सामर्थ्याने आणि धैर्याने जगा!नमुना
"स्वर्गाचा राजदूत - पवित्र आत्मा"
राजदूत हा एका सरकारचा अधिकृत प्रतिनिधी असतो जो त्याच्या लोकांमध्ये राहण्यासाठी, शांतता आणि सद्इच्छेचे मिशन पूर्ण करण्यासाठी दुसर्या सरकारकडे पाठविला जातो. तो ज्या सरकारचे प्रतिनिधित्व करतो त्या सरकारच्या अधिकाराने, उदारतेने आणि संसाधनांनी तो आपली कर्तव्ये पार पाडतो. त्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवून तो आपला हेतू सन्मानाने पूर्णत्वास नेतो.
अनेक अर्थांनी पवित्र आत्म्याचे कार्य स्वर्गातील राजदूतासारखे आहे. पवित्र आत्मा देवाच्या सर्व अधिकाराचे, सामर्थ्याचे आणि संसाधनांचे प्रतीक आहे आणि त्याच्या उपस्थितीद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचे प्रेम व्यक्त करतो आणि प्रकट करतो.
येशूचा त्याच्या शिष्यांबरोबरचा काळ संपत असताना, येशूने त्यांना सांगितले की येशू गेल्यानंतर त्यांना एकटे सोडले जाणार नाही. त्यांच्याबरोबर राहण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्याच्या जागी पाठविल्या जाणाऱ्या पवित्र आत्म्याबद्दल त्याने त्यांना सांगितले येशू म्हणाला:
"तरी मी तुम्हांला खरे ते सांगतो; मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी (पवित्र आत्मा) तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन." योहान १६:७
येशूचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाल्यानंतर, त्याने पवित्र आत्म्याला तो पुन्हा परत येईपर्यंत त्याच्या जागी आपल्याबरोबर राहण्यासाठी पाठवले. पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन, नेतृत्व, सांत्वन आणि सल्ला प्रदान करतो. येशूने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याबद्दल सांगताना त्याचे वर्णन असे केले:
“तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.” योहान १४:२६
देवाचे अस्तित्व आज पवित्र आत्म्याच्या रूपात आपल्याबरोबर आहे आणि तो आपल्या जगात आणि आपल्या जीवनात सक्रियपणे कार्यरत आहे.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr