युहन्ना 14
14
येशू आपल्या शिष्यायले सांत्वन देते
1“तुमचं मन व्याकूळ झालं नाई पायजे, तुमी देवावर विश्वास ठेवता, अन् माह्यावर पण विश्वास ठेवा. 2कावून कि मी तुमच्यासाठी जागा तयार कऱ्याले जात हाय. जर नसती तर मी तुमाले सांगून देलं असतं. 3अन् मी गेल्यावर अन् जागा तयार केल्यावर, तर मंग वापस येऊन तुमाले माह्या संग रायासाठी घेऊन जाईन, कि जती मी रायतो तती तुमी पण राहा,
रस्ता, खरं, अन् जीवन
4जती मी चाललो त्या जागेचा रस्ता तुमाले मालूम हाय.” 5थोमान येशूले म्हतलं, “हे प्रभू, आमाले नाई माईत कि तू कुठसा जातो; तर रस्ता कसा ओयखावा?” 6येशूनं त्याले म्हतलं, “रस्ता अन् सत्य अन् तो जो जीवन देतो, तो मीच हाय; माह्याला शिवा कोणी पण देवबापापासी नाई पोहचू शकत. 7जर तुमी मले ओयखलं हाय, तर माह्या बापाले पण ओयखसान, पण आतापासून त्याले ओयखता, अन् त्याले पायले पण हाय.” 8फिलिप्पुसन त्याले म्हतलं, “हे प्रभू, देवबापाले आमाले दाखवून दे: तवा आमाले बरं वाटीन.” 9येशूनं त्याले म्हतलं, “हे फिलिप्पुस, मी येवढ्या दिवसापासून तुमच्या संग हाय, अन् काय तुमी मले ओयखत नाई? ज्यानं मले पायलं हाय, त्यानं माह्या देवबापाले पायलं हाय: तू कावून म्हणतो कि देवबापाले आमाले दाखवं? 10मी देवबापात हावो अन् देवबाप माह्यात हाय. काय तू या गोष्टीवर विश्वास नाई करत? ह्या गोष्टी जो मी तुमाले सांगतो, मी स्वताच्या कडून नाई म्हणत, पण देव बापाकडून म्हणतो, अन् देवबाप माह्यात राहून तेच करते जे त्याले वाटते. 11माह्या विश्वास करा, कि मी बापात हाय, अन् बाप माह्यात हाय; नाई तर जे चमत्कार मी केले हाय यामुळे माह्याला विश्वास करा.”
येशूच्या नावाने प्रार्थना
12“मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो माह्यावर विश्वास ठेवतो, हे काम जे मी करतो तो पण करीन, अन् याच्याऊन पण मोठे-मोठे काम करीन, कावून कि मी देवबापापासी चललो हाय. 13जे काही तुमी माह्या नावान मांगसान, तेच मी करीन कि पोराच्या पासून बापाचे गौरव व्हावं. 14जर तुमी माह्या नावान काई मांगसान, तर मी ते करीन.”
पवित्र आत्माची प्रतिज्ञा
15“जर तुमी माह्यावर प्रेम ठेवता, तर माह्या आज्ञाचं पाळण करसान. 16अन् मी देवबापाले प्रार्थना करीन, अन् तो तुमाले एक मदत करणारा देईन, कि तो सर्वदा तुमच्या संग राहावा.” 17तो तर पवित्र आत्मा हाय, जो देवाच्या बाऱ्यात सर्व खरं सांगतो, ज्याले जगातले लोकं स्वीकार नाई करू शकत, कावून कि ते त्याले पाऊ शकत नाई अन् त्याले ओयखत पण नाई: पण तुमी त्याला ओयखता, कावून कि तो तुमच्या संग रायते, अन् तो तुमच्याईत रायते. 18“मी तुमाले अनाथ नाई सोडीन, मी तुमच्यापासी वापस येईन. 19अन् थोड्याच वेळ रायला हाय, कि जगातले लोकं मले पायणार नाई, तुमी मले पायसान कावून कि मी परत जिवंत होऊन जाईन, अन् म्हणून तुमी पण जिवंत रायसान. 20जवा मी परत जिवंत होईन त्या दिवशी तुमी ओयखसान, कि मी आपल्या देवबापात हावो, अन् तुमी माह्यात हा, अन् मी तुमच्यात हावो. 21ज्याले माह्याली आज्ञा माईत हाय, अन् तो त्याचं पाळण करतो, तोच माह्यावर प्रेम करते, अन् जो माह्यावर प्रेम करते त्याच्यावर माह्या देवबाप पण प्रेम करीन, अन् मी त्याच्यावर प्रेम करीन, अन् स्वताले त्याच्यावर प्रगट करीन.” 22शिष्याय मधला एक शिष्य ज्याचे नाव यहुदा होते पण तो यहुदा इस्कोरोती नव्हता, त्या यहूदाने येशूले विचारलं, “हे प्रभू, कावून तू आपल्या स्वताले आमच्यावर प्रगट करशीन पण जगातल्या लोकायवर नाई?” 23येशूनं त्याले उत्तर देलं, “मी आपल्या स्वताले असा लोकायवर प्रगट करतो जो माह्यावर प्रेम ठेवीन, तो माह्या शिकवणीच पाळण करीन, अन् माह्या देवबाप त्याच्यावर प्रेम ठेवीन, अन् आमी त्याच्यापासी येऊ अन् त्याच्या संग राऊ. 24जो माह्यावर प्रेम नाई करत, तो माह्या आज्ञाचं पाळण नाई करत, अन् जे शिकवण तुमी आयकता, ते माह्यी नाई, पण माह्या बापाची हाय, ज्यानं मले पाठवलं.” 25“ह्या गोष्टी मी तुमच्या संग रायतांना तुमाले संगातल्या हाय. 26पण मदत करणारा म्हणजे पवित्र आत्मा ज्याले देवबाप माह्या जागेवर पाठवीन, तो तुमाले सगळ्या गोष्टी शिकवीन अन् जे काई मी तुमाले शिकवलं, अन् जे काई मी तुमाले सांगतल, ते सगळं तुमाले आठोन करून देईन.”
येशूची शांती
27“मी तुमाले शांती देऊन जातो, म्हणजे ती शांती जी माह्यापासी हाय तुमाले देतो; जसं जग देते तसा मी तुमाले नाई देत, तुमचं मन व्याकूळ अन् भयभीत झालं नाई पायजे. 28तुमी आयकलं, जे मी तुमाले म्हतलं, कि मी जाऊन रायलो हाय, अन् परत तुमच्यापासी वापस येईन, जर तुमी माह्यावर प्रेम ठेवता, तर ह्या गोष्टीवर आनंदित झाले असते, कि मी बापा पासी जाऊन रायलो हाय, कावून कि माह्या बाप महान हाय. 29अन् मी ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या पयले, तुमाले सांगतल हाय, कि जवा ते होऊन जाईन, तवा तुमी माह्यावर विश्वास करा. 30माह्या जवळ तुमच्या संग गोष्टी कऱ्यासाठी जास्त वेळ नाई वाचला हाय, कावून कि ह्या जगाचा सरदार सैतान येत हाय, अन् माह्यावर त्याचा काईच अधिकार नाई. 31मी तसाच करतो जशी देवबापान मले आज्ञा देली, मी जगावर तसाचं प्रेम करतो, कि जगाच्या लोकायले मालूम व्हावे, कि मी देवबापावर प्रेम करतो. उठा, इथून चला.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.