सुटका/मुक्ती नमुना
पवित्र आत्मा सुटका सुरू ठेवतो
पृथ्वीवर असतांना येशूने जितक्यांना स्पर्श केला आणि बरे केले अथवा जेव्हा त्याने सामर्थी सत्य शिकविले आणि लोकांस पार बदलून टाकले,तेव्हा त्याने स्वर्ग थोडा जवळ आणला. आपल्या पित्याजवळ त्याच्या हक्काचे स्थान ग्रहण करण्यासाठी स्वर्गात चढल्यानंतर,त्याने त्रिएकत्वाच्या तिसऱ्याव्यक्तीस त्याच्या अनुयायांपैकी प्रत्येकासोबत असावे म्हणून पृथ्वीवर पाठविले. पवित्र आत्मा शंभर टक्के परमेश्वर आहे आणि त्याला वेगवेगळ्या नावांनी हाक मारली जाते जसे पॅराकेलिओ (कैवारी),सत्याचा आत्मा,सहायक,सल्लाकार,सांत्वन देणारा आणि रूआच (वारा) ही यापैकी काही नावे आहेत. त्यास मुख्यत्वेकरून प्रत्येक विश्वासणाऱ्यास देवाच्या सामर्थ्याने भरण्यासाठी आणि आम्ही देवास आणखी जाणून घ्यावे म्हणून आमची मदत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. तो देवाचा आत्मा आहे त्यामुळे देवाचे मन आणि अंतःकरण आणखी चांगल्याप्रकारे जाणण्यात तो आमची मदत करतो. तो आम्हास वेगवेगळी कृपादाने देतो जी आम्हास ख्रिस्ताच्या देहातील एकमेकास आशीर्वाद देण्यात आमची मदत करतात आणि फळ आणण्यास समर्थ करतात यासाठी की मंडळीच्या बाहेरील लोकांनी देखील आमच्याद्वारे ख्रिस्ताचा अनुभव करून घ्यावा. तोच आम्हाला पवित्र शास्त्राची सखोल समज देतो आणि तोच आम्हाला उत्साहाने आणि हेतूपूर्वकरित्या ख्रिस्तामधील आमचे नवीन जीवन जगण्यात आमची मदत करतो. तो आम्हाला सर्वकाही देतो ज्याची आम्हाला भक्तिमान,देवाला प्रसन्न करणारे जीवन जगण्यासाठी गरज आहे आणि आम्हास त्याच्या निकट सहभागित्वात आणतो. पवित्र आत्मा अतींद्रिय,पारलौकिक जीव नाही. तर तो सामर्थ्यवान आहे,कारण जेव्हा तो वस्तूंस हलविणाऱ्यावाऱ्यासमान कार्य करतो,तेव्हा तो आमच्या जीवनाचे दृश्य बदलून टाकतो. तो झऱ्यातील स्वच्छ पाण्यासारखा आहे जो प्रत्येक अशुद्धता स्वच्छ करतो आणि ज्या कोणास स्पर्श करतो त्यांस जीवन देतो. तो अग्नीसारखा आहे जो सोने शुद्ध करतो आणि सर्व गाळ व अशुद्धता जाळून टाकतो आणि त्यास पूर्वीपेक्षा अधिक मूल्यवान आणि रमणीय करतो. तोच काय तो आम्हास दररोज शत्रूच्या तावडींतून सोडविणे सुरू ठेवितो आणि त्या विजयात चालण्यात आमची मदत करतो जो येशूने आमच्यासाठी कलवरीवर मिळविला.
विचार:
तुम्ही पवित्र आत्म्याच्या मदतीवाचून ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही.
या योजनेविषयी
ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/