युहन्ना 16
16
1“ह्या गोष्टी मी तुमाले याच्यासाठी सांगतल्या, कि तुमचा विश्वासा कम नाई झाला पायजे. 2ते तुमाले धार्मिक सभास्थानातून बायर हकालून देतीन, अन् ते वेळ येत हाय, कि जो कोणी तुमाले मारून टाकीन, तो हे समजीन, कि मी असं करून देवाची सेवा करतो. 3अन् ते हे तुमच्या संग यासाठी करतीन कि त्यायनं नाई देवबापले ओयखलं अन् नाई मले ओयखतात.” 4पण हे गोष्ट मी तुमाले याच्यासाठी सांगतली, कि जवा त्याचा पूर्ण होयाचा वेळ येईन, तर तुमाले आठवण आली पायजे, कि मी “जवा सुरवातीला तुमी माह्याले शिष्य बनले, मी ह्या गोष्टी यासाठी नाई केल्या कावून कि मी तुमच्या सोबत होतो.
पवित्र आत्माचे कार्य
5पण आता मी माह्या पाठवणाऱ्या पासी वापस जाऊन रायलो हाय, अन् तुमच्यातून कोणी मले नाई विचारत, कि मी कुठं जाऊन रायलो हाय? 6पण मी ज्या ह्या गोष्टी तुमाले सांगतल्या हाय, म्हणून तुमी लय उदास हा. 7तरी पण मी तुमाले खरं सांगतो, कि माह्य जाणं तुमच्यासाठी चांगलं हाय, कावून कि जर मी नाई गेलो, तर तो मदत करणारा तुमाले मदत करण्यासाठी नाई येणार, पण जर मी जाईन, मी त्याले तुमच्यापासी पाठवून देईन. 8अन् तो येऊन जगाच्या लोकायचे पाप अन् धार्मिकता अन् देवाच्या न्यायाच्या विषयात खात्री करून घेईन. 9तो हे पष्ट करीन, कि ते पापाच्या विषयी चुकीचे हाय, कावून कि ते माह्यावर विश्वास करायले नकार करतात; 10अन् तो हे पष्ट करीन कि धार्मिकताच्या विषयात चुकीचे हाय, कावून कि मी देवबापाच्या पासी जातो, अन् ह्या नंतर तुमी मले नाई पायसान; 11तो हे पष्ट करीन, कि ते न्यायाच्या विषयी चुकीचे हाय, कावून कि देवाने पयलेच ह्या जगाचा शासक अर्थात सैतानाले दोषी ठरवलं हाय.” 12“मले तुमाले आणखी गोष्टी सांगायच्या हायत, पण आता ते तुमच्या समजण्याच्या दूर हाय. 13पण जवा तो, म्हणजे खऱ्याचा आत्मा येणार, तवा तो आत्मा तुमाले देवाच्या बाऱ्यात जे पण खरं हाय, समजण्याचा कारण बनीन, कावून कि तो आपल्या अधिकारानं नाई बोलीन, पण जे देवाच्या इकून आयकीन ते म्हणीन, अन् येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमाले सांगणार. 14तो माह्या गौरव करीन, कावून कि त्याले माह्यापासून भेटलं हाय, तो तुमाले तेच सांगण. 15जे काई देवबापाच हाय, ते सगळं माह्य हाय; म्हणून मी म्हतलं, कि पवित्र आत्मा तुमच्यावर प्रगट करीन जो पण तो माह्यापासून प्राप्त करते.”
दुख आनंदात बदलले
16“काई वेळाने तुमी मले नाई पायसान, अन् थोड्यावेळाने तुमी मले परत पायसान.” 17तवा येशूच्या कईक शिष्यायनं एकामेकायले म्हतलं, “हे काय हाय, जो तो आमाले म्हणतो, थोड्याच वेळाने तुमी मले नाई पायसान, अन् थोड्याच वेळात मले पायसान? अन् त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय हाय कि मी देवबापापासी जात हाय?” 18तवा त्यायनं म्हतलं, “हे थोडा वेळ जो तो म्हणतो, काय अर्थ हाय? आमाले नाई माईत, कि काय म्हणतो.” 19येशूनं हे जाणून, कि ते मले या गोष्टीचा अर्थ विचारण्याच्या इच्छेत हायत, त्यायले विचारलं, “काय तुमी एकमेकात माह्या बद्दल विचारपूस करून रायले, थोड्याच वेळात तुमी मले नाई पायसान, अन् मंग थोड्याच वेळात तुमी मले परत पायसान? 20मी तुमाले खरं-खरं सांगतो; कि तुमी माह्या मरणानंतर रडसान अन् दुख करसान, पण जगाचे लोकं आनंद करतीन: तुमाले दुख होईन, पण जवा तुमी मले परत पायसान तवा तुमचे दुख आनंदात बदलून जाईन. 21बाईले लेकरू जन्म देयाच्या वाक्ती, तिले किती तरास होते, पण लेकराले जन्म देल्यावर, हे विचार करून आनंद करते, कि जगात एक लेकरू जन्मला हाय, म्हणून त्या त्रासाचे आठवण करत नाई. 22अश्याच प्रकारे तुमाले पण दुख झाले हाय, पण मी तुमाले परत भेटीन, अन् तुमाले लय आनंद होईन; अन् तुमचा आनंद तुमच्या पासून कोणीहि हिसकावून घेणार नाई. 23त्या दिवशी, तुमी मले काई विचारसान नाई; मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जर तुमी बापाले माह्या नावान काई मांगसान तर तो तुमाले देईन. 24आतापरेंत तुमी माह्या नावानं देवबापाले काई नाई मांगतलं; मांगसान तर तुमाले भेटीन, कावून कि तुमी पूर्ण आनंदित झाले पायजे.”
जगावर विजय
25“मी ह्या साऱ्या गोष्टी तुमाले सांकेतिक भाषेच्या रुपात सांगतल्या, पण ते वेळ येत हाय, कि मी तुमाले सांकेतिक भाषेच्या रुपात नाई सांगीन, पण उघडपणे तुमाले बापाच्या विषयात सांगीन. 26त्यावाक्ती तुमी माह्या नावान मांगसान, अन् मले तुमच्यासाठी आपल्या बापाले प्रार्थना करण्याची आवश्यता नाई रायणार कि त्यानं ते करावं जे तुमी मांगता. 27कावून कि, माह्या बाप तर स्वताचं तुमच्यावर प्रेम करते, कावून कि तुमी माह्यावर प्रेम केलं हाय, अन् हा पण विश्वास केला, कि मी बापापासून आलो हाय. 28मी बापापासून जगात आलो हाय, परत जगाले सोडून देवबापापासी वापस जाईन.” 29येशूच्या शिष्यायनं म्हतलं, “पाहा, आता तर तू स्पष्ट पणे म्हणत हाय, पण कोणत्या सांकेतिक भाषेत नाई सांगत. 30आता आमाले समजले, कि तुले सगळं काई माईत हाय, कोणाले पण तुले प्रश्न विचारण्याची गरज नाई, आमी विश्वास करतो, कि तू देवाच्या इकून आला हाय.” 31हे आयकून येशूनं त्यायले म्हतलं, “आता तुमी विश्वास करता? 32पाहा, ते वेळ येत हाय, अन् आलेली हाय, कि तुमी सगळे फानाफान होऊन आपला-आपला रस्ता पकडतीन, अन् मले एकटा सोडून देतीन, तरी पण मी एकटा नाई कावून कि देवबाप माह्या संग हाय. 33मी ह्या गोष्टी तुमाले याच्यासाठी सांगतल्या हाय, कि तुमी माह्याले असल्याने तुमाले शांती मिळावं; जगात तुमाले दुख सहन करावे लगीन, पण शांती ठेवा, मी या जगाचा शासक म्हणजे सैतानाले हारवायले आलो हाय.”
Currently Selected:
युहन्ना 16: VAHNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.