सामर्थ्याने आणि धैर्याने जगा!नमुना
“तुम्ही कधीच एकटे नसता”
अनेकदा असे म्हटले जाते की जीवनात चढउतारांची मालिका असते, आनंद आणि अभिवचनांचा काळ असतो आणि आव्हान आणि संशयाचे ऋतू मिसळलेले असतात. जीवन म्हणजे केवळ शिखरावर स्थिरपणे चढणे नव्हे; त्याऐवजी हा एक प्रवास आहे ज्यात टेकड्या आणि दऱ्या आहेत. अविश्वासणारा असो अथवा विश्वासणारा असो प्रत्येकजण जीवनातील चढउतारातून जात असतो.
पण ख्रिस्ती या नात्याने आपल्याला देवाकडून एक अविश्वसनीय वचन मिळाले आहे की आपल्याला जीवनात कधीही एकट्याने दऱ्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्याचे आम्हाला प्रोत्साहन देणारे शब्द येथे आहेत:
“खंबीर हो, हिंमत धर, त्यांना भिऊ नकोस, त्यांना घाबरू नकोस, कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही.” अनुवाद ३१:६
सत्य हे आहे की आव्हानाच्या आणि यशाच्या दोन्ही ऋतूंमध्ये आपल्याला देवाच्या उपस्थितिची आवश्यकता आहे. देव आपल्यासोबत आहे हे जाणून घेतल्याने आपण जीवनातील प्रत्येक आव्हानाला निराशेकडे जाण्याऐवजी यशाची पायरी म्हणून तोंड देऊ शकतो.
कोणताही पर्वत खूप उंच नाही किंवा दरी इतकी खोल नाही जिथे देव आपल्याला भेटू शकत नाही. आपली परिस्थिती काहीही असो, देव विश्वासू आहे आणि तो नेहमीच आपल्याबरोबर आहे!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr