YouVersion लोगो
सर्च आयकॉन

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)नमुना

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

5 पैकी 4 दिवस

भक्तिसंदेश – धीर

आपण उद्देश आणि उत्पादकता या विषयांवर मनन केले आहे. आज आपण आणखी एक पैलू पाहणार आहोत जो आपल्याला हेतुपूर्ण किंवा उद्देशपूर्ण जीवन जगण्यास मदत करेल.

धीर

एखाद्या कार्याची समाप्ती दृढपणे केल्यास ते निर्णायक होते. आपण आपल्यातील धग किती वर्षे पेटवत ठेवू शकतो? दोन वर्ष, पाच, दहा, वीस, चाळीस वर्ष? गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ मी ख्रिस्तीअसूनही, मला समजले आहे की मी काही गोष्टी गृहीत धरू शकत नाही.

जर आपण प्रभु येशू ख्रिस्ताशी एकरूप झालो नाही आणि त्याच्यामध्ये रुजलो नाही, तर आपला आध्यात्मिक उत्साह कोमेजून आणि मरून जाईल. येणारा प्रत्येक नवीन दिवस हा नवीन दया आणि कृपेची संधी घेऊन येत आहे. मागील वर्षीच्या अभिवचनांवर किंवा तेव्हा माझ्या प्रार्थनांच्या मिळालेल्या उत्तरांवर मी जीवन जगू शकत नाही. या गोष्टी फक्त तुम्हांलाही आठवण करून देण्यासाठी आहेत की देव सदासर्वकाळ चांगला आणि विश्वासू आहे. या गोष्टीं माझा तेव्हाचा विश्वास दर्शवित असल्या तरी आजही प्रत्येक क्षणी माझ्या विश्वासाचे पुनरुज्जीवन होणे अत्यावश्यक आहे.

आपल्या जीवनातील उद्देश जाणून तो सफल करण्याच्या दिशेने स्वतःला उत्पादनक्षम, सुपीक आणि फलद्रूप करण्याचा मार्ग म्हणजे आपल्या प्रत्येक दिवशी धीराने कार्य करणे. माझी रोजची दिनचर्या कशी आहे? देवाबरोबर वेळ व्यतीत करणे,त्याचे जीवनदायी वचन वाचून त्यावर मनन करणे या गोष्टींना प्राधान्य देणे उत्तम आहे. त्याचे वचन हे जीवनदायी बीज आहे जे आपल्या अंतःकरणात पेरले जाते, आणि जेव्हा त्याची योग्यरित्या संगोपन होऊन वाढ होते तेव्हा ते धार्मिकतेचे अनेकपटीने पीक देते. लक्षात ठेवा, आपल्या दिनचर्येमध्येच आपल्यासाठी असलेले पारितोषिक दडलेले आहे.

प्रभु येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की त्याच्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि आपण दीर्घकाल टिकणारे असे फळ देऊ शकत नाही. आपण आपल्या जीवनाची बांधणी कशावर करत आहोत? आपण आपले जीवन कसे आणि कोणासोबत घडवत आहोत?

आपण जे काही करतो, त्या सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी आपण प्रभु येशूला ठेवले पाहिजे. तोच आमची आधारशिला आणि धीर व आत्मसंयमाचे एकमेव उदाहरण आहे. धीर म्हणजे केवळ आपण एखादी गोष्ट का व कशी करतो हे नाही तर एखादी गोष्ट जाणीवपूर्वक न करणे हे सुद्धा आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर (देवाला अप्रिय असणाऱ्या गोष्टींना) ठामपणे दिलेला नकार हा (देवाप्रती आपल्या विश्वासाचा) ठाम होकार असा होतो. अनेकांनी प्रभु येशूचे लक्ष वेधून त्याने कुठे जावे अथवाकाय करावे वा कोणाला भेटावे हे त्यास सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या स्वर्गीय परमेश्वर पित्याला येशूने जे जे करताना पाहिले केवळ तेच प्रभु येशूने केले आणित्यावर तो ठाम राहिला. पृथ्वीवरील आपले ध्येय आणि कार्यत्याने धीराने पूर्ण केले. देवाने येशूला एका उद्देशासह पृथ्वीवर पाठवले होते. ‘तो देवाचा पुत्र असूनही त्याने दु:ख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.’ त्याने संकटे आणि परीक्षांचा सामना करत आपल्याला आत्मसंयमन व धीरयांचे उदाहरण दिले आणि आपण ते अंगिकारले पाहिजे.आपण धीरआणि समाधान बाळगू शकतो कारण आपल्या प्रभूने आपल्या पुढे जाऊन आपल्यासाठी मार्ग तयार केला आहे.

संदर्भ वचनें :

  • योहान १५:५
  • इब्री.५:८-९
  • १ करिंथ. ३:१०-१२
दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

भविष्यकाळ तुमचा इतिहास लिहील ( the Future Will Write Your History)

येशूचे शिष्य या नात्याने आपण पुढच्या पिढीवर प्रभाव टाकूया.नवाझ डीक्रूझ यांनी लिहिलेले आणि विक्रम जाधव यांनी अनुवादित केले.

More

हम Word Of Grace Church के धन्यवाद देबय चाहब जे ई योजना उपलब्ध करौलनि। अधिक जानकारी के लेल, कृपया देखू: https://www.wordofgracechurch.org/