YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yāनमुना

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

6 पैकी 6 दिवस

१ करिंथ. ११:२६ कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.

वधस्तंभावरील प्रभु येशूच्या बलिदानाने आपल्यासाठी काय केले आहे याबद्दल आपण कोणत्या गोष्टी घोषित करू शकतो?

प्रभु येशूच्या रक्ताद्वारे आपला परमेश्वर पित्याशी समेट झाला आहे या वस्तुस्थितीची – या महान सत्याची आपण घोषणा करून आनंद करू शकतो.

ख्रिस्ताने आमची सर्व पातके व दोष स्वतःवर घेऊन आमचीदंडाज्ञेपासूनसुटका केली आहे या सत्याचीआपण घोषणा करून आनंद करू शकतो.

ख्रिस्ताचे रक्त माझ्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला आरोग्यदेते या या सत्याचीआपण घोषणा करून आनंद करू शकतो.

आपण प्रभु येशू ख्रिस्ताचे आहोत या सत्याचीआपण घोषणा करून आनंद करू शकतो- मी प्रभुचा आहे आणि तो माझा आहे आणि माझ्यावर प्रभूच्या प्रीतीचा ध्वज फडकत आहे.

आपण आता एका नवीन (म्हणजे स्वर्गीय परमेश्वर पित्याच्या) कुटुंबाचे सदस्य आहोत या सत्याचीआपण घोषणा करून आनंद करू शकतो.

एके दिवशी प्रभु येशू ख्रिस्ताला आपण प्रत्यक्ष समोरासमोर पाहू या सत्याचीआपण घोषणा करून आनंद करू शकतो.

प्रभु येशू आम्हांला त्याच्या मेजावर त्याच्या प्रेमळ सहवासात बोलविण्यासाठी आमंत्रित करत आहे. त्याच्या मेजावर तुमच्या आणि माझ्यासारखे इतर बरेच लोक बसले आहेत आणि म्हणूनच आपण विश्वासणाऱ्याच्या समुदायामध्ये प्रभुभोजनाचा हा सोहळा एकत्रितपणे साजरा करतो.

वधस्तंभावरील येशूच्या बलिदानाने आपल्यासाठी काय केले याची सार्वजनिक घोषणा करण्यासाठी प्रभूचा मेज हे एक विशेष ठिकाण आहे.

एके दिवशी आम्ही दुसर्‍या मेजावर बसलेले असू : देवाच्या कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे एक मोठे मेज. आम्ही तेथे त्याची वधू म्हणून बसू, आणि आम्ही त्याच्याबरोबर सदैव सर्वकाळासाठी राहू.

या मेजाला आपण कधीही गृहीत धरून कमी लेखू नये. आम्हाला या मेजासमीपआणण्यासाठी प्रभु येशूला फार मोठे मोल द्यावे लागले. आपल्या अदभूत तारणकर्त्याचा सन्मान होईल अशा रीतीनेच आपण त्याच्या मेजासमीप येऊन प्रभुभोजनाचे योग्यरितीने सेवन करूया.

या भक्तिसमयाचा समारोप आपण चार प्रकारच्यामनन-चिंतनाद्वारे करूया :

मनाने थोडे मागे जाऊनचिंतन करा - तुम्हांला मुक्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे तुम्हांला एक नवीन उत्पत्ति - निर्मिती आणि देवाचे वारस मूल बनवण्यासाठी प्रभु येशूने तुम्हांसाठी काय केले त्याचे कृतज्ञतेने स्मरणकरा.

पुढचा विचार करत चिंतन करा - एके दिवशी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताबरोबर असाल आणि त्याच्या मेजवानीत त्याच्या मेजावर बसाल याबद्दल परमेश्वर देवाचे आभार माना.

अंतर्मुख होऊन विचार करा– ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानासाठी नेहमी कृतज्ञ आणि उपकारशील (आभारी) राहण्यासाठी आपल्या हृदयाचेपरिवर्तन करा. प्रभुभोजनाबद्दल कधीही अनौपचारिक होऊ नका किंवा या विधीस सहजरित्या घेऊ नका कारण यासाठी प्रभु येशूला आपले प्राण अर्पून फार मोठे मोल मोजावे लागले आहे.

एकत्र चिंतन करा - आजूबाजूला पाहा आणि तुम्ही आता ज्या स्वर्गीय परमेश्वर पित्याच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात त्याकरिता धन्यवाद द्या. जर तुमचे तुमच्या चर्च-मंडळी, धर्म-समुदायातील भाऊ किंवा बहिणीशी निराकरण न झालेलेकाही प्रश्न असतील तर त्यांच्याकडे जाऊन आधी त्या समस्यांचे निवारणकरून त्यांच्याशी समेट करा.

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही प्रभूच्या मेजासमीप याल तेव्हा तुम्ही सत्यांचे स्मरण करा, त्यावर मनन-चिंतन करा आणि त्याविषयी आनंद करा कारणयामुळेतुम्हीपरमेश्वराच्या अंतकरणाजवळ जाल.

दिवस 5

या योजनेविषयी

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/