YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yāनमुना

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

6 पैकी 2 दिवस

प्रभु येशूने वल्हांडणाची जी संध्याकाळ आपल्या शिष्यांसोबत साजरी केली ती बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ होती. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणि मंदिरात यज्ञपशू अर्पण करण्यासाठी दूरदुरून आलेल्या यहूद्यांनी संपूर्ण यरुशलेम खचाखच भरले होते.

एकीकडे यहूदी लोक त्यांच्या इतिहासात खोलवर रुजलेली अशी विधी पाळत होते. इस्राएल राष्ट्राच्या जन्माचा तो स्मरण-सोहळा, देवाने निवडलेले असे विशेष लोक, जेतांबडा समुद्र ओलांडून आले होते.

प्रभु येशू आपल्या शिष्यांसह हा सोहळा साजरा करत होता. येशूने केलेल्या अनेक गोष्टी भविष्यसूचक होत्या. तसे पाहायला गेले तर प्रभु येशू आणि त्याच्या शिष्यांनीहा सणआपापल्या कुटुंबियांसोबत साजरा करायवयास हवा होता. मेजाभोवती जमलेल्या या बाराजणांचे चित्र एक भविष्यसूचक चित्रच होते – प्रभु येशूमधील नवीन कुटुंब !

आपण प्रभूच्या मेजाभोवती एक कुटुंब म्हणून जमलो आहोत कारण आपण सर्वजण आपल्या परमेश्वर पित्याचे संतान आहोत. प्रभूचा मेज हा निवडलेल्या लोकांची नवीन सुरुवात, एका पवित्र शाही याजकाची आणि परमेश्वराच्या पवित्र राष्ट्राची सुरुवात देखील चिन्हांकित करेल. प्रभु येशूचा वधस्तंभ हा प्रत्येक जाती-जमाती वराष्ट्रांतीलस्त्री-पुरुष यांतून जमलेल्या सर्व लोकांना एकत्र करणार होता: हे सर्वजण ख्रिस्तामध्ये एक नवीन मनुष्य बनून, जुन्या भविष्यवाण्या पूर्ण करत होते.

आपण काय लक्षात ठेवावं अशी कोणती इच्छाप्रभु येशू ख्रिस्ताने प्रदर्शित केली होती? त्यावर आपण उद्या चिंतन करू.

संदर्भवचनें :

·१ पेत्र २:९-१०

·प्रकटीकरण ५:५-१०

पवित्र शास्त्र

दिवस 1दिवस 3

या योजनेविषयी

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/