YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 17

17
येशूची स्वतासाठी प्रार्थना
1येशूनं ह्या गोष्टी आपल्या शिष्यायले सांगतल्यावर अभायाच्या इकडे पाऊन म्हतलं, “हे देवबापा, ती वेळ आली हाय, आपल्या पोराचा गौरव कर, कि मी, पोरगा पण तुह्याला गौरव करीन. 2कावून कि तू मले सगळ्या लोकायवर अधिकार देला, कि ज्या लोकायले तू मले देलं हाय त्या सगळ्यायले तो अनंत जीवन देईन. 3अनंत जीवन हे हाय, कि लोकायन तुले ओयखावं, अर्थात फक्त एकमात्र खऱ्या देवाले, अन् हे कि त्यायनं मले ओयखावं कि येशू ख्रिस्त हावो, ज्याले तू पाठवलं हाय. 4जे काम तू मले कऱ्याले देलं होतं, त्याले पूर्ण करून, मी पृथ्वीवर तुह्य गौरव केलं हाय. 5अन् आता, हे बापा, आता आपल्या उपस्थितीत माह्याला गौरव कर, तोचं गौरव जो जगाच्या सृष्टीच्या पयले तुह्या संग असतांना माह्यापासी होता.”
येशूची आपल्या शिष्यायसाठी प्रार्थना
6“मी तुह्य नाव, त्या लोकायले सांगतले ज्यायले तू मले जगातून दिले हाय. ते तुह्याले होते अन् त्यायले तू मले देलं हाय, अन् त्यायनं तुह्या वचन पालन केले हाय. 7आता त्यायले मालूम झालं हाय कि जे काई त्या तू मले देलं हाय, सगळं तुह्याच इकून हाय. 8कावून कि जो संदेश तू माह्या परेंत पोहचवला, मी त्यायच्या परेंत पोहचून देला, अन् त्यायनं संदेशाचा स्वीकार केला, अन् त्यायनं खरं-खरं ओयखलं हाय, कि मी तुह्या पासून आलो हाय, अन् हा विश्वास केला हाय तुचं मले पाठवलं. 9मी त्यायच्यासाठी प्रार्थना करतो, मी ह्या जगाच्या लोकायसाठी प्रार्थना नाई करत, पण त्यायच्यासाठी ज्यायले तू मले देलं हाय, कावून कि ते तुह्याले हाय. 10अन् जे काई माह्य हाय, ते सगळं तुह्यालं हाय; अन् जे तुह्यालं हाय ते माह्याल हाय; अन् यायच्यापासून माह्याला गौरव प्रगट झाला हाय. 11मी आता जगात नाई रायणार, पण मी तुमच्यापासी येत हाय; माह्ये शिष्य आता पण जगात हायत, हे पवित्र बापा, आपल्या सामर्थ्याने त्यायचे रक्षण कर, कि जसे आमी एकचित्त हावो, तसेच हे पण एकचित्त होतीन. 12जवा मी त्यायच्या सोबत होतो, तवा मी तुह्या नावानं जे तू मले देलं हाय, त्यायची रक्षा केली, मी त्यायची काळजी घेतली, अन् ज्या माणसाने नाश होण्याचा रस्ता निवडला हाय, तुह्या पासून भटकला हाय, त्याले सोडून कोणीचं नष्ट नाई झाले, कि पवित्रशास्त्रात जे लिवले हाय, ते पूर्ण हो. 13पण मी आता तुह्यापासी येतो, अन् जगात असतांना ह्या गोष्टी मी जगाला सांगतो, कि ते माह्या आनंदाने पूर्ण पणे भरून जातीन. 14मी तुह्या संदेश त्यायले पोहचवला हाय, अन् जगाच्या लोकायन त्याचा विरोध केला हाय, कावून कि जसा मी जगाच्या समंधीत नाई, तसाच ते लोकं पण जगाच्या समंधीत नाई. 15मी हे प्रार्थना नाई करत, कि तू त्या लोकायले जगातून उचलून घे, पण हे कि तू सैतानापासून त्यायची रक्षा कर. 16जसा माह्या या जगा संग काई समंध नाई, तसाच त्या लोकायचा पण जगा संग काई समंध नाई. 17तुह्य वचन खरं हाय, म्हणून त्यायले खराईत आपल्यासाठी वेगळ कर. 18जसं तू मले जगात पाठवलं, तसचं मी पण त्यायले जगात पाठवलं हाय. 19त्यायच्या फायद्यासाठी मी स्वताले पवित्र केलं हाय, कि ते पण खऱ्यापासून पवित्र केल्या जावे.”
येशूची आपल्या सगळ्या विश्वासी लोकायसाठी प्रार्थना
20“मी फक्त या शिष्यासाठी प्रार्थना नाई करत, पण त्यायच्यासाठी जो यायचा संदेश आयकून माह्यावर विश्वास करतीन. 21कि ते सगळे एक झाले पायजे; जसा हे बापा तू माह्यात हायस, अन् मी तुह्यात हाव तसचं ते पण आपल्यात एक व्हावे, यासाठी कि जगाचे लोकायन विश्वास करावं, कि तोचं मले पाठवले हाय. 22अन् तो गौरव जो त्यानं मले देला, मी त्यायले देला हाय, कि ते एक झाले पायजे, जसे कि आपण एक हावो. 23मी त्यायच्यात अन् तू माह्यात कि ते परिपूर्ण होऊन एकचित्त होऊन जावो, अन् जगाच्या लोकायले मालूम व्हावं, कि तुचं मले पाठवले हाय, अन् जसं तू माह्या संग प्रेम केलं, तसचं त्यायच्या संग प्रेम केलं. 24हे देवबापा माह्यी हे इच्छा हाय, कि ज्या लोकायले तू मले देलं, जती मी हावो, तती ते पण माह्या सोबत असावे, कि ते माह्या गौरवाले पायतीन जो तू मले देले हाय, कावून कि तू जगाच्या सृष्टीच्या पयले माह्यावर प्रेम केलं. 25हे धर्मी बापा, जगाच्या लोकायन मले नाई ओयखलं, पण मी तुले ओयखलं हाय अन् या शिष्यायनं पण ओयखलं हाय, कि तुचं मले पाठवले हाय. 26मी त्यायच्यावर प्रगट केले हाय, कि तू कोण हायस, अन् सुवार्था सांगत राईन कि जे प्रेम तुह्य माह्यावर होतं, ते त्यायच्या राहो, अन् मी त्यायच्यात राईन (अर्थात पवित्र आत्माच्या रुपात).”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in