प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yāनमुना
आपण विसरूया...
या शास्त्रवचनातआम्हाला प्रभु येशू ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान, आणि वधस्तंभावरील त्याचे बलिदान स्मरणात ठेवण्यास सांगितले आहे.
तर, ज्या गोष्टींचा मला विसर पडावा म्हणून प्रोत्साहितकेले जात आहेत्या काय आहेत?
जेव्हा मी वधस्तंभावरील पूर्ण झालेल्या कार्यावर आणि ख्रिस्ताच्या मरणावरील विजयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मी केवळ त्या दिशेने नव्हे तर त्यापासून मी माझे जीवन जगतो; प्रभु येशूने मला क्षमा केलेली माझी सर्व पापे विसरणे हे माझ्यासाठी आता अत्यंत आवश्यक आहे.
मी माझ्या पापांसाठी मेलेलो असून केवळ ख्रिस्तासाठी जिवंत आहे.
येशूच्या रक्ताने माझी सर्व पापे धुतली गेली आहेत, ती जरी रक्तासारखी गडद लाल होती तरी आता ख्रिस्ताने मला बर्फासारखे शुभ्र आणि स्वच्छ केले आहे.
प्रभु येशू मला माझ्या सर्व पापांची क्षमा करतो आणि माझ्या पापांची तो आता आठवण ठेवू इच्छित नाही. त्यामुळे मलाही माझ्या पापांची आठवण ठेवायची आता गरज नाही.
माझी लज्जा आणि अपराधीपणा यांची बोच उराशी घेऊन जगण्याची आता मला गरज नाही.
माझ्या भूतकाळातील अपयशाला माझ्या मनात घर करू देण्याची मला गरज नाही कारण मी माझ्या भूतकाळाची अंधकारमय निर्मिती नव्हे तर माझे भविष्य प्रभु येशूमध्ये उज्ज्वल आहे.
मी यापुढे माझ्या भूतकाळाचा किंवा पापाचा गुलाम नाही तर प्रभु येशूमध्ये मी विजेत्यापेक्षाही अधिक मोठा असा आहे.
काही लोक प्रभुभोज स्वीकारण्यापूर्वी त्यांना त्यांच्या पापांची आठवण ठेवून पापकबुली देणे भाग पडते म्हणून स्वीकृतीच्या मेजाकडे जातात. हे बरेवाटत असले तरी, लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या धार्मिकतेच्या आधारावर, स्वतःच्या नैतिकतेच्या बळावरप्रभु येशूकडे येत नाही, तर केवळ त्याच्या बलिदानामुळे, त्याने तुमच्यासाठी स्वर्पणाने शक्य झाले आहे म्हणून येत आहात. येशू ख्रिस्ताने तुम्हालादेवाजवळ येण्याससुयोग्य असे नीतिमान बनवले आहे.
त्यामुळे तुमची स्वीकृती तुमच्या स्वतःच्या कामगिरीवर आधारित नाही. केवळ देवाच्या स्वर्गीयकृपे आणि दयेमुळे आपण दंडास पात्र असूनही आपल्याला दंडझालेला नाही आणि ज्या आध्यात्मिक आशीर्वादांसाठी आपण पात्र नाही ते आपल्याला ख्रिस्ताद्वारे अपार असे लाभले आहेत.
आता आपण धैर्याने कृपेच्या सिंहासनाजवळ कधीही जाऊ शकतो कारण प्रभु येशू ख्रिस्तानेआपल्या सर्व - भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातीलहीपापांसाठी किंमत मोजली आहे.
म्हणून आपण आपला भूतकाळ विसरून त्या गतायुष्याला मागे सोडूया. ख्रिस्त-अनुयायी या नात्याने ज्या महान आशेसाठी आपल्याला पाचारण करण्यात आले आहे त्या महान आशेवर आपण आपल्या भविष्याचा भक्कम पायाख्रिस्तासह घालू या.
या योजनेविषयी
प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/