येशूनं आपल्या मायले अन् त्या शिष्याले ज्याच्यावर तो प्रेम करत होता, जवळ उभा पाऊन आपल्या मायले म्हतलं, “हे आई, पाह्य, हा तुह्याला पोरगा हाय.” तवा त्या शिष्याले म्हतलं, “पाह्य, हे तुह्याली माय हाय.” अन् त्याचं वेळेपासून तो शिष्य तिले आपल्या परिवारात घरी घेऊन गेला.