देवाचे चिलखत - प्रेषितांची कृत्येनमुना

जमीनीवर पाय ठेवून उभे राहा
पवित्र शास्त्रातील गोष्ट – स्तेफनाचा मृत्यू"प्रेषित 6:8-15, 7:51-60"
आपण देवाच्या शस्त्रसामग्रीचा अभ्यास करीत असतांना, आपण देवाची शस्त्रसामग्री जगत असतांना ती धारण करत असतो. तुम्ही सत्याचा कमरबंद बांधण्यासाठी प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुखाने सत्य सांगता तेव्हा आणि देवाच्या सत्यावर तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवता, तेव्हा तुम्ही सत्याचा कमरबंद घातलेला असतो. तसेच तुम्ही विश्वासाची ढाल उचलण्यासाठी प्रार्थना करू शकत नाही. तुम्ही विश्वसाने जगत असतांना, देव काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवतांना आणि मनुष्ये काय म्हणतात त्यावर विश्वास ठेवित नाही तेव्हा विश्वासाची ढाल तुमच्या हातात असते आणि तिचा वापर तुम्ही शत्रुपासून बचाव करण्यासाठी करीत असता. हेच तत्व जमिनीवर उभे राहण्यासाठी लागू पडते. जमिनीवर उभे राहण्यासाठी तुम्ही प्रार्थनेतील ठराविक वाक्प्रचार वापरू शकत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवित असतांना आणि हात टेकण्यास नकार देत असतांना तुम्ही तुमच्या भूमिवर स्थिर उभे असता.
प्रेषितांच्या कृत्येमधील, आजच्या पवित्र शास्त्रातील गोष्टीमध्ये, स्तेफन आपल्यासाठी मोठे उदाहरण आहे. तो धार्मिक आणि ज्ञानी मनुष्य होतो ज्याने पूर्णपणे शस्त्रसामग्री धारण केली होती. जेव्हा त्याच्याविरुद्ध धार्मिक विरोध उठला, तेव्हा ज्याच्यावर त्याचा विश्वास होता त्यावर तो स्थिर उभा राहिला, जरी त्याचा परिणाम त्याचे निश्चीत मरण होते तरी.
येशू ख्रिस्ताविषयी प्रवचन केले म्हणून धार्मिक पुढारी त्याच्यावर एवढे क्रोधित झाले होते की त्यांनी गर्दीला हिसांचारासाठी भडकविले आणि शेवटी स्तेफनला दगडमार करून मारून टाकले. या पूर्ण पवित्र शास्त्रातील गोष्टीमध्ये स्तेफन आपल्या विश्वासावर स्थिर उभा राहिला आणि त्याने लोकांच्या मताप्रमाणे आपले मत बदलले नाही.
तुम्ही देवावर विश्वास ठेवता आणि त्याच्यासाठी छळ सोसण्यास तयार होता तेव्हा तुम्ही जमिनीवर स्थिर उभे असता आणि देवाची शस्त्रसामग्री धारण करून तुम्ही स्थिर उभे असता.
‘‘मी स्थिर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.’’
प्रश्न:
1.मानवी जीवनातील चढ आणि उतार कोणते आहेत?
2.आपण सैतानाविरुद्ध केव्हा उभे राहण्याची गरज आहे?
3.स्थिर उभे राहण्यासाठी सर्वात महत्वाची कोणती कृति आपण केली पाहिजे?
4.खोटे आरोप केलेले असतांना कोणाचा चेहरा देवदूताच्या चेह-यासारखा दिसला?
5.मरण पावण्यापूर्वी तो काय म्हणाला?
या योजनेविषयी

देवाची शस्त्रसामग्री धारण करणे हे रोज सकाळी केल्या जाणारी एक प्रार्थना विधी नव्हे परंतु तो जीवन जगण्याचा एक असा मार्ग आहे ज्याची सुरुवात आपण तरुण असतानाच करू शकतो. क्रिस्टी क्रॉसने लिहिलेली ही वाचन योजना प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातील वीरांकडे लक्ष देते.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल Equip & Grow चे आभार मानू इच्छितो अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://www.childrenareimportant.com/marathi/armor/