YouVersion लोगो
सर्च आयकॉन

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)नमुना

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

5 पैकी 2 दिवस

भक्तिसंदेश - तुमची आमची निर्मिती उद्देशपूर्वक एका उद्देशासाठी झाली आहे

एक दीर्घ आणि विशेष वारसा सुपूर्द करण्याच्या तुमच्या इच्छेपोटी तुम्ही हे मनन चिंतनकरत आहात असा माझा विश्वास आहे. आम्ही याबद्दल पुढे काय करावे? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला तीन मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. आज आपण पहिली गोष्ट पाहू.

आमची निर्मिती उद्देशपूर्वक एका उद्देशासाठी झाली आहे

तुम्हांला निर्माण करणाऱ्या निर्माणकर्त्याच्या मनात तुमची घडण करताना एक रचना होती. तुम्ही या जगात अपघाताने किंवा चुकीने किंवा विनाकारण असे आलेले नाही.

"प्रकाश होवो" असे म्हणण्यापूर्वीच परमेश्वर देवाने आपली निवड केली! या गोष्टीवर विचार करा! देव हा अचूक योजना बनविणारा एक ‘मास्टर-प्लॅनर’ आणि कुशल कारागीर आहे. तो त्याची संसाधने वाया घालवत नाही. त्याने तुम्हांस घडवले, निर्माण केले आणि त्याने तुमची निवड केली.

देवाला यासाठी मोठी किंमत मोजावी लागली - त्याच्या प्रिय पुत्र येशूचे बलिदान. आदामाच्या पापामुळे, तुमचा जन्म पापी स्वभावात झाला ज्याने तुम्हाला देवापासून वेगळे केले. देवाला मानवजातीशी पुन्हा समेट घडवून आपल्या समीप आणायचे होते आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूद्वारे त्याने तुमच्या आमच्यासाठी तो मार्ग आखला - आपल्या सर्वांच्या पापांसाठी परिपूर्ण बलिदान.

हे आपल्या उद्देशासाठी आवश्यक आहे.जोपर्यंत तुमचा तुमच्या निर्माणकर्त्याशी समेट होत नाही तोपर्यंत तुम्ही निष्क्रिय निरुपयोगी अस्तित्वापासून मुक्त होणार नाही आणि तुम्ही उद्देशपूर्ण जीवन जगू शकणार नाही. आणि तुमच्या पृथ्वीवरीलजीवनात तुमच्याकडून असलेली देवाची योजना पूर्ण करू शकणार नाही.

तुम्ही विचाराल याला निरुपयोगी कसे म्हणता येईल? जेव्हा आपण सार्वकालिक लाभाच्या दृष्टीकोनातून परिस्थितीकडे पाहतो तेव्हा आपण ज्याला उद्देशपूर्ण आणि महत्त्वाचे समजतो त्याविषयी सत्यता उमगते.ख्रिस्ती म्हणूनही, आपण असे जगू शकतो – निष्क्रियरित्या निश्चिंत, निरुद्देश आणि या पृथ्वीवर आपले असण्याचे कारण जाणून न घेता. असे आपण आपला मार्ग गमावू शकतो आणि ध्येयहीन जीवन जगू शकतो. आत्मसंतुष्ट जीवन म्हणजे बुद्धिहीन होऊन स्वतःचीच फसवणूक करणे होय.

नवा जन्म घेणे ही आपल्या सर्वांच्या या सार्वकालिक शर्यतीची केवळ सुरुवातच आहे. मग या शर्यतीत आपण कसे धावणार? आपण आपला उद्देश कसा शोधू शकतो आणि त्याचा शेवट चांगला करून आपण तो पुढच्या पिढीला कसा देऊ शकतो?

प्रभु येशू ख्रिस्तावरील आपली पहिलीप्रीती आपण तप्त धगधगत ठेवली पाहिजे. ‘आपण आपल्या विश्वासाचाउत्पादक आणि परिपूर्ण करणारा प्रभु येशू ख्रिस्त याजवर आपली दृष्टि कायम ठेवली पाहिजे.’

संदर्भ वचनें :

  • स्तोत्र. १३९:१४-१५
  • इफिस. १:११, २:९-१०
  • इब्री.१२:२
दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

येशूचे शिष्य या नात्याने आपण पुढच्या पिढीवर प्रभाव टाकूया.नवाझ डीक्रूझ यांनी लिहिलेले आणि विक्रम जाधव यांनी अनुवादित केले.

More

हम Word Of Grace Church के धन्यवाद देबय चाहब जे ई योजना उपलब्ध करौलनि। अधिक जानकारी के लेल, कृपया देखू: https://www.wordofgracechurch.org/