YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yāनमुना

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

6 पैकी 1 दिवस

शास्त्रपाठ

१ करिंथ. ११: २३-२६

१ करिंथ. ११: २३कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभु येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली;२४ आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.”२५ मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”२६ कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.

१. मननाचा पहिला दिवस

१ करिंथ. ११वा अध्याय

२३कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभु येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली;

२४ आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.”

२५ मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”

२६ कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.

प्रत्येक शब्बाथ दिवशी यहुदी कुटुंबे एकत्र जमून, वल्हांडण सणाच्या स्मरणार्थ एकत्र भोजन करून ही आठवण साजरी करायचे. वल्हांडणाच्यादिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसर देशातील गुलामगिरीतून मुक्त करूनतेथून बाहेर आणले. त्या भोजनाच्या रात्री, परमेश्वराच्या आज्ञेनुसार इस्राएल लोकांना त्यांच्या दरवाज्याच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना यज्ञपशूच्या रक्ताने चिन्हांकित करावे लागले जेणेकरून मृत्यूचा दूत त्यांचे घर ओलांडून, त्यांची कोणतीही मृत्युहानी न करता निघून गेला.

प्रभु येशू ख्रिस्ताने या साप्ताहिक प्रथेमध्ये बदल केला.

परमेश्वराने त्यांना कसे वाचवले आणि गुलामगिरीतून कसे मुक्त केले याचे नियमित स्मरण करून देणारेहे भोजन म्हणजेएक पुर्वाभास - परमेश्वराच्या सत्य आणि शुद्ध कोकऱ्याची म्हणजे प्रभु येशू ख्रिस्ताच्या बलिदानामुळे संपूर्ण मानवजात त्यांच्या पापांपासून आणि सैतानाच्या तावडीतून कायमचे मुक्त होता आणि त्याद्वारे हे हजारो वर्षांपूर्वीचे भविष्यसूचक चित्र पूर्ण होणार होते.

गेथशेमाने बागेत जाण्यापूर्वी प्रभु येशूने शिष्यांसोबत घेतलेले हे शेवटचे भोजन आहे. ज्या रात्री, आपल्या शिष्यांसोबत येशूने भाकर मोडली आणि द्राक्षारस वाटून घेतला, त्या वेळी ख्रिस्ताने त्यांना सांगितले की,भाकर आणि द्राक्षारस हे त्याच्या शरीराचे आणि रक्ताचे प्रतीक आहे. संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी एकदाचेचअर्पिण्यात येणारा तो देवाचा कोंकरा होणार होता.

आणि हे सर्वकाही नाही कारण आम्ही यापुढेआमच्या विश्वासाचा केंद्रबिंदू म्हणून प्रभु येशूच्या मृत्यूच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ वल्हांडण सण साजरा करणार आहोत.

एवढेच नव्हे तर प्रभु येशू ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत आपण त्याच्या स्मरणार्थ हे करायचे आहे. यहूद्यांनी वल्हांडण सण साजरा केला. वल्हांडण सण, आज ज्याला आपण प्रभूचे मेज किंवा प्रभुभोजन म्हणतो तो आता ख्रिस्ताच्या अनुयायांकडून साजरा करून पाळला जात आहे आणि नंतर एके दिवशी आपण सार्वकालिक जीवनात दुसरे मेज साजरे करू - तेम्हणजे देवाच्या कोंकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे प्रीतीभोजन.

चला तर, आपणआठवणीने परमेश्वराचे आभार मानूया आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा करूया.

पवित्र शास्त्र

दिवस 2

या योजनेविषयी

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/