प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yāनमुना
१ करिंथ. ११:२४ आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.”
आपण जाणतो कि प्रभु येशू ख्रिस्ताने (केवळ तुमच्या आमच्या पापांसाठी) एका सामान्य गुन्हेगाराप्रमाणेच रोमी लोकांच्या वधस्तंभावर एका भयानक आणिक्रूर अश्या मृत्यूच्या शिक्षेला स्वीकारले.
या टप्प्यावर असतांना, प्रभु येशू आपल्या शिष्यांशी बोलत असतांना त्यांना तो काय म्हणत होता ते त्यांना पूर्णपणे समजले नव्हते. चारही शुभवर्तमान आणि प्रेषित पौलाने विविध मंडळ्याना लिहिलेली पत्रे यातील वर्णने प्रभु येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर लिहिली गेली आहेत.
येशू ख्रिस्तयेथे जगाची पापे दूर करण्यासाठी अर्पणाचा कोंकरा झाला. जुन्या करारात आपल्याला सांगितलेलेच आहे की “रक्तानेच प्रायश्चित्त होते” (लेवीय १७:११).
प्रभु येशूचे रक्त आपल्याला सर्व अनीतिपासून शुद्ध करते. आपले अपराध-दोष दूर करते आणि त्यामुळेच आपण कोणताही अपराध-बोध न बाळगता जगू शकतो. तुमच्या आणि माझ्यासाठी दोन हजार वर्षांपूर्वीच वधस्तंभावर येशूने स्वतःचे रक्त वाहिले आहे. आणि हे आम्ही काही चांगले किंवा वाईट असे कोणतेही कृत्य करण्यापूर्वीचे आहे. त्यामुळे ती व्यवहारी अशी माफी नाही तर जो कोणीवधस्तंभावरील ख्रिस्ताच्या बलिदानावर व प्रभूच्या या सामर्थ्यावर विश्वास ठेवेल त्याला दिलेली ही बिनशर्त क्षमा/ माफी आहे. आपले तारण देवाच्याकृपेने आणि आपल्या विश्वासाद्वारे झाले आहे, आपण उद्धार पावलो आहोत. हीदेवाने आपल्याला दिलेली देणगी आहे. पाहा, आपला उद्धारकर्ता तारणहार किती अदभूतआणि आश्चर्यकारक असा आहे!
आणि आपण हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ख्रिस्ताने आपल्यासाठी एकदाचेच बलिदान केलेआहे, त्याचीकधीही पुनरावृत्ती होणार नाही.
ख्रिस्ताचे शरीर जे आपल्यासाठी घायाळ झाले त्यामुळेआम्हांस शारीरिक, मानसिक आणि आत्मिक असे संपूर्ण आरोग्य प्राप्त झाले अशी यशयाच्या पुस्तकामध्ये भविष्यवाणी आहे. त्याने स्वतःच्या शरीरावर वाहिलेल्या जखमांमुळे आपण संपूर्णतःनिरोगी झालो आहोत.
प्रत्येक वेळी आपण जेव्हा प्रभूच्या मेजासमीप येऊन प्रभुभोजनाचे सेवन करतो तेव्हा प्रभु येशूला आम्हांसाठी काय मोल द्यावे लागले आणि त्यामुळे आपल्याला किती अपार लाभ झाला याचे आपण नेहमी स्मरण करणे गरजेचे आहे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/