YouVersion लोगो
सर्च आयकॉन

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येनमुना

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

10 पैकी 6 दिवस

शांतीच्या सुर्वातेची चप्पल

पवित्र शास्त्रातील गोष्ट – फिलिप्प आणि हबशी षंढ"प्रेषित 8:26-40"

आता आपल्या चप्पला घालण्याची वेळ आहे जेणे करून आपण जाण्यासाठी तयार राहू! ह्याचा अर्थ आहे कि आपण शुभवर्तमान सांगण्यासाठी , किंवा कोणत्याही क्षणी आज्ञा पाळण्यासाठी, किंवा योग्य ती गोष्ट करण्यास जाण्यासाठी तयार आहोत.

आपण आपल्या पायात काय घालतो हे आपले स्थैर्य आणि आपली हालचाल ठरवत असते.आपण कोणती चप्पल घालतो ते हे ठरवत असते कि आपण आरामात किती दुर चालू अथवा धावू शकतो.पायातील चूकीच्या चप्पलीची निवड आपल्याला पांगळं करू शकते, हळू करू शकते आणि चालण्याच्या रेषेच्या बाहेर काढू शकते.जो सैनिक अणवाणी आहे तो ख-या त्रासात पडू शकतो.लढाईमध्ये आपण कुठे पाय ठेवतो ह्याची काळजी करणे शेवटची गोष्ट असायला हवी.आपले बूट आपल्याला समोर असलेल्या लढाई कडे पूर्ण लक्ष देत मोकळेपणाने भिती शिवाय चालण्याची मूभा देतात. ख्रिस्ताच्या शरीराला देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविण्यासाठी पाठविण्यात आले आहे, जी संपूर्ण जगात त्याचा शांतीचा मार्ग पसरवेल.आपल्या पायात आपल्या चप्पला असतांना आपण समोर जाण्यासाठी आणि इतरां पर्यंत सुवार्ता पोहचविण्यासाठी तयार आहोत.

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातील फिलिप्पाची गोष्ट अशा व्यक्तिची महान गोष्ट आहे जो सुवार्ता सांगण्यासाठी जाण्यास तयार होता. अचानक देवदूत त्याला उठून जायला सांगतो, आणि त्याला कोणता रस्ता व कोणते शहर हे नेमके सांगतो.जेव्हा तो तिथे पोहचतो तेव्हा देव त्याला विशिष्ट वाहनाकडे जाण्यासाठी सांगतो. फिलिप्प त्या माणसाला विचारतो कि तो जे वाचत आहे ते त्याला समजत आहे काय, त्याला गाडीत येण्याचे आमंत्रण मिळते, आणि पूढे तो सुवार्ता सांगतो. षंढ ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतो आणि तिथेच बाप्तिस्मा घेण्यासाठी गाडी थांबवितो! फिलिप्पाने त्याला बाप्तिस्मा दिला, परंतू जेव्हा ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा, फिलिप्प गायाब झाला! देवाच्या आत्म्याने फिलिप्पाला सुवार्ता सांगणे सुरू ठेवण्यासाठी इतर कुठेतरी नेले.

सुवार्ता सांगण्यासाठी तयार असलेल्या व्यक्तिची किती ही अद्भूत गोष्ट आहे!

‘‘देवाबरोबर चांगले संबंध ठेवण्याची आणि नेहमी त्याची सेवा करण्यासाठी तयार राहण्याची मी निवड करतो.’’

प्रश्न :

1.कोणत्या परिस्थितीत तुम्हाला आधी तयारी न करता सुवार्ता सांगावी लागू शकते?

2.आधी न सांगता तुम्हाला वर्गाचे नेतृत्व करावे लागले तर तुम्ही कोणते विषय शिकवाल?

3.भितीच्या सुवार्तेच्या तुलनेत ‘‘शांतीची’’ सुर्वाता काय आहे?

4.षंढाने फिलिप्पाला काय विचारले?

5.जेव्हा षंढाने पाणी पाहिले तेव्हा त्याने काय मागीतले?

दिवस 5दिवस 7

या योजनेविषयी

देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्ये

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Equip & Grow चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.childrenareimportant.com/marathi/armor/