सुटका/मुक्ती नमुना
येशू ख्रिस्त ती मुक्ती/सुटका आहे
समस्या पाप होती,आहे आणि नेहमी असेल. देवाच्या बाबतीत असे कधीही नव्हते. असे त्याच्या वचनाबाबत कधीही नव्हते. त्याने आपल्या लोकांस अभिवचन दिलेल्या प्रत्येक शब्दाप्रत तो विश्वासू होता. तो सर्व बाबतीत न बदलणारा,पवित्र आणि नीतिमान आहे. पाप लोकांस देवापासून आणि मनुष्यास एकमेकापासून दूर ठेवण्यास जबाबदार होते.‘एकदाचे’समाधान असणार होते एक सिद्ध बलिदान ज्यात कुठल्याही दोष नव्हता आणि जे येणाऱ्याप्रत्येक पुरुषाची,स्त्रीची आणि मुलाची जागा घेणार होते. देवाचा पुत्र येशू ते बलिदान होता. प्रत्येक बाबतीत देव असतांनाही,तो मनुष्य बनला जो लोकांची भेट घेत,मुलांना कडेवर घेत,अस्पृश्यांस स्पर्श करीत,यहूदियाच्या खडबडीत प्रदेशात चालला आणि तो पृथ्वीच्या लहानशा भागावर स्वर्ग घेऊन आला. तेहतीस वर्षांचा होईपर्यंत सर्व बाबतीत त्याचे जीवन सामान्य होते,तीन वर्षेपर्यंत लोकांस शिकवित त्यांची सेवा केल्यानंतर,त्याच्या जीवनाने एक विचित्र वळण घेतले. खोट्या आरोपावरून त्याला अटक करण्यात आली,यरूशलेमच्या मार्गावरून एका साधारण अपराध्याप्रमाणे त्याची मिरवणूक काढण्यात आली आणि मग त्याला एका टेकडीवर चढविण्यात आले जेथे त्याला वधस्तंभी देण्यात आले. त्याच्या छिन्नविछिन्न आणि रक्तबंबाळ शरीरावर धार्मिक पुढाऱ्यांच्या तिरस्काराची आणि सैनिकांच्या संतापाची झळ होती. त्या वधस्तंभावर टांगलेला असतांना,त्याने जगाच्या पापाचा भार वाहून नेला आणि पापबलि म्हणून त्याच्या पित्यापुढे अर्पण केला. देवाची स्तुती असो की तो पूर्णपणे निष्पाप असल्यामुळे,त्याच्या मृत्यूद्वारे सर्व पापासाठी तो प्रायश्चित करू शकला. त्याक्षणी,जेव्हा मनुष्य पुन्हा एकदा देवाजवळ येऊ शकतो आणि पाप त्याच्या मार्गात अडखळण आणू शकत नाही. त्याच्या रक्ताने आमची सुटका शक्य झाली. हे तेथेच संपले नाही. त्याच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर मोठ्या सामर्थ्यानिशी,येशू मरणातून जिवंत झाला आणि त्याने निर्णायकरित्या सदासाठी मृत्यूवर विजय मिळविला. आज,आपण त्याच्या पुनरुत्थानमुळे मृत्यूच्या भितीपासून मुक्त होऊन आणि सार्वकालिक जीवनाचे आशेने जगू शकतो. आमची सुटका येशूद्वारे पूर्ण करण्यात आली. जे कोणत्याही न्यायाधीश,राज्यकर्ता,संदेष्टा अथवा याजक साध्य करू शकला नाही,ते येशूने त्याच्या श्रेष्ठ बलिदानाद्वारे साध्य केले!
विचार:
केवळ येशू ख्रिस्त हेच एकमेव नाव आहे ज्याद्वारे तुमचे तारण होऊ शकते!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/