YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 19

19
येशूले कोडे मारणे अन् मजाक करणे
1यावर पिलातुस राज्यपालाने सैनिकायले आदेश देला, कि येशूले घेऊन जाऊन त्याले फटके मारावे. 2अन् सैनिकायन काट्याचा मुकुट गुंफुन येशूच्या डोक्शावर ठेवला, अन् त्याले जांभळ्या रंगाचा झगा घालून देला. 3अन् त्याच्यापासी येऊन त्याची मजाक करून म्हणू लागले, “हे यहुदी लोकायच्या राजा, नमस्कार!” अन् त्याले थापडा मारल्या. 4तवा पिलातुस राज्यपालाने परत बायर येऊन लोकायले म्हतलं, “आयका, मी त्याले तुमच्यापासी परत बायर आणतो; कि तुमाला कळावे, कि मी त्याच्यात काईच दोष नाई पायत.”
वधस्तंभावर चढवण्याकरिता देणे
5तवा येशू काट्याचा मुकुट अन् जांभळ्या रंगाचा झगा घातलेला बायर आणल्या गेला, अन् पिलातुस राज्यपालान म्हतलं, “या माणसाले पाहा.” 6जवा मुख्ययाजकायन अन् देवळाच्या रक्षकायन त्याले पायलं, तवा कल्ला करून म्हतलं, “त्याले वधस्तंभावर चढवा, वधस्तंभावर!” पिलातुस राज्यपालाने त्याले म्हतलं, “तुमीच त्याले वधस्तंभावर चढवा; कावून कि मले त्याच्यात कोणताच दोष दिसत नाई.” 7यहुदी पुढाऱ्यायन त्याले उत्तर देलं, “आमच्यापासी मोशेचे नियम हायत, अन् त्या नियमशास्त्राच्या अनुस्वार तो मरणदंडाच्या योग्य हाय, कावून कि त्यानं आपल्या स्वताले देवाचा पोरगा म्हतलं.” 8जवा पिलातुस राज्यपालान हे गोष्ट आयकली, तवा तो खुपचं भेला. 9अन् आणखी किल्ल्याच्या अंदर गेला, अन् येशूले विचारलं, “तू कुठचा हायस?” पण येशूनं त्याले काहीच उत्तर देलं नाई. 10पिलातुस राज्यपालान त्याले म्हतलं, “माह्या संग कावून नाई बोलत? काय तुले मालूम नाई कि तुले सोडून देयाचा अधिकार मले हाय, अन् तुले वधस्तंभावर चढवण्याचा अधिकार पण मले हाय.” 11येशूनं त्याले उत्तर देलं, “जर तुले देवाच्या इकून अधिकार नाई देल्या गेल्या असता, तर तू माह्या सोबत काईच करू नाई शकला असता; म्हणून ज्याने मले तुह्या हाती पकडून देले हाय, त्याचं पाप जास्त हाय.” 12या कारणाने पिलातुस राज्यपालान त्याले सोडून द्यायचा प्रयत्न केला, पण यहुदी लोकायच्या गर्दीने कल्ला करून म्हतलं, “जर तू याले सोडून देशीन, तर तू रोमी सम्राटचा दोस्त नाई; जो कोणी स्वताला राजा करतो, तो रोमी सम्राटचा शत्रू हाय.” 13ह्या गोष्टी आयकून पिलातुस राज्यपालान येशूले बायर आणलं, अन् पिलातुस न्यायासनावर बसला, जे गोट्याचा चबुतऱ्या नावाच्या जागी होता, (इब्रानी भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात). 14तो दिवस फसह सणाच्या तयारीचा दिवस होता जो आरामाच्या दिवसाच्या पयले येते: तवा पिलातुस राज्यपालान यहुदी लोकायले म्हतलं, “आयका, हाचं हाय तुमचा राजा!” 15पण ते जोऱ्यानं कल्ला करू लागले, “त्याले मारून टाका त्याले मारून टाका, त्याले वधस्तंभावर चढवा!” पिलातुस राज्यपालान त्यायले म्हतलं, “काय मी तुमच्या राजाले वधस्तंभावर चढवू?” मुख्ययाजकानं उत्तर देलं, रोमी सम्राट सोडून आमचा दुसरा कोणता राजा नाई. 16तवा पिलातुसन येशूले वधस्तंभावर चढव्याले त्यायच्या ताब्यात देऊन देलं, अन् ते त्याले ततून घेऊन गेले.
