणि सर्व प्राणी आणि पक्षी यांना नष्ट करण्याचे ठरविले. माणसाला बनविले याचा ईश्वराला पश्चात्ताप झाला. पण एका माणसाने ईश्वराला प्रसन्न केले ...
हा माणूस होता नोआ. सेथचा वंशज असलेला नोआ एक सदाचरणी आणि निष्कलंक माणूस होता. तो ईश्वरासमवेत चालू लागला. त्याने आपल्या तीन पुत्रांनाही ईश्वराची आज्ञा मानण्यासशिकविले. आता ईश्वराने एका खूप अनोख्या आणि विशेष प्रकारे नोआचा उपयोग करण्याचेठरविले!
समाप्त
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php