भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)नमुना
वारसा सुपूर्द करणे
ख्रिस्त-शिष्य असल्याच्या गेल्या चार दशकांत, मी ख्रिस्ती विश्वासाच्या वेगवेगळ्या अभिव्यक्ती पाहिल्या आहेत - त्यामध्ये ख्रिस्ताविषयीच्या उत्कटतेचे वेगवेगळे स्तर आणि नेतृत्व करण्याचे वेगवेगळे मार्ग यांचा समावेश आहे. आयुष्याच्या प्रवासाच्या शेवटी, आपल्या सर्वांना या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल: मी योग्य जीवन जगलो का आणि मी माझा उद्देश पूर्ण केला का? या मनन पाठात प्रत्येकासाठी संदेश आहे – भले तोकोणी नवीन विश्वासणारा असो किंवाख्रिस्ताचा अनुभवी शिष्य असो किंवा एखादाज्येष्ठ जाणता असा ख्रिस्तीविश्वासणारा असो!
भविष्यकाळात तुमच्याबद्दल काय म्हटले जाईल? आपण आपला वेळ कसा व्यतीत करत आहोत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
अमेरिकन मिशनरी जिम एलियट यांनी म्हटले आहे, "ज्या गोष्टी आपल्याकडून कधीही हिरावल्या जाणार नाहीअशा गोष्टींसाठी जे आपण जतन करू शकत नाही ते सोडून देणे हे निश्चितच शहाणपणाचे आहे!” दक्षिण अमेरिकेतील ओका आदिवासींमध्येसुवार्ताप्रसार करण्याची जिमलाउत्कटआवड होती आणि ज्या लोकांची सेवा करण्यासाठी त्याने आपले जीवन समर्पित केले त्याच लोकांकडून तो मारला गेला. नंतर जिमच्या पश्चात, त्याच्या पत्नीने जिमद्वारे सुरू झालेले काम पुढे चालू ठेवले आणि त्यामुळे त्यांनी एक अद्भुत असा वारसा मागे ठेवला. आपण जिम एलियट कधीच बनू शकत नाही असे तुम्ही म्हणण्यापूर्वी हे लक्षात घ्या की जर तुम्ही प्रभु येशू ख्रिस्तावर कायमस्वरूपी विश्वास ठेवला आहे तर त्यायोगे तुम्हांस एक महान संकल्प, आणि एका विशेष दृष्टीकोणासह उत्कट वृत्ती सार्वकालिक जीवनासह लाभत आहे.
आपली इच्छा असो वा नसो आपण सर्वजण कळत नकळत आपल्यामागे एक वारसा सोडून जातो. तर आता प्रश्न हा आहे की तुम्ही कोणता वारसा सुपूर्द करणार आहात?
आज तुम्ही कशासाठी जगत आहात याचा तुम्ही विचार करा. या नवीन दशकामध्ये तुमचे काही ध्येय आहेत का? ते साध्य करण्यासाठी तुमच्याकडे काही धोरण आहे का? त्यासाठी तुम्ही नवीन वर्षाची वाट पाहू नका. ध्येयपूर्ती करण्यासाठी तुम्ही आजच या क्षणी सुरुवात करू शकता.
तुमची ध्येय, तुमचीस्वप्ने तुम्ही तुमच्या रोजनिशी किंवा डायरीत लिहा. तुम्ही तिथे कसे पोहोचाल याविषयीतुमची योजना लिहा.
तुमच्या संकल्पित गंतव्यस्थान आणि वारशाच्या निर्मितीसाठी तुमचे ध्येय का महत्त्वाचे आहे ते आपण पुढील पाठांमध्ये पाहणार आहोत. तसे जीवन जगण्यासाठी आपण या अभ्यासाद्वारे असे काही मुख्य मुद्दे पाहू जे तुम्हाला एक उत्तम वारसा सुपूर्द करण्यासाठी मदत करतील. भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील!
संदर्भ वचनें :
- नीतिसूत्रे २९:१८
- नीतिसूत्रे १६:३
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
येशूचे शिष्य या नात्याने आपण पुढच्या पिढीवर प्रभाव टाकूया.नवाझ डीक्रूझ यांनी लिहिलेले आणि विक्रम जाधव यांनी अनुवादित केले.
More
हम Word Of Grace Church के धन्यवाद देबय चाहब जे ई योजना उपलब्ध करौलनि। अधिक जानकारी के लेल, कृपया देखू: https://www.wordofgracechurch.org/