देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येनमुना

सत्याचा कमर बंध
पवित्र शास्त्रातील गोष्ट – हनन्या आणि सपीरा "प्रेषित 5:1-10"
इफिस 6 मध्ये सांगिलेल्या शस्त्रसामग्री मधील पहिली वस्तू आहे सत्याचा कमर बंध, जे सैनिकाच्या कमरेला बांधतात आणि संपूर्ण शस्त्र सामग्रीला एकत्र ठेवण्यासाठी मदत करते. कमर बंध सैनिकाच्या अंगावर शस्त्रसामग्री धरून ठेवते, तलवार जागेवर ठेवते, आणि अशी गोष्ट आहे जी सैनिक कधीच काढून ठेवणार नाही. खरं तर जर सैनिकाकडे सत्याचा कमर बंध नसला तर कदाचित त्याचे कपडे खाली पडतील, आणि ते सर्वांसमोर संकोचीत होतील!
सत्याचा एक भाग आहे कि जे तोंडावाटे बाहेर येते. आपण असे ख्रिस्ती असलो पाहिजे जे केवळ सत्य बोलतात, देवा बरोबर किंवा आपल्या आईवडीलां बरोबर खोटे न बोलणारे. सत्याच्या कमर बंधाचा दुसरा भाग हा आहे कि आपण देवावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याची निवड करतो. वास्तिविकता ही आहे कि आपला शत्रू सैतान आहे नेहमी खोटं बोलण्याचा व आपल्याला भूलवून ज्या गोष्टी सत्य नाहीत त्यावर आपण विश्वास ठेवावा असा प्रयत्न करत आहे.
आजच्या पवित्र शास्त्रातील गोष्टीत, हनन्या आणि सपिरा हयांनी ह्या लबाडीवर विश्वास ठेवला कि ते शिष्यांबरोबर प्रामाणिक आहेत कि नाही हे महत्वाचे नाही. त्यांना जेवढे पैसे मिळाले त्या पेक्षा कमी पैश्याला त्यांनी त्यांची जमीन विकली असे त्यांनी सांगितले. त्यांनी शत्रूवर विश्वास ठेवला ज्याने त्यांना असा विचार करायला लावला कि देव त्यांना पाहू शकत नाही किंवा विक्रिचा तपशील त्याला माहित नाही.परंतू देव सर्व काही पाहू शकतो. शिष्य देवाचे प्रतिनिधी होते. त्यांनी शिष्यांबरोबर लबाडी केली म्हणजे देवा बरोबर लबाडी केली. त्यांनी त्यांच्या व्यवहाराचे सत्य लपविले कारण सैतानाने त्यांच्या कानात जी लबाडी हळूच सांगितली त्याच्या वर त्यांनी विश्वास ठेवला. तुम्ही कोणत्या लबाडीवर विश्वास ठेवत आहात जी तुमची शस्त्रासामग्री पाडू शकते.
आपण नेहमी सत्य बोलून आणि देवा बद्दल आणि त्याच्या वचनाबद्दलच्या सत्यावर विश्वास ठेवून नेहमी सत्याचा कमरबंध बांधला पाहिजे.
‘‘मी प्रामाणिकपणे जीवन जगण्याची निवड करतो.’’
प्रश्न:
1.जर तुम्ही प्रामाणिक नसले तर तुमच्या सत्याच्या कमर बंधाला काय होते? तुमच्या शस्त्र सामग्रीच्या इतर भागावर त्याचा परिणाम होईल काय?
2.एखादा विशिष्ट प्रसंग कोणता जेव्हा तुम्ही ‘‘लबाडी’’ करत नाही, परंतू तुम्ही ‘‘प्रामाणिक’’ नाही?
3.खोटं बोलण्याचा परिणाम काय आहे?
4.हनन्या आणि सपीरा ह्यांनी पेत्रा बरोबर तीन तासाच्या अंतराने बोलणे केले तरी त्यांनी त्यांच्या जमीनीच्या सौदयाची सारखीच कहानी कशी काय सांगितली?
5.हनन्या आणि सपीराने कोणाला खोटे सांगितले? आज जेव्हा लोक खोटे बोलतात तेव्हा ते कोणा बरोबर खोटे बोलतात?
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Equip & Grow चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.childrenareimportant.com/marathi/armor/