YouVersion लोगो
सर्च आयकॉन

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)नमुना

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

5 पैकी 3 दिवस

भक्तिसंदेश – सुपीक वफलद्रुप असणे

आम्ही ध्येय उद्दिष्ट पाहिले. आज आपण उत्पादनाकडे बघू. जेव्हा आपण इतरांसाठी परिश्रम करतो, इतर लोकांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा देवाच्या राज्यात आपला वारसा तयार होतो. हे एखादे स्मारक बांधण्यासारखे नाही तर आपले जीवन, गुण-कौशल्ये आणि क्षमता इतर लोकांसाठी खर्ची करणे आहे जेणेकरुन आपल्या पश्चातही ते कार्य पुढे चालू ठेवू शकतील.

कोणीतरी म्हटले आहे, ख्रिस्ती जीवन ही एका रिले-शर्यतीसारखी आहे. आपल्याला हा अधिकार-दंडमागील पिढीने सोपवला असून तो आता पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची जबाबदारी आपली आहे.

वारसाची घडण करणे देवाच्या डी.एन.ए. अणुरेणूमध्ये आहे. वारसा सुपूर्द करण्यासाठी, आपण हे समजून घेतले पाहिजे की निर्माण करणे आणि घडवणे हा देवाचा स्थायी स्वभाव आहे. तोच डी.एन.ए. त्याने आपल्यातही टाकला आहे, आपण त्याचेच‘स्वरूप’ आहोत.

आम्हांस या पृथ्वीवरउत्पादक होऊन निर्मिती करण्यासाठी, निर्मितीची काळजी घेण्यासाठी आणि आपल्यावतीने योगदान करण्यासाठी निर्माणकरण्यात आले आहे.

देवाने आदामाला काळजी घेण्याची आणि भरभराट करण्याची दिलेली आज्ञा आजही आपल्याला लागू आहे. आम्हां मानवांस येशूने महान कामगिरी देतानामत्तय २८:१८-२० मध्ये या आज्ञेचा पुनरुच्चार केला - जा आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.

प्रभु येशू ख्रिस्तानेकारभारीपन, सेवा आणि अधिकपटीत वाढकरण्याबद्दल खूप दाखले दिले जसे रुपयांचा दृष्टांत, अन्यायी कारभाऱ्याचे शहाणपण, इत्यादि, इत्यादी. या सर्व दाखल्यांमध्ये देवाने एखाद्या मनुष्याला काही रुपये, दान दिले आहेत त्यामध्ये आणखीन वाढ व्हावी अशी अपेक्षा करतो. देवाने आपल्यामध्ये जी गुंतवणुक केली आहे त्यामध्ये वृद्धि (वाढ) इच्छितो. हे उत्पत्तिमध्ये आहे आणि ते प्रकटीकरणात देखील आहे.

नव्या करारातील चाळीसहून अधिक शास्त्रवचने बक्षिस-पारितोषिकाबद्दल बोलतात.याकडे लक्ष देणे गरजेचेआहे. आपण आपले संपूर्ण आयुष्य कसे व्यवस्थापित करतो हे अतिशय महत्त्वाचे आहे, मग ते आपले वैयक्तिक जीवन असो, काम असो, घर असो, वैवाहिक जीवन असो, मुलांसंबंधी असो किंवा चर्चमंडळी विषयक असो.

आपणया वचनांचासोयीस्कर अर्थ लावण्यापूर्वीचमी तुम्हांला ही आठवण करून देऊ इच्छितो की केवळ देवाच्या कृपेनेच आमचे तारण झाले आहे, आमच्या कर्मांनी नव्हे! आणि आपण सत्कृत्ये करावी म्हणून देवाने आम्हांस तारण दिले आहे.

वारशाची निर्मिती-बांधणी करणाऱ्याचे हृद्य अंतःकरण काय आहे? देवाच्या राज्‍यासाठी तुम्ही घेतलेल्यापरिश्रमांमुळे तुमच्‍या मुलांना आणि नातवंडांना ख्रिस्ती धर्माचे कोणते स्वरूप लाभेल? आपण आपल्या पश्चात ख्रिश्चन धर्माचे एक चांगले आणि अस्सलस्वरूप सुपूर्द करू या, आपण आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पुढील पिढीसाठी एक चांगले जग घडवूया. आमचे जे छत आहे त्यावर त्यांना वरचा मजला बनवू द्या त्यावर पुढची पिढी उभी असणार आहे. त्यांना आपल्यापैकी बहुतेकांपेक्षा वेगाने आणि पुढे जावे लागेल. वारशाची निर्मिती-बांधणी करणारे ‘लेगसी-बिल्डर्स’ पुढील पिढ्यांकरिता नेहमीच दर्जेदार जीवनाचा विचार करतात.

संदर्भ वचनें :

  • उत्पत्ति १:२८
  • मत्तय २५:२३
  • २ तीमथ्य २:१५
  • प्रकटीकरण २२:१२
दिवस 2दिवस 4

या योजनेविषयी

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

येशूचे शिष्य या नात्याने आपण पुढच्या पिढीवर प्रभाव टाकूया.नवाझ डीक्रूझ यांनी लिहिलेले आणि विक्रम जाधव यांनी अनुवादित केले.

More

हम Word Of Grace Church के धन्यवाद देबय चाहब जे ई योजना उपलब्ध करौलनि। अधिक जानकारी के लेल, कृपया देखू: https://www.wordofgracechurch.org/