YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 18

18
बगीच्या मध्ये येशूला बंदी केले
(मत्तय 26:47-56; मार्क 14:43-50; लूका 22:47-53)
1जवा येशूनं प्रार्थना करणे समाप्त केली, तवा आपल्या शिष्याय संग किद्रोनच्या नाल्याच्या तिकडल्या बाजूने गेला, तती बगीच्या होता, अन् ते त्या बगीच्यात गेले. 2अन् येशूला पकडणाऱ्या यहुदा इस्कोरोती पण ते जागा माईत होती, कावून कि येशू आपल्या शिष्यायच्या सोबत तती जात रायत होता. 3तवा यहुदा इस्कोरोती सैनिकायच एक दल अन् मुख्ययाजक व परुशी लोकायकडून देवळातल्या रक्षकायले घेऊन दिवे, मशाली अन् शस्त्र घेऊन येशू पासी आला. 4तवा येशू त्या सगळ्या गोष्टीले ज्या त्याच्या संग होणार होत्या, ओयखून त्यायच्या कडे निघाला, अन् त्यायले म्हणाले लागला, “तुमी कोणाले पायता?” 5त्यायनं त्याले उत्तर देलं, “नासरत नगराच्या येशूले” येशूनं त्यायले म्हतलं, “मी नासरत नगराचा येशू हाय” अन् त्याचा पकडून देणारा यहुदा इस्कोरोती पण त्यायच्या संग उभा होता. 6येशूनं म्हणताचं, “मी नासरत नगराचा येशू हाय,” ते मांग सरकून जमिनीवर खाली पडले. 7तवा येशूनं त्यायले आणखी विचारलं, “तुमी कोणाले पायता.” त्यायनं म्हतलं, “नासरत नगराच्या येशूले.” 8येशूनं उत्तर देलं, “मी तर तुमाले सांगतल हाय कि मीच हाय, जर मले तुमी पाऊन रायले, तर या दुसऱ्या लोकायले इथून जाऊ द्या” 9असं याच्यासाठी झालं, कावून कि येशूनं जे पयले म्हतलं होतं, ते खरं होऊन जावं: “ज्यायले तू मले देलं हाय, त्यायच्यातून मी एकाला हि गमावले नाई.” 10तवा शिमोन पतरसन आपल्या जवळची तलवार काढली अन् महायाजकाच्या दासावर चालवून त्याचा उजवा कान कापून टाकला, त्या दासाचे नाव मलखूस होते. 11तवा येशूनं पतरसले म्हतलं, “आपली तलवार म्यानात घाल. मले देवबापाच्या कडून मिळालेला दुखाचा कटोरा पिणे आवश्यक हाय?”
हन्नाच्या समोर येशू
12तवा सैनिक अन् त्यायचे सुभेदार अन् यहुदी देवळातले रक्षकायन पकडून येशूले बांधल. 13अन् पयले त्याले हन्ना पासी घेऊन गेले, कावून कि तो त्या वर्षाचा महायाजक कैफाचा सासरा होता. 14अन् तो तोच कैफा होता, ज्याने यहुदी लोकायले सल्ला देला होता, कि आमच्या लोकायसाठी एका माणसाच मरण चांगलं हाय.
पतरसचे येशूला नाकारणे
(मत्तय 26:69-70; मार्क 14:66-68; लूका 22:55-57)
15शिमोन पतरस अन् एक दुसरा शिष्य पण येशूच्या मांग गेले. हा शिष्य महायाजकाच्या ओयखीचा होता, अन् येशूच्या संग महायाजकाच्या आंगणात गेला. 16पण पतरस बायर दरवाज्यापासी उभा रायला, तवा तो दुसरा शिष्य जो महायाजकाच्या ओयखीचा होता, बायर निघाला, अन् दरवाज्यावर नेमलेल्या दासीले सांगून, पतरसले अंदर घेऊन आला. 17त्या दासीले जे दरवाज्यावर नेमलेली दासी होती, तीन पतरसले म्हतलं, “काय तू पण ह्या माणसाच्या शिष्यायतून हाय?” त्यानं म्हतलं, “मी नाई हाय.” 18दास अन् देवळाचे रक्षक थंडीच्यान कोयसे जाळून इसत्या जवळ अंग शकुन रायले होते, अन् पतरस पण त्यायच्या संग अंग शकून रायला होता.
महायाजका समोर येशू
(मत्तय 26:59-66; मार्क 14:55-64; लूका 22:66-71)
19तवा महायाजकानं येशूले त्याच्या शिष्यायच्या बाऱ्यात अन् त्याच्या शिकवणीच्या बाऱ्यात विचारपूस केली. 20येशूनं त्याले उत्तर देलं, “मी सगळ्या लोकाय संग उघडपणे गोष्टी केल्या; मी धार्मिक सभास्थानात अन् देवळात जती यहुदी लोकं एकत्र होतं असते, नेहमी शिकवण देली, अन् लपून काईच बोललो नाई. 21तू मले हा प्रश्न कायले विचारते? आयकणाऱ्यायले विचार: कि मी त्यायले काय म्हतलं होतं? आयक, त्यायले माईत हाय; कि मी काय-काय केले.” 22जवा येशूनं हे म्हतलं, तवा देवळाच्या रक्षकायतून एकानं जो बाजुले उभा होता, येशूले थापड मारून म्हतलं, “काय तू महायाजकाले ह्या प्रकारे उत्तर देत हाय?” 23येशूनं त्याले विचारलं, “जर मी खराब म्हतलं, अती सगळ्यायले सांग, पण जर चांगलं म्हतलं, तर मले कावून मारते?” 24तवा हन्नाने येशूले बांधलेलच कैफा महायाजकापासी पाठून देलं.
