अन् तो गौरव जो त्यानं मले देला, मी त्यायले देला हाय, कि ते एक झाले पायजे, जसे कि आपण एक हावो. मी त्यायच्यात अन् तू माह्यात कि ते परिपूर्ण होऊन एकचित्त होऊन जावो, अन् जगाच्या लोकायले मालूम व्हावं, कि तुचं मले पाठवले हाय, अन् जसं तू माह्या संग प्रेम केलं, तसचं त्यायच्या संग प्रेम केलं.