देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येनमुना

निरंतर प्रार्थना करा
पवित्र शास्त्रातील गोष्ट – पेत्र तुरूंगातून सुटतो"प्रेषित 12:1-19"
शत्रूवर हल्ला करण्यासाठी आपण वापरू शकतो असे दुसरे शस्त्र प्रार्थना आहे. आणि त्याचा उपयोग संरक्षणासाठीही करता येतो. प्रार्थनेने आपण लढाया जिंकू शकतो, आणि पुढे कसे जावे यासाठी प्रभू कडून ज्ञान मिळवू शकतो, आपल्यासाठी लढण्यासाठी स्वर्गीय देवदूत मोकळे करू शकतो,आणि आपण कशा विरुद्ध आहोत हे अधिक चांगल्या रित्या समजू शकतो. आजच्या पवित्र शास्त्रातील गोष्टीत, आपण पाहतो कि पेत्र तुरूंगात आहे आणि सर्व मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. ते प्रार्थना करत असतांना देवाने पेत्राला सोडविण्यासाठी तुरूंगात एक देवदूत पाठविला ! देवदूत त्याला तुरूंगातून रस्त्यावर बाहेर आणतो आणि पेत्र घरी परततो जिथे ख्रिस्तात त्याचे बंधू व भगिनी प्रार्थना करत आहेत.त्यांनी त्याच्यासाठी दार सुध्दा उघडले नाही कारण ते विश्वास ठेवू शकले नाही कि तो खरंच पेत्र आहे.ते त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करत होते, परंतू जे घडले ते पाहून आश्चर्यचकित झाले! अनेक वेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, परंतू जेव्हा देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर देतो आणि आपली मदत करण्यासाठी येतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो.तो आपल्याला प्रार्थना करायला सांगतो आणि मदत करण्यासाठी अभिवचन देतो. हे शस्त्र सामग्रीतील एक वस्तू आहे जी तुम्ही रोज केली पाहिजे, जर तुम्हाला त्याचा दररोज उपयोग करायचा असेल तर.
प्रार्थना गोष्टी बदलते!तुमच्या लढाईसाठी सतत प्रार्थना करा कारण आज आपल्याला आधी पेक्षाही ज्यास्त त्याची गरज आहे.
“मी नेहमी प्रार्थना करणे, आणि लढाई आत्मिक आहे हे लक्षात ठेवण्याची निवड करतो.’’
प्रश्न:
1.‘‘देवाच्या शस्त्र सामग्री’’ मध्ये प्रार्थना का समाविष्ट आहे?
2.शत्रूच्या विरुद्ध बचाव करण्यासाठी प्रार्थना करण्याचे उदाहरण कोणते आहे अणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी प्रार्थना करण्याचे उदाहरण कोणते आहे?
3.जर सर्व गोष्टी देवाच्या ताब्यात आहेत तर तो आपल्याला त्याच्याकडे प्रार्थना करण्यासाठी का सांगतो, जेव्हा कि त्याला तुमच्या सभोवती काय आहे हे माहित आहे?
4.हल्ला करण्यासाठी कोणते दोन शस्त्र आपण वापरावयाचे आहेत?
5.जेव्हा पेत्राने मरियेच्या घराचे दार ठोठावले तेव्हा दारावर कोण आले?
ही वाचन योजना इक्विप अँड ग्रोच्या मुलांच्या अभ्यासक्रमातून घेतलेली आहे, जो प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देतो. या योजनेचा घरीच आनंद घ्या आणि नंतर चर्चमध्ये विद्यार्थी पुस्तके, खेळ, कलाकृती, गाणी, सजावट आणि अधिक काही यासह पूर्ण अभ्यासक्रम करा!
https://www.childrenareimportant.com/marathi/armor/
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Equip & Grow चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.childrenareimportant.com/marathi/armor/