पतरसचे येशूला परत नाकारणे
(मत्तय 26:71-75; मार्क 14:69-72; लूका 22:58-62)
25शिमोन पतरस उभाहून हात शेकून रायला होता. तवा त्यायन; त्याले म्हतलं; “काय तू पण त्याच्या शिष्यायतून एक हायस?” पतरसन नकार करून म्हतलं, “मी नाई हाय.” 26महायाजकाच्या दासायतून एक जो त्याच्या परिवारातून होता, ज्याचा कान पतरसन कापला होता, त्यानं म्हतलं, “काय मी तुले येशूच्या संग बगीच्यात नाई पायलं होतं?” 27पतरसन परत नकारलं, अन् लवकरच कोंबड्यान बाग देला.
येशूला पिलातुसच्या समोर आणणे
(मत्तय 27:1-2,11-31; मार्क 15:1-20; लूका 23:1-25)
28सकाळच्या वेळी येशूले कैफा महायाजकापासून रोमी राज्यपाल पिलातुसच्या किल्ल्यात घेऊन गेले, पण ते स्वता किल्ल्याच्या अंदर नाई गेले, कावून कि जर त्यायच्यातून कोणी पण अंदर गेला असता तर तो अशुद्ध झाला असता#18:28 अशुद्ध झाला असता अशुद्ध होयाच कारण हे होतं कावून कि पिलातुस राज्यपास हा यहुदी नव्हता अन् त्याले फसह सणाच जेवण खायाची अनुमती भेटली नसती. 29तवा पिलातुस राज्यपाल त्यायच्या जवळ बायर निघून आला अन् म्हतलं, “तुमी या माणसावर कोण्या गोष्टीचा आरोप लावता?” 30त्यायनं त्याले उत्तर देलं, “जर तो गुन्हेगार नाई असता, तर आमी याले तुह्यापासी नाई आणलं असतं.” 31पिलातुसन त्यायले म्हतलं, “तुमीच याले घेऊन जाऊन मोशेच्या नियमशास्त्राच्या प्रमाणे त्याचा न्याय करा.” यहुदी पुढाऱ्यान त्याले म्हतलं, “आमाले कोणाले पण प्राणदंड देण्याची अनुमती नाई हाय.” 32हे यासाठी झालं, कि येशूची ते गोष्ट पूर्ण हो, जे त्याने हे सुचवून म्हतली होती, कि तो कोण्या प्रकारे मरणार. 33तवा पिलातुस राज्यपाल परत किल्ल्याच्या अंदर गेला अन् येशूले किल्ल्याच्या अंदर बलावून त्याले विचारलं, “काय तू यहुदी लोकायचा राजा हाय?” 34येशूनं उत्तर देलं, “काय तू हे गोष्ट आपल्या इकून म्हणतो कि, दुसऱ्यायन माह्या बाऱ्यात तुले सांगतली हाय?” 35पिलातुस राज्यपालान उत्तर देलं, “तुले मालूम हाय कि मी यहुदी नाई हाय, तुह्याच जातीच्या लोकायन अन् मुख्ययाजकानं तुले माह्या हाती सोपून देले हाय, तू काय केलं हाय?” 36येशूनं उत्तर देलं, “माह्य राज्य ह्या जगातलं नाई, जर माह्य राज्य या जगातलं असतं, तर माह्या शिष्यायनं लढाई केली असती, कि मी यहुदी पुढाऱ्याच्या हातून बंदी नाई केल्या गेलो असतो: पण माह्य राज्य इथले नाई.” 37पिलातुस राज्यपालन त्याले म्हतलं, “तर काय तू राजा हायस?” येशूनं उत्तर देलं, “तू म्हणतो, कि मी राजा हाय; माह्या जन्म घेयाचा अन् जगात येण्याच कारण हे हाय, कि खऱ्याच्या बाऱ्यात शिकवू; खऱ्याले मानणारे सगळे माह्याली गोष्ट आयकतात.” 38पिलातुस राज्यपालान येशूले म्हतलं, “खरं काय हाय?” अन् हे म्हणून तो परत यहुदी पुढाऱ्यायपासी चालला गेला, अन् त्यायले म्हतलं, “मले तर त्याच्यात काहीच दोष दिसत नाई.
येशू कि बरब्बा
39पण तुमचा हा रिवाज हाय, कि फसह सणाच्या वाक्ती तुमच्यासाठी एका माणसाले सोडून देऊ. तर काय तुमाले वाटते, कि मी तुमच्यासाठी यहुदी लोकायच्या राजाले सोडून देऊ?” 40तवा त्यायनं परत जोऱ्यानं कल्ला करून म्हतलं, “याले नाई पण आमच्यासाठी बरब्बाले सोडून दे.” अन् बरब्बा एक डाकू होता.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in