YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मुलांसाठी बाइबलनमुना

मुलांसाठी बाइबल

8 पैकी 4 दिवस

फार पूर्वी, ईश्वराने मेरी नावाच्या एका सुंदर तरूणीकडे गाब्रियल नावाच्या देवदूताला पाठविले. त्याने तिला सांगितले,
“तुला एक मुलगा होणार, ज्याचे नाव येशू असेल. तो ईश्वराचा मुलगा म्हणून ओळखला जाणार. तो सदाकाळी शासन करेल.”

“हे कसे शक्य आहे?” आश्चर्यचकीत झालेल्या तरूणीने विचारले. “मी आजपर्यंत कोणत्याही पुरूषासमवेत राहिलेली नाही.” देवदूताने मेरीला सांगितले की हे मूल ईश्वराकडून येणार. त्याचा पिता कोणी मनुष्य असणार नाही.

देवदूताने मग मेरीला सांगितले की तिची चुलत बहिण इलिझाबेथला तिच्या म्हातारपणी मूल होणार होते. हा सुद्धा एक चमत्कारच होता. लवकरच, मेरीने इलिझाबेथची भेट घेतली. त्यांनी दोघींनी मिळून ईश्वराची प्रार्थना केली.

मेरीचे योसेफ नावाच्या एका माणसाशी लग्न ठरले होते. योसेफला जेव्हा समजले की मेरीला मूल होणार आहे, तेव्हा तो दुः खी झाला. त्याला वाटले की कोणी दूसरा पुरूष त्या मुलाचा पिता आहे.

ईश्वराच्या देवदूताने स्वप्नात येऊन योसेफला सांगितले की हे मूल ईश्वराचे आहे. येशूचे पालन करण्यासाठी योसेफ मेरीला मदत करणार होता.

योसेफने ईश्वरावर विश्वास ठेवला व त्याची आज्ञा मानली. त्याने त्याच्या देशाचे कायदेही पाळले. नवीन कायद्यामुळे त्याने व मेरीने कर चुकता करण्यासाठी त्यांची मातृभूमी बेथलहेमकडे प्रयाण केले.

मेरी आता मूलाला जन्म देण्यासाठी तयार होती. पण योसेफला कोठेही खोली मिळाली नाही. सर्व धर्मशाळा भरल्या होत्या.

शेवटी योसेफला एक गोठा सापडला. तिथेच बालक येशूचा जन्म झाला. त्याच्या मातेने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, जिथे सामान्यतः जनावरांना खाण्यासाठी अन्न ठेवले जाते.

जवळच, मेंढपाळ त्यांच्या झोपलेल्या मेंढ्यांचा कळप राखत होते. ईश्वराचा देवदूत प्रकट झाला व त्याने त्यांना ही गोड बातमी सांगितली. “आज डेविडच्या ह्या शहरात तुमच्यासाठी तुमच्या तारणहाराने, येशू ख्रिस्ताने जन्म घेतला आहे. तुम्हांला ते मूल गव्हाणीत विसावलेले सापडेल.”

अकस्मात, आणखीही तेजस्वी देवदूत ईश्वराची प्रार्थना करत प्रकट झाले व म्हणू लागले, “परमात्मा परमेश्वराचा जयजयकार असो, आणि पृथ्वीवर शांती वसो, मानवाचे कल्याण होवो.”

मेंढपाळ लगबगीने गोठ्याकडे गेले. मूल पाहून ते त्यांना भेटणा-या सर्वांना देवदूताने त्यांना येशूबद्दल जे सांगितले ते सांगू लागले.

चाळीस दिवसांनंतर योसेफ आणि मेरी येशूला जेरूसलेमच्या मंदिरात घेऊन आले. तिथे शिमोन नावाच्या एका माणसाने मूलासाठी ईश्वराची प्रार्थना केली, तसेच प्रभूची अन्य एक सेविका म्हातारी एनाने आभार मानले. दोघांनाही माहित होते की येशू ईश्वराचा पुत्र - वचनबद्ध तारणहार आहे. योसेफने दोन पक्षांचा बळी दिला. ईश्वराच्या कायद्यानुसार, गरीब जनतेने प्रभूपाशी त्यांचे नवजात मूल घेऊन येताना आणावयाची ही भेट होती.

काही काळानंतर एका विशेष ता-याने पूर्वेकडील देशीच्या विद्वानांना जेरूसलेमचा रस्ता दाखविला. “यहुद्यांचा राजा म्हणून जन्माला आलेला तो कोठे आहे?” त्यांनी विचारले. “आम्हांला त्याची पूजा करायची आहे.”

राजा हेरोदने त्या विद्वानांविषयी ऐकले. त्रासून त्याने त्या विद्वानांना सांगितले की जेव्हा त्यांना येशू सापडेल तेव्हा त्यांनी त्याला कळवावे. “मला सुद्धा त्याची पूजा करायची आहे.” हेरोद म्हणाला. पण तो खोटे बोलत होता. हेरोद येशूला ठार मारण्यास पाहत होता.

ता-याने विद्वानांना नेमके मेरी व योसेफ लहान मूलासह राहत असलेल्या जागी नेले. प्रार्थनेसाठी गुडघे टेकवून त्या प्रवाशांनी येशूला सुवर्णाच्या किंमती भेटवस्तू व अत्तर भेट केले.

ईश्वराने विद्वानांना गुपचुपपणे घरी परत जाण्याची चेतावणी दिली. हेरोद संतापला होता. येशूला नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने राज्यातील सर्व बालकांना ठार केले.

पण हेरोद ईश्वराच्या पुत्राचे काहीच वाकडे करू शकला नाही. स्वप्नात चेतावणी दिल्यानुसार, योसेफ सुरक्षेसाठी मेरी व येशूला घेऊन इजिप्तला गेला.

जेव्हा हेरोद मरण पावला, तेव्हा योसेफ मेरी व येशूला घेऊन इजिप्तहून परत आला. ते गॅलिल समुद्राच्या जवळ असलेले छोटेसे शहर नाझारेथ मध्ये राहत होते.

समाप्त

पवित्र शास्त्र

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

मुलांसाठी बाइबल

हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php