मुलांसाठी बाइबलनमुना
नोआ ईश्वराची पूजा करणारा माणूस होता. बाकी सर्वजण ईश्वराचा द्वेष व अवज्ञा करत. एक दिवस, ईश्वराने धक्कादायक असे काहीतरी सांगितले. “मी हे दुष्ट जग नष्ट करणार.” ईश्वराने नोआला सांगितले, “केवळ तुझेच कुटुंब वाचले जाणार.”
ईश्वराने नोआला चेतावणी दिली की प्रलयंकारी महापूर येऊन संपूर्ण पृथ्वीला व्यापणार. “तुझे कुटुंब आणि अनेक जनावरांना पुरेशी एक लाकडी नाव बांध.” नोआला आदेश मिळाला. ईश्वराने नोआला तंतोतंत सूचना दिल्या. नोआ कामात व्यस्त झाला.
आपण नाव का बांधतो हे नोआने सांगितल्यास लोक कदाचित त्याची चेष्टा करत असावे. नोआ नाव बांधत राहीला. तो लोकांना ईश्वराविषयीही सांगतच होता. कोणीच त्याचे ऐकत नव्हता.
नोआचा ईश्वरावर फार फार विश्वास होता. यापूर्वी कधीही पाऊस पडला नसला तरी त्याचा ईश्वरावर विश्वास होता. लवकरच सामान लादण्याएवढी नाव तयार झाली.
आता जनावरे आली. ईश्वराने काही प्रजातींमधून सात, इतरांमधून दोन आणली. लहान आणि मोठे पक्षी, छोटे आणि उंच प्राणी नावेकडे चालू लागले.
नोआ जनावरांना नावेत चढवत असतांना लोकांनी कदाचित नोआचा अपमान केला. ईश्वराविरूद्ध पाप करणे त्यांनी थांबविले नाही. त्यांनी नावेत प्रवेश करण्याविषयी विचारले नाही.
शेवटी सर्व पशु-पक्षी नावेत चढविण्यात आले. “नावेत ये”, ईश्वराने नोआला बोलाविले. “तू आणि तुझे कुटुंब.” नोआ, त्याची बायको, त्याचे तीन मुलगे व त्यांच्या बायका नावेत आल्या. नंतर ईश्वराने दार बंद केले.
पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसाने चाळीस दिवस व रात्री पृथ्वीला भिजविले.
पूराचे पाणी शहरे आणि गावांवरून वाहू लागले. जेव्हा पाऊस बंद झाला तेव्हा पर्वतही पाण्याच्या खाली होते. वायुचा श्वास घेणारा प्रत्येकजण मरण पावला.
जस जसे पाणी वाढत गेले, नाव पाण्यावर तरंगू लागली. आत काळोख असावा, कदाचित ओबडधोबड, आणि भयानकही असावे. पण नावेने नोआला महापूरापासून संरक्षण दिले.
पाच महिन्यांपर्यंत महापूरानंतर ईश्वराने शुष्क वारे पाठविले. सावकाश, नाव अरारत पर्वतावर जाऊन थांबली. पाणी उतरेपर्यंत नोआ आणखी चाळीस दिवस तसाच आत राहीला.
नोआने नावेच्या उघड्या खिडकीमधून एक डोमकावळा व एक कबूतर बाहेर सोडले. विसावण्यासाठी कोणतीही कोरडी व स्वच्छ जागा न मिळाल्याने कबूतर नोआकडे परत आले.
एका सप्ताहानंतर नोआने पुन्हा प्रयत्न केले. कबूतर परत येताना त्याच्या चोचीमध्ये एक नवीन ऑलिव्हचे पान घेऊन आले. पुढच्या सप्ताहात नोआला समजले की पृथ्वी कोरडी झाली आहे, कारण कबूतर परत आले नव्हते.
ईश्वराने नोआला सांगितले की नाव सोडण्याची वेळ आली आहे. नोआ व त्याच्या कुटुंबियांनी मिळून जनावरांना नावेतून बाहेर काढले.
नोआला ईश्वरा प्रति किती कृतज्ञ वाटले असेल! त्याने एक वेदी उभारली आणि त्याला व त्याच्या कुटुंबियांना भयंकर महापूरापासून वाचविणा-या ईश्वराची पूजा केली.
ईश्वराने नोआला एक सुंदर वचन दिले. माणसाच्या पापाचा निवाडा करण्यासाठी तो पुन्हा कधीही पूर पाठविणार नाही. ईश्वराने त्याच्या वचनाची एक सुंदर आठवण दिली. इंद्रधनुष्य ईश्वराच्या वचनाची खूण होती.
महापूरानंतर नोआ व त्याच्या कुटुंबियांनी नवीन सुरूवात केली. कालांतराने, नोआच्या वंशजांनी पृथ्वी पुन्हा भरून टाकली. जगातील सर्व देश नोआ आणि त्याच्या मुलांपासून निर्माण झाले.
समाप्त
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
हे सर्व कसे सुरू झाले? आपण कुठून आलात? जगात इतके दुःख का आहे? काही आशा आहे का? मृत्यू नंतर जीवन आहे का? आपण जसजसा जगाचा खरा इतिहास वाचता तसे उत्तरे शोधा.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Bible for Children, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://bibleforchildren.org/languages/marathi/stories.php