सामर्थ्याने आणि धैर्याने जगा!नमुना
"तो आपल्याला वाढण्यास मदत करण्यासाठी चारित्र्य तयार करतो"
चांगले चारित्र्य म्हणजे आपल्याला केवळ तारणाद्वारे मिळणारी गोष्ट नाही, तर कालांतराने आपण त्या विषयी शिकतो आणि ती विकसित होते. ख्रिस्तासारखे चारित्र्य निर्माण करण्यात मदत करणे हे देवाच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक आहे. पवित्र आत्मा आपल्यात येशूचे चारित्र्य निर्माण करून आणि विकसित करून आपल्याला येशूसारखे होण्यास मदत करतो. बायबल याला आत्म्याचे फळ म्हणते.
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. गलती. ५:२२-२३
आव्हानांच्या दरम्यान आपण कधी- कधी स्वत:च्या ताकदीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतो. असे केल्याने आपल्याला आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या ख्रिस्ती चारित्र्याशी तडजोड करण्याचा किंवा “आड मार्ग” घेण्याचा मोह होऊ शकतो. परंतु जेव्हा आपण पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मिळण्यासाठी धावा करतो, तेव्हा परिस्थिती कशीही असो, तो आपल्याला एकाग्रतेने, सत्याने आणि प्रामाणिकपणे वाटचाल करण्यास मदत करतो.
यशाच्या काळात, पवित्र शास्त्राचे समान निकष अबाधित राहिले पाहिजेत. स्वत:ची सेवा करणारा अभिमान आणि अहंकार हे देव आपल्या जीवनात विकसित करू इच्छित असलेल्या ख्रिस्ती चारित्र्याशी थेट संघर्ष करतात. खरं तर, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवाकडून पदोन्नती मिळत राहण्यासाठी नम्रता ही एक अट आहे.
“जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील." मत्तय ५:५
जेव्हा आपण ख्रिस्तासारख्या चारित्र्याने आपली आव्हाने आणि यश या दोन्हींचा सामना करतो, तेव्हा आपण देवाबरोबर चालण्यात वाढू लागतो. आत्म्याच्या फळात कार्य करणे आपल्या परम कल्याणासाठी आणि त्याच्या सन्मानासाठी कार्य करते हे देखील आपण ओळखू लागतो. आपण जितके देवाच्या सहवासात वाढू तितके देव आपल्या जीवनात अधिक आशीर्वाद सोपवू शकतो!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr