YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सामर्थ्याने आणि धैर्याने जगा!नमुना

सामर्थ्याने  आणि धैर्याने जगा!

8 पैकी 4 दिवस

"त्याचे ध्येय वैयक्तिक आहे"

सृष्टीच्या प्रारंभापासून, पवित्र आत्मा अस्तित्वात आहे, जो सर्व पिढ्यांपासून आपल्यात राहतो.

"आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता." उत्पत्ति १:२

परंतु येशूने वधस्तंभावरील आपले कार्य पूर्ण केले नाही तोपर्यंत पवित्र आत्म्याची सेवा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी वैयक्तिक आणि घनिष्ठ बनली नाही. येशूने मृत्यूपूर्वी आपल्या शिष्यांना सांगितले की पवित्र आत्मा त्यांच्यात उपस्थित आहे, परंतु अद्याप त्यांच्यामध्ये राहत नाही..

"जग त्याला (पवित्र आत्मा) ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील. मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन." योहान १४:१७-१८

येशूने त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या शिष्यांना सांत्वन देण्याचे वचन दिले होते की, तो अजूनही त्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या उपस्थितीद्वारे आध्यात्मिकरित्या त्यांच्याबरोबर असेल. येशूने सुरू केलेले कार्य पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनात चालू आहे. देव चार गोष्टी करण्यासाठी आपल्यातील पवित्र आत्म्याचा वापर करतो:

१. तो तारणाला वैयक्तिक वास्तव बनवतो.

2. तो तुम्हाला विजयीपणे जगण्याचे सामर्थ्य देतो.

३. तो तुम्हाला वाढण्यास मदत करण्यासाठी तुमच्यात ख्रिस्ती चारित्र्य निर्माण करतो.

४. तो तुमच्या भल्यासाठी सर्व काही करतो.

पवित्र शास्त्र

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

सामर्थ्याने  आणि धैर्याने जगा!

तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr