YouVersion लोगो
सर्च आयकॉन

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)नमुना

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

5 पैकी 5 दिवस

भक्तिसंदेश –वारसा कसा तयार करावा?

वारसा सुपूर्द करण्यासाठी, आपण देवासोबत आपला स्वतःचा इतिहास तयार केला पाहिजे. कोणीही त्यांच्या इतिहासाचा आणि देवासह त्यांच्या प्रवासाचा काही भाग तुमच्या खात्यावर टाकू शकत नाही. प्रत्येकाने देवासोबत आपला स्वतःचा एक मार्ग गांभीर्यानेविकसित केला पाहिजे. प्रत्येकाच्या चारित्र्याची परीक्षा त्यांच्या क्लेशसमयी केली जाते.

येथे काही प्रमुख मुद्दे आहेत जे तुम्हाला तुमचा वारसा तयार करण्यास मदत करतील.

उपस्थिती – या मुद्द्यावर आणखीन काय जास्त द्यायचची गरज आहे? आपण दररोज प्रत्येक दिवशी आपल्या प्रभु येशूच्या समीप जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या समक्षतेतस्वतःला उपस्थित राहण्याची नियमित सवय लावा.

"देवावर अवलंबून राहणे हे दररोज नव्याने अशा रितीने करा की जसे यापूर्वी आतापर्यंत तुम्ही ते केलेले नाही." - सी.एस. लुईस

जितकी घट्ट आपण आपली मुळे त्यात रोवू तितकी उत्तम फळे आपण आपल्या आयुष्यात प्राप्त करू. तुमचा दैनंदिन वैयक्तिक भक्तिसमय खूप महत्त्वाचा आहे. ही एक शिस्त म्हणून सुरू होते परंतु लवकरच तीआपल्या हर्षाचे कारण बनते.

देव पुरवठा करतो– देवाचा अनुग्रह प्रसाद तुमच्यावर हे जाणून घ्या. तो तुमच्यासाठी पुढील तरतूद करून ठेवतो आहे आणि तुम्ही तुमच्या मागण्या-कल्पना या पलीकडचे, त्यापेक्षा बरेच काही देवतुम्हांस देईल.

"जेव्हा देवाचे कार्य देवाच्या मार्गाने केले जाते, तेव्हा कसलीही कमतरता भासत नाही." - हडसन टेलर

वृत्ती – तुम्ही फक्त आजच्या साठी किंवा पुढील पाचवर्षांसाठी जगू नका. विचार करा, तुम्ही ७० वर्षांचे व्हाल तेव्हा कुठे असाल? सार्वकालिक समयामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता? काही उत्तम बक्षिसे पारितोषिके तुमची वाट पाहत आहेत का? प्रत्येक वेळी तुम्ही देवाला आवडेल असे काहीतरी करता तेव्हा तो ते तुमच्या स्वर्गीय खात्यात जमा करतो. त्याने आम्हाला तारले आहे ते पुरेसे आहे. पण, परमेश्वर देव सर्वोत्तमअसा स्वर्गीय पिता आहे जो आपल्यावर उदारपणे प्रीती करतो.

उद्दिष्ट – जगिक प्रवाहामध्ये स्वतःला वाहूनदेऊ नका. तुमच्या लक्षात येण्याआधीचपाच वर्षे निघून जातील आणि तुमच्याकडे दाखवण्यासाठी असे काहीही नसेल. तुमचे ध्येयउद्दिष्ट निश्चित करा. तुम्ही योजना करण्यात अयशस्वी होताय म्हणजेतुम्ही अयशस्वी होण्याची योजना आखता. तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक, कौटुंबिक, सामाजिक आणिआध्यात्मिक जीवनासाठी ध्येये निश्चित करा. देवाला तुमच्या संपूर्ण जीवनात रस आहे. तुमचे आध्यात्मिक आणि सांसारिक जीवन वेगळे नाही. आम्ही जे काही करतो त्यामध्ये आम्ही देवाचाच राजमार्ग शोधतो.

"आपल्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक बाब अपयश नव्हे तर महत्त्वहीन गोष्टीत यश संपादन करणे ही होय." - फ्रान्सिस चॅन

उत्कटता - तुम्ही जे काही कराल ते पूर्ण ताकदीने, अतिशय उत्कटतेने करा. तुम्ही देवासाठी असे करा.

"तुम्हांला उडता येत नसेल तर धावा, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगत जा, पण काहीही करा, आणिपुढे सरकत राहा." - मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर

उत्कटता केवळ परमेश्वर देवाच्या सान्निध्यात प्रज्वलित होऊन टिकून राहू शकते.

म्हणून आपण आपले जीवन प्रभु येशूच्या आवाहनानुसार, आपल्याला त्याने केलेल्या पाचारणानुसार जगूया. तुम्हांकरीतामाझीहीच प्रार्थना आहे की हा शास्त्राभ्यास तुम्हांला एक चांगला वारसा-निर्माता होण्यासाठी प्रेरित करून उत्तेजन देईल. तुम्ही आज तरुण आहात किंवा वृद्ध आहात यावर विचार न करता देवाच्या सामर्थ्यात त्याच्या साहाय्याने उत्तम असा वारसा तयार करण्यास सुरुवात करू शकता. सार्वकालिक वारसा सुपूर्द करण्यासाठी तुम्ही कोणाकोणाच्या जीवनांचा विचार करत आहात?

तुम्ही आज केलेली निवड उद्या फळ देईल. चला तर विश्वासाचे सुयुद्ध लढूया. कधीही खचू नका किंवा सत्कृत्ये करताना थकू नका, कारण आपण निर्माण केलेला वारसा सर्वकाळ टिकेल आणि एक दिवस भविष्यकाळ त्याची साक्ष देत आपला इतिहास लिहील.

संदर्भ वचनें :

  • कलस्सै. ३:२३
  • १ करिंथ. १५:१०
  • २ तीमथ्य. ४:७-८
दिवस 4

या योजनेविषयी

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

येशूचे शिष्य या नात्याने आपण पुढच्या पिढीवर प्रभाव टाकूया.नवाझ डीक्रूझ यांनी लिहिलेले आणि विक्रम जाधव यांनी अनुवादित केले.

More

हम Word Of Grace Church के धन्यवाद देबय चाहब जे ई योजना उपलब्ध करौलनि। अधिक जानकारी के लेल, कृपया देखू: https://www.wordofgracechurch.org/