YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सुटका/मुक्ती नमुना

सुटका/मुक्ती

7 पैकी 3 दिवस

राजांनी सुटकेचा प्रयत्न केला

देवाचे लोक इतके आपल्यासारखे होते की हे साम्य जवळजवळ भयावह आहे. शास्तेंनी देशाची देखरेख केल्यावर,देवाने एक संदेष्टा आणला जो देवाच्या आवाजाशी अतिशय परिचित होता. शमुवेलाने स्वतः देवाकडून सूचना घेऊन इस्राएलचे नेतृत्व केले. तो मध्यस्थ होता आणि आपल्या लोकांची खऱ्या अर्थाने काळजी घेणारा होता. त्याचे नेतृत्व जिवंत देवाशी निकट भागीदारीचा परिणाम होता,म्हणून जेव्हा लोकांनी ठरवले की त्यांना यापुढे संदेष्ट्याचे नेतृत्व नको तेव्हा तुम्ही त्याच्या निराशेची कल्पना करू शकता. त्याऐवजी त्यांनी राजा मागितला. स्पष्टपणे समोर बोलणे आणि बदल मागणे चुकीचे नाही,ते मागण्यामागचा आपला हेतू महत्त्वाचा आहे. लोकांनी म्हटले की त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांसारखे व्हायचे आहे ज्यांचे नेतृत्व राजे करतात. ते विसरले होते की त्यांच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार हा होता की परमेश्वर त्यांस इतर राष्ट्रांपासून वेगळे करू इच्छित होता. त्याने स्वतःसाठी त्यांस निवडले. तो त्यांच्यासाठी ईर्ष्यावान होता आणि त्याने त्यांच्यासाठी चिन्हांकित केलेल्या महान उद्दिष्टांसाठी त्यांनी पवित्र असावे अशी त्याची इच्छा होती. तरीही,जेव्हा त्यांनी ही मागणी केली,तेव्हा त्याने त्यांची विनंती मान्य केली आणि शौलाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. शौल अविश्वासू असल्याचे सिद्ध झाले आणि शेवटी देवाने दाविदास आणले जो पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श राजा ठरणार होता. प्रत्येक राजासाठी अत्यावश्यक पात्रता ही होती की त्याने देवाच्या वचनावर आधारित जीवन जगावे,बुद्धिमत्तेने राज्य करावे आणि नीतिमत्वाने व न्यायाने वागावे. तरीही अपेक्षेनुसार,उत्तम राजेसुद्धा परिपूर्ण नव्हते. राजघराणे उत्तरोत्तर नैतिकदृष्ट्या अधिक भ्रष्ट आणि अनाध्यात्मिक बनत गेले,आणि सरतेशेवटी देवाने त्यांना आणि त्यांच्या लोकांना शत्रू राष्ट्रांच्या हाती सोपविले जे निर्दयी आणि क्रूर होते. सर्वात वाईट गोष्ट ही होती की कराराचा देश आता आक्रमकांनी ताब्यात घेतला होता आणि लोकांना परकीय देशात बंदिवान म्हणून नेण्यात आले होते. दुर्दैवाने,बंदिवासाच्या काळात राज्य करणाऱ्याराजांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करून येणारा विनाश टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पकडण्यात आले आणि बंदिवासात नेण्यात आले. त्यांच्या लोकांस सोडविण्यासाठी निवडण्यात आलेल्या राजांच्या अपुऱेपणाचे हे कसे चित्र आहे! हे स्पष्ट आहे की राजे त्यांच्या राष्ट्राला देवाकडे आणि त्यांच्या देवाने ठरविलेल्या भवितव्याकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

विचार:

आपल्या पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करणे हे पूर्णपणे महत्वाचे आहे यासाठी की त्यांना सामर्थ्याने व बुद्धीने नेतृत्व करण्यास मदतव्हावी.

पवित्र शास्त्र

दिवस 2दिवस 4

या योजनेविषयी

सुटका/मुक्ती

ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/