वधस्तंभावर चढवणे
(मत्तय 27:32-44; मार्क 15:21-32; लूका 23:26-43)
17तवा सैनिकायन येशूले आपल्या ताब्यात घेतलं, त्यायनं येशू कडून आपला वधस्तंभ सोता उचल्याले लावला, अन् त्याले यरुशलेम शहराच्या बायर “कवटीची जागा” नावाचा जागी घेऊन गेले, ज्याले इब्रानी भाषेत “गुलगुता” म्हतल्या जाते. 18तती त्यायनं येशूले अन् त्याच्या संग दोन आणखी माणसायले वधस्तंभावर चढवले, एकाले इकून व दुसऱ्याले तिकून व मधात येशूले. 19अन् पिलातुस राज्यपालाने एक आरोप पत्र लिवून येशूच्या डोक्शाच्यावर वधस्तंभावर लावले, अन् त्या मध्ये हे लिवले होते, “नासरत नगराचा येशू जो यहुदी लोकायचा राजा.” 20हे आरोप पत्र लय यहुदी लोकायन वाचले, कावून कि ते जागा जती येशू वधस्तंभावर चढवल्या गेला होता, यरुशलेम शहराचा जवळ होते, अन् आरोप पत्र इब्रानी भाषेत अन् लतीनी भाषेत अन् युनानी भाषेत लिवलेल होतं. 21तवा यहुदी लोकायच्या मुख्ययाजकायन पिलातुस राज्यपालाले म्हतलं, “यहुदी लोकायचा राजा नको लिवू, पण हे लिव कि त्यानं म्हतलं, मी यहुदी लोकायचा राजा हाय.” 22पिलातुसन उत्तर देलं, “मी जे लिवलं ते लिवल.” 23जवा सैनिकायन येशूले वधस्तंभावर चढवलं, तवा त्याच्या कपड्यायचे चार भाग केले, अन् चारही सैनिकायन एक-एक भाग घेतला अन् त्याचा झगा पण घेतला, अन् त्या झग्याले शिवल्या नाई गेलं होतं वरून खाल परेंत विणलेला होता. 24म्हणून त्यायनं एकमेकाले म्हतलं, “आपण हा फाडू नाई, पण यावर चिट्टी टाकू कि तो कोणाचा होईन” हे यासाठी झालं कि पवित्रशास्त्रात जे लिवलेल हाय ते खरं व्हावं, “त्यायनं माह्याले कपडे एकामेकात वाटून घेतले, अन् माह्याल्या कपड्यावर चिट्टी टाकली.”
येशूचा आपल्या माय साठी प्रावधान
25मंग सैनिकायन असचं केलं. पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची माय, अन् त्याच्या मायची बहिण मरिया, क्लोपाची बायको अन् मगदला गावची मरिया ह्या तती उभ्या होत्या. 26येशूनं आपल्या मायले अन् त्या शिष्याले ज्याच्यावर तो प्रेम करत होता, जवळ उभा पाऊन आपल्या मायले म्हतलं, “हे आई, पाह्य, हा तुह्याला पोरगा हाय.” 27तवा त्या शिष्याले म्हतलं, “पाह्य, हे तुह्याली माय हाय.” अन् त्याचं वेळेपासून तो शिष्य तिले आपल्या परिवारात घरी घेऊन गेला.
कार्य पूर्ण होणे
(मत्तय 27:45-56; मार्क 15:33-41; लूका 23:44-49)
28याच्यानंतर येशूनं हे समजून कि त्यानं आपलं सगळं काई पूर्ण होऊन गेलं हाय; म्हणून कि पवित्रशास्त्रात लिवलेली गोष्ट पूर्ण होण्यासाठी म्हतलं, “मी तहानलेला हाय.” 29तती रस भरून ठेवलेलं एक भांड होतं, म्हणून कोणी तरी रसाने भरलेला गोया एका एजोब झाडाच्या काळीच्या टोकावर ठेऊन येशूच्या तोंडावर लावला. 30जवा येशूनं तो रस चुसला, तवा म्हतलं, “पूर्ण झालं” अन् मुंण्डक खाली करून त्याने आपला प्राण सोडून देला.
