सुटका/मुक्ती नमुना
सोडविलेल्यांसाठी सार्वकालिकता किंवा अंनतकाळ हे गंतव्य स्थान आहे
आमचा सात दिवसांचा प्रवास पूर्ण करीत असतांना हे महत्वाचे आहे की तुम्हास ही जाणीव व्हावी की गंतव्य स्थान सार्वकालिकता आहे. सध्या पृथ्वीवर राहत असतांना,तुम्हाला मनुष्य असल्यामुळे संघर्ष आणि आशीर्वाद दोघांचा अनुभव घ्यावा लागतो. तुमच्या अंतःकरणात वास करणाऱ्या,येशूमुळे सध्या तुमच्या अंतःकरणात सार्वकालिकतेची जाणीवही आहे. म्हणून,तुम्ही ज्यातून जात आहात अथवा जे तुम्हाला सोसावे लागत आहे,त्यात तुम्हाला सार्वकालिकतेचे आश्वासन आहे ज्यात दुःख आणि क्लेश यापासून मुक्ती आहे. तुमचे जीवन कितीही यशस्वी झाले,तरीही सार्वकालिकता तुम्हाला त्याहीपेक्षा मोठे प्रतिफळ मिळवून देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. सदाकाळपर्यंत येशूसोबत जीवनाची तुम्ही आनंदाने अपेक्षा करू शकता. सार्वकालिकतेची सुरूवात आता होते म्हणून आज तुम्ही कसे जगता त्यावरून तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरविली जाते. जेव्हा तुम्ही देवाने दिलेल्या दृष्टांतानिशी जगता,पवित्र आणि वेगळे केलेले जीवन जगण्याचा निर्धार करता,तेव्हा आपोआप तुमचे जीवन येशूच्या जीवनासारखे दिसू लागते. तुम्ही जगाच्या ज्या भागात प्रवेश कराल तेथे तुम्ही सखोल प्रभाव टाकाल आणि जेथे कोठे जाल तेथे चिन्ह सोडून जाल,तुमच्या समयापलीकडे देखील. सार्वकालिकतेची मानसिकता इतकी सामर्थ्यवान आहे.
तुमची स्वप्ने आणि महत्वाकांक्षा महत्वाच्या आहेत - म्हणून त्यांस सोडून नका पण त्या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करा जे करणे देव तुमच्या अंतःकरणात टाकतो. सर्व वेळ त्या बक्षीसावर तुमचे डोळे टिकवून ठेवा,हे बक्षीस स्वतः येशू आहे. तुम्ही यशाची,संपत्तीची अथवा प्रभावाची इच्छा धरू शकता,जे ठीक आहे पण जर येशूसोबत तुमचे नाते नसेल तर ते सर्व व्यर्थ ठरेल. आज आणि प्रत्येक दिवशी त्याची निवड करा. त्याच्या वचनाद्वारे त्याचा शोध घ्या. पवित्र आत्म्याच्या पावलास पाऊल मिळवून चला जेणेकरून तुमच्या अंतःकरणाचे व मनाचे नवीनीकरण व्हावे.
विचारर:
जीवन जेव्हा तुम्हास खालच्या स्तरास नेते तेव्हा वर पाहत राहा यासाठी की तुम्हास सार्वकालिकतेचे प्रशिक्षण लाभलेले असावे आणि तुम्ही तयार असावे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/