मुलांसाठी बाइबलनमुना
आम्हांला कोणी बनविले? बाइबल - ईश्वराची वाणी, आम्हांला मानवी जीवनाचा आरंभ कसा झाला ते सांगते. खूप प्राचीन काळी, ईश्वराने पहिला माणूस बनविला व त्याला आदम असे नाव दिले. ईश्वराने पृथ्वीवरील धुळीपासून आदमला बनविले. जेव्हा ईश्वराने आदममध्ये प्राण ओतले, तेव्हा तो जिवंत झाला. त्याने स्वतःला ईडन नावाच्या एका सुंदर बागेत पाहिले.
आदमला बनविण्यापूर्वी ईश्वराने आश्चर्यकारक गोष्टींनी परिपूर्ण असे सुंदर जग निर्माण केले. हळूहळू ईश्वराने बनविल्या डोंगर-टेकड्या आणि गवताळ मैदाने, सुगंधी फुले आणि उंच झाडे, चमकदार पंखांचे पक्षी आणि गुणगुणणा-या मधमाशा, लोळणारे देवमाशे आणि निसरड्या गोगलगाई. खरे म्हणजे, ईश्वराने इथे आहे ते सर्व काही बनविले – सर्व काही.
अगदी सुरूवातीला, ईश्वराने काही बनविण्यापूर्वी, ईश्वराशिवाय काहीही नव्हते. ना लोक ना जागा ना वस्तू. काहीही नाही. ना प्रकाश ना अंधार. ना वर ना खाली. ना काल ना उद्या. होता फक्त ईश्वर ज्याला कोणतीही सुरूवात नव्हती. मग ईश्वराने कार्य सुरू केले.
सुरूवातीला, ईश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
आणि पृथ्वीला आकारही नव्हता आणि पोकळीही नव्हती. आणि खोलवर अंधारच अंधार होता. तेव्हा ईश्वर म्हणाला, “इथे प्रकाश होऊ दे.”
आणि तिथे प्रकाश झाला. ईश्वराने प्रकाशाला दिवस म्हटले आणि अंधाराला रात्र. आणि पहिल्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली.
दूस-या दिवशी, ईश्वराने स्वर्गाच्या अधीन महासागर, समुद्र आणि तलावातील पाणी आणले. तिस-या दिवशी, ईश्वर म्हणाला, “इथे कोरडी जमीन होऊ दे.” आणि तसे झाले.
ईश्वराने गवत आणि फुले आणि झुडुपे आणि झाडे प्रकट होण्याचीही आज्ञा दिली.आणि ती प्रकट झाली. आणि तिस-या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली.
त्यानंतर ईश्वराने सूर्य, चंद्र आणि अनेक तारे निर्माण केले ज्यांची मोजणी कोणीही करू शकणार नाही. आणि चौथ्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली.
ईश्वराच्या यादीत पुढे होते समुद्री प्राणी आणि मासे आणि पक्षी. पाचव्या दिवशी त्याने बवनिले विशाल सोर्डफिश आणि छोटे बांगडे, उंच पायांचे शहामृग आणि आनंदी लहान हमिंग पक्षी. ईश्वराने पृथ्वीवरील पाण्यात भरून राहण्यासाठी सर्व प्रकारचे मासे आणि जमीन आणि समुद्र आणि आकाशाचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रकारचे पक्षी बनविले. आणि पाचव्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली.
त्यानंतर, ईश्वर पुन्हा बोलला. तो म्हणाला, “आता पृथ्वीने सजीव प्राणी आणू दे.....” सर्व प्रकारची जनावरे आणि किटक आणि सरपटणारे प्राणी अस्तित्वात आले. तिथे होते जमीन हादरवणारे हत्ती आणी व्यस्त ऊद. खोडकर माकडे आणि बोजड मगरी. वळवळणारे किडे आणि उद्धट खार. कळपातील जिराफ आणि गुरगुरणारी मांजरे. त्या दिवशी ईश्वराने सर्व प्रकारचे प्राणी बनविले. आणि सहाव्या दिवशी संध्याकाळ आणि सकाळ झाली.
सहाव्या दिवशी ईश्वराने काही वेगळे केले – काहीतरी खूपच विशेष. आता माणसासाठी सर्व काही तयार होते. त्याच्यासाठी शेतामध्ये अन्न होते आणि सेवेसाठी प्राणी होते. आणि ईश्वर म्हणाला, “चला आम्ही आमच्या प्रतिमेत माणूस बनवूया. त्याला पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा मालक बनू दे.” अशा प्रकारे ईश्वराने स्वतःच्या प्रतिमेत माणूस निर्माण केला; ईश्वराच्या प्रतिमेत त्याने त्याला बनविले ...
ईश्वराने आदमला म्हटले, “तुझी जशी इच्छा होईल तसे बागेतील काहीही खा. पण चांगले आणि वाईटाच्या ह्या ज्ञानवृक्षावरील काही खाऊ नकोस. जर तू त्या वृक्षावरील काही खाल्लेस तर निश्चितच तुझा मृत्यू होईल.”
आणि ईश्वराने म्हटले, “माणूस एकटा राहणे बरे नव्हे. मी त्याच्यासाठी एक मदतनीस बनवीन.” ईश्वराने सर्व पक्षी आणि प्राणी आदमपाशी आणले. आदमने त्या सर्वांना नावे दिली. असे करण्यास तो खूपच हुशार असला पाहिजे. पण सर्व पक्षी आणि प्राण्यांमध्ये आदमसाठी योग्य साथी कोणी नव्हता.
ईश्वराने आदमला खोल निद्रेत नेले. झोपलेल्या माणसाची बरगडी काढून ईश्वराने आदमच्या बरगडीपासून स्त्री बनविली. ईश्वराने बनविलेली स्त्री आदमची साथी बनण्यास एकदम योग्य होती.
सहा दिवसांत ईश्वराने सर्व काही बनविले. त्यानंतर ईश्वराने सातव्या दिवसाला आशिर्वाद दिला आणि तो विश्रांतीचा दिवस केला. ईडनच्या बागेत आदम आणि त्याची बायको इव्ह ईश्वराची आज्ञा मानून आनंदात होते. ईश्वर त्यांचा मालक होता, त्यांचा दाता आणि मित्र होता.
समाप्त
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php