सुटका/मुक्ती नमुना
चांगले लोक तात्पुरती सुटका घेऊन येतात
परमेश्वराने अब्राहामाला त्याने उत्पन्न केलेल्या प्रचंड जनसमुदायामधून,त्याच्या निवडलेल्या लोकांचा पिता बनण्यासाठी निवडले होते. त्याने त्याला अभिवचन दिले की,त्याची संतती अगणित असेल आणि ते जगातील राष्ट्रांस आशीर्वादित करतील. परमेश्वर देव अब्राहाम,इसहाक आणि याकोबास एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल की त्यांना तो सामावून घेता येणार नाही आणि ते खरोखर गर्दीत उठून दिसू लागले. ते इतके उठून दिसू लागले की मिसर देशाच्या फारोने त्यांना गुलाम बनविण्याचे आणि त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर अत्याचार करण्याचे ठरविले. त्यांच्यावर असलेल्या दैवी आशीर्वादास त्याने अतिशय कमी लेखिले. त्यांना सुटकेची गरज होती आणि देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर काढून त्यांच्या कराराच्या देशात नेण्यासाठी त्यांच्यामधून एकास त्यांच्याकडे पाठविले. मोशेने संपूर्ण आयुष्यभर विश्वासू राहून साठ लाख इस्राएली लोकांना त्यांच्या आशीर्वादाच्या ठिकाणी नेऊन पोहोचविले.जेथे मोशेने सोडले तेथे यहोशवाने कमान हाती घेऊन लोकांस कनान देशात नेले आणि त्या देशावर कब्जा केला. मोशे आणि यहोशवासाठी ते सोपे नव्हते,कारण मिसर देशात ज्या लोकांनी मूर्तिपूजक शैली स्वीकारली होती आणि त्यांच्या पूर्वजांच्या देवाबद्दल अत्यंत कमी समज होती. अशा स्त्री पुरुषांचे नेतृत्व करणे सोपे नव्हते. मूर्तिपूजा आणि बंडखोरी त्यांच्यात इतके सखोल रूजली होती की नवीन पीढीस त्याने करार केलेल्या देशात नेण्यापूर्वी,संपूर्ण पीढी मरेपर्यंत देवाने वाट पाहिली. यहोशवाच्या काळानंतर ही दुःखाची गोष्ट होती पण एक अशी पिढी निर्माण झाली ज्यांना त्यांच्या पूर्वजांच्या देवाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याच्या लोकांच्या वतीने त्याने केलेल्या पराक्रमी कृत्यांबद्दल त्यांना माहीत नव्हते. म्हणून,ते सतत अविश्वासाच्या स्थितीत आणि देवावरील तात्पुरता विश्वास यांच्यामध्ये दोलायमान होते. म्हणून,देवाने त्याच्या सार्वभौमत्वात शत्रूच्या सैन्याला येऊन देशाचा विध्वंस करण्याची आणि त्याच्या लोकांवर अत्याचार करण्याची परवानगी दिली. जेव्हा लोक ते सहन करू शकेनात आणि त्याचा धावा करीत,तेव्हा तो पस्तावत असे आणि त्यांना सोडवणारा पाठवत असे. हे त्राते केवळ शत्रूंवर विजय मिळवीत नसत,तर लोकांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक गरजांवर देखरेख करणारे शास्ते म्हणूनही काम करीत. हे कायमस्वरूपी निराकरण नव्हते कारण शास्ते मरण पावल्यावर लोकांना लवकरच देवाचा विसर पडत असे. या लोकांच्या आध्यात्मिक जीवनातील चढउतार वाचून कंटाळा येतो आणि तरीही ते आपल्यापेक्षा फारसे वेगळे नाहीत!
विचार:
कोणीही मनुष्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील देवाच्या आकाराची पोकळी भरू शकत नाही.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/