भाल्याने खुपसले
31आता हा तयारीचा दिवस होता, अन् दुसऱ्या दिवशी आरामाचा दिवस अन् फसह सण दोन्ही पण होते. हा यहुदी लोकायसाठी महत्वाचा दिवस होता, अन् त्यायले नाई वाटत होतं, कि या दिवसाच्या वाक्ती मेलेलं शरीर वधस्तंभावर राहावं, म्हणून त्यायनं पिलातुस राज्यपालाले म्हतलं, कि त्या माणसायची पाय मोडावेत, यासाठी कि त्यायचं मरण लवकर होऊन जावो, अन् त्या मेलेल्या शरीराले खाली उतरवू शकलो पायजे. 32म्हणून सैनिकायन येऊन पयल्या माणसाचे पाय मोडले, मंग दुसऱ्याचे पण मोडले जे येशूच्या सोबत वधस्तंभावर चढवले होते. 33पण जवा येशूच्या जवळ येऊन पायलं कि तो मेला हाय, तवा त्याचे पाय नाई मोडले. 34पण सैनिकाय पैकी एकाने त्याच्या कुशीत भाला खुसपला, अन् त्यातून लवकर पाणी अन् रक्त बायर निघाले. 35ज्या माणसाने हे सगळं पायलं, त्यानं साक्ष देली हाय अन् त्याची साक्ष खरी हाय, अन् त्याले मालूम हाय, कि तो खरा बोलत हाय, कि तुमी पण येशूवर विश्वास करत राहावं; 36ह्या गोष्टी याच्यासाठी झाल्या, कि पवित्रशास्त्र जे लिवलेल हाय ते खरं होऊन जावं, “त्याची कोणती पण हड्डी तोडल्या नाई जाईन.” 37पवित्रशास्त्रात एकाजागी आणखी असं लिवलेल हाय, “ज्याले त्याने भोकसले हाय, त्याच्याइकडे पायतीन.”
योसेफच्या कबर मध्ये येशूला रोयने
(मत्तय 27:57-61; मार्क 15:42-47; लूका 23:50-56)
38ह्या गोष्टी नंतर अरीमतियाह शहराचा योसेफान जो येशूचा शिष्य होता, (पण यहुदी पुढाऱ्यायच्या भेवाच्यान या गोष्टीले लपवून ठेवत होता), पिलातुस राज्यपालाले विनंती केली कि मी येशूच्या मेलेल्या शरीराले घेऊन जातो, अन् पिलातुस राज्यपालाने त्याची विनंती आयकली, अन् त्यानं येऊन येशूच्या मेलेल्या शरीराले घेऊन गेला. 39निकदेमुस पण जो पयले येशूच्या पासी रात्री गेला होता, पन्नास शेराच्या (जवळपास तेत्तीस किलो) गंधरस व अगरू घेऊन गेला. 40तवा त्यानं येशूच्या शरीराले घेतलं अन् यहुदी लोकायच्या रोयाच्या रीतीप्रमाणे, त्यायनं मलमलच्या कपड्याच्या लंब्या चादरीत सुगंधी मसाला#19:40 सुगंधी मसाला यहुदी रिती प्रमाणे मेलेल्या माणसाच्या शरीराला सुगंधीत द्रव्य लावून ठेवण्याची पध्दत होती लावून येशूच्या शरीराले गुंडाऊन ठेवलं. 41त्या जाग्याच्या जवळ जती येशू वधस्तंभावर चढवल्या गेला होता, एक बगीच्या होता; अन् त्या मध्ये एक कब्रेची गुफा होती ज्याच्यात कोणाले पण कधीच ठेवलेलं नव्हत. 42म्हणून त्यानं येशूच्या मेलेल्या शरीराले त्याचं कबरेच्या गुफेत मध्ये ठेवले होते, कावून कि ते जवळ होती, अन् तो यहुदी लोकायच्या फसह सणाचा तयारीचा दिवस होता.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in