देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येनमुना

अदृश्य जग
पवित्र शास्त्रातील गोष्ट – येशू स्वर्गात जातो"प्रेषित 1:1-11"
आपल्या आजूबाजूला अदृश्य जग आहे आणि ते अतिशय खरे आहे, जरी आपण ते पाहू शकत नाही तरी.जसे तूम्ही वारा पाहू शकत नाही, परंतु तुम्ही पाहू शकता की वारा झाडांच्या पाणांमधून वाहिला म्हणजे झाडे कसे हालतात, अगदी तसेच आध्यात्मिक जगाचे आहे.जुन्या करारातील एक संदेष्टा, अलिशा, अदृश्य जग पाहण्याबाबत अतिशय चांगले उदाहरण देतो.अराम आणि इस्त्राएलांमध्ये युध्द होण्याच्या बेतात आहे.(1 राजे 6:8-23).एके रात्री, शत्रूच्या सैन्याने शहराला वेढा दिला आणि जेव्हा अलिशाचा सेवक त्यांना पाहातो तेव्हा त्याला फार भिती वाटते.परंतू सेदंष्टयाने आपल्या सेवकाला सांगितले की त्याने घाबरू नये कारण त्यांच्यासोबत असलेले सैन्य शत्रुसोबत असलेल्या सैन्यांपेक्षा जास्त आहेत.मग अलिशाने त्याच्या सेवकाचे डोळे उघडावे म्हणून प्रार्थना केली आणि त्याने डोंगराकडे पाहिले जो घोडे आणि अग्निरथांनी भरून गेला होता.देवाने आपल्या लोकांचे सरंक्षण करण्यासाठी फार मोठे अदृश्य सैन्य आणले होते.
आपल्या अवतीभोवती आध्यात्मिक युध्द सुरू आहे, जरी आपण ते पाहू शकत नाही.पवित्र शास्त्र सांगते की सैतान अस्तित्वात आहे आणि त्याला असे वाटते की आपण आत्मिक राज्याकडे दुर्लक्ष करावे.प्रेषितांच्या कृत्यांमधील आजच्या गोष्टीमध्ये येशू स्वर्गामध्ये घेतला जातो.मजवर विश्वास ठेवा, स्वर्ग आणि नरक खरे आहेत.या सत्य ऐतिहासिक वृतांतामध्ये, येशू स्वर्गामध्ये गेल्यानंतर, दोन देवदूत शिष्यांसमोर येतात! देवदूत आपल्याला मदत करतात किंवा सैतान आपल्यावर हल्ला करतो याची कल्पना करणे आपल्यासाठी कठीण आहे, परंतू आपण ज्या गोष्टी पाहातो त्यापेक्षा या गोष्टी जास्त ख-या आहेत.
देवाच्या शस्त्रसामग्रीकडे उडी मारू या आणि या अदृश्य जगाबाबत आणखी शिकू या.आपल्याला आवडो अथवा न आवडो आपणलढाईमध्ये सहभागी आहोत.म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करू या.
‘‘मी या अदृश्य जगावर विश्वास ठेवतो आणि देवाची शस्त्रसामग्री धारण करतो.’’
प्रश्न:
1.चांगले आणि वाईट अदृश्य जग अस्तित्वात आहे याचा कोणता पुरावा तुम्ही पाहिला आहे?
2.तुम्ही इतरांना पाहिले आहे का ज्यांनी चूका केल्या आणि ज्यांचे देवाच्या शस्त्रसामग्रीने सरंक्षण झाले नाही!
3.आपल्या आजूबाजूचे आत्मिक युध्द कसे आहे असे तुम्हाला वाटते?
4.येशू जसा गेला तसाच पुन्हा येईल हे वचन कोणी दिले?
5.प्रेषित 1:8मधून गाळलेल्या जागा भरा. ‘‘आणि ................................................................तुम्ही माझे साक्षी व्हाल .’’ (यरुशलेम, सर्व यहूदीयात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.’’
या योजनेविषयी

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Equip & Grow चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.childrenareimportant.com/marathi/